ताराबेन मश्रुवाला या नाजुक-किरकोळ प्रकृतीच्या, व्रतस्थ ब्रह्मचारी स्त्रीने त्यांचे पूर्ण आयुष्य लोककल्याणासाठी खर्ची घातले. त्यांनी विदर्भातील अमरावती जिल्ह्यात आडमार्गावर असलेल्या माधान या लहानशा खेड्याचा कायापालट केला. तेथे त्या आधी कोणत्याही प्रकारच्या सोयीसुविधा नव्हत्या. ताराबेन यांनी महात्मा गांधी यांचे ग्रामसुधारणेचे स्वप्न तेथे प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न केला. माधान हे सातपुडा डोंगर पायथ्याशी वसलेले ओसाड असे खेडेगाव आहे. ते महाराष्ट्रात ‘आदर्श ग्राम’ रूपात आणि सामाजिक कार्याच्या रूपात नावाजले गेले...
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर, किल्ला भारतीय पुरातत्त्व विभागाच्या देखरेखीखाली आला. आसदगड किल्ला 1955 अखेर मोडकळीस आला होता. तेथील वातावरण भयाण झाले होते. संध्याकाळी त्या ठिकाणी जाण्याची भीती वाटत असे. अशा ओबडधोबड व कोणत्याही प्रकारची देखरेख नसलेल्या बागेचा प्रारंभिक विकास अकोल्यातील नेहरू पार्कप्रमाणे ‘भारत सेवक समाजा’च्या स्थानिक शाखेच्या संयोजक वीणा गोयंका यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या कार्यकर्त्यांनी केला . त्यात स्त्री कार्यकर्त्यांचा वाटा मोठा होता...
आकोट हे गाव विदर्भाच्या अकोला जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण आहे. ते संतनगरी म्हणूनच ओळखले जाते. तेथे श्री नरसिंग महाराज यांचे वास्तव्य होते. ते शेगावचे गजानन महाराज यांचे समकालीन संत व गुरुबंधू होते. त्या दोघांमध्ये स्नेहबंध घट्ट होता. गजानन महाराज नरसिंग महाराजांना भेटण्यास आकोट येथील त्यांच्या ‘झोपडी’त येत असत; त्या दोघांच्या आध्यात्मिक चर्चा चालत असत. त्या संबंधात विविध दंतकथा आहेत. गजानन महाराजांनी मनकर्णिका व दुसरी अकोलखेडची विहीर, या दोन विहिरींना पाणी आणून आकोट परिसरात सुबत्ता निर्माण केली अशीही कहाणी आहे...
अकोला हे शहर मोर्णा नदीच्या तीरावर वसलेले आहे. नदीचा उपयोग आक्रमण करणाऱ्या शत्रूविरुद्ध नैसर्गिक संरक्षणाची फळी असा होई, त्या काळची ही गोष्ट आहे. म्हणूनच मोर्णा नदीच्या पश्चिमेला आसदगडाची निर्मिती होऊन, त्याला लगत नागरी वस्त्या निर्माण झाल्या. अकोला शहराचा निश्चित कार्यकाल सांगता येत नाही. परंतु एक आख्यायिका प्रचलित आहे. अकोला शहराची भरभराट मोर्णेच्या साक्षीने झाली आहे. मोर्णा नदी ही विशेषत: जुन्या अकोल्याच्या लोकजीवनाचा अविभाज्य घटक होती...
लासूर नावाचे खेडेगाव अमरावती जिल्ह्याच्या दर्यापूरपासून बारा किलोमीटर अंतरावर आहे. ते प्रसिद्ध आहे तेथील आंनदेश्वर शिव मंदिरासाठी. आकर्षणाची गोष्ट म्हणजे ते शिवमंदिर आठशे वर्षे जुने, बाराव्या शतकात बांधलेले आहे. मंदिर उंचावर आहे. त्याचा परिसर रम्य आहे. मंदिराचे संपूर्ण दगडी बांधकाम. ते मोठमोठ्या शिळांवर कलात्मक रीत्या रचलेले. तो हेमाडपंथी स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना मानला जातो...
अचलपूरची विदर्भ मिल केव्हाच बंद पडली. तेथे आणलेली ‘फिनले मिल्स’ही टिकू शकली नाही. परंतु ‘विदर्भ मिल्स’चे कामगार व कर्मचारी यांच्यासाठी बाबासाहेब देशमुख यांच्या पुढाकाराने बांधलेल्या वसाहतीतील सांस्कृतिक जीवन हा कित्येक दशकांसाठी तेथील रहिवाशांकरता ठेवा होऊन राहिला आहे. त्या कामगार-कर्मचाऱ्यांचे गणेशोत्सवापासून क्रिडास्पर्धेपर्यंत अनेकानेक ‘इव्हेण्टस’ होत. त्या प्रत्येक घटनेमधून मुलामाणसांसाठी नवा संस्कार प्रस्थापित होई. तेच तर त्या रहिवाशांचे ‘धन’ होते. त्यामुळे मिल चालू असणे वा बंद असणे याचा परिणाम त्यांच्या जीवनावर क्वचितच जाणवला असेल...
राजा दांडेकर हे दापोली तालुक्यातील चिखलगावचे. त्यांनी शिकून- डॉक्टर होऊन परत स्वत:च्या गावी यायचे ठरवले होते. ते ध्येयवादाने झपाटलेले व्यक्तिमत्त्व. भारताचा इतिहास व भारतीय संस्कृती यांच्यावरील प्रेम त्यांच्यात ठासून भरलेले आहे. त्यांनी लोकसाधना संस्थेच्या माध्यमातून शाळा काढली. तेथे शासनाचा अभ्यासक्रम सांभाळून प्रत्येक मुलाला प्रयोगशील उत्पादक शिक्षण कसे देता येईल असा प्रयत्न असतो...
वऱ्हाड प्रांतातील पुरातत्त्वीय स्थानांचा परिचय विवेक चांदूरकर या युवा संशोधकाने ‘उद्ध्वस्त वास्तू - समृद्ध इतिहास’ या पुस्तकात करून दिला आहे. या पुस्तकातील प्रत्येक नोंद ही ऐतिहासिक दस्तावेज ठरावा इतके मूल्य असलेली आहे. विदर्भाच्या सर्व जिल्ह्यांना ऐतिहासिक वास्तूंचा वारसा लाभला आहे...
‘दण्डार’ हा नृत्यप्रकार प्राचीन काळापासून चालत आलेला आंध जमातीचा नृत्यप्रकार आहे. निसर्गातील मानवाला जीवन देणाऱ्या महाभूतांविषयीची श्रद्धा हा दंडारणातील विविध कलाविष्कारांचा विषय असतो. आंधांची जीवनपद्धतच त्यांच्या नृत्यातून व्यक्त होते म्हणून त्याला लोकधर्मी संबोधले जाते...
गव्हाच्या पीठापासून बनवला जाणारा पानगे/रोडगे हा पदार्थ विदर्भातील सर्वांच्या जिव्हाळ्याचा व आवडीचा विषय. मार्गशीर्ष-पौष महिना सुरू झाला, की शेतात, तर कधी घरी पानग्याचा/रोडग्याचा बेत...