Home Search
बिहार - search results
If you're not happy with the results, please do another search
कृषिसंशोधक शेळीतज्ज्ञ बनबिहारी निंबकर
बनबिहारी विष्णू निंबकर यांनी शेळ्या व मेंढ्या यांचा सूक्ष्म स्तरावर जातीनिहाय शास्त्रीय अभ्यास केला. त्यांच्या त्या अभ्यास व संशोधन कार्यामुळे शेळी-मेंढीपालन करणारे लोक यांची उन्नती साधली गेली व त्यांना आर्थिक स्थैर्य प्राप्त झाले. त्यांनी शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी केलेल्या योजना, उत्पादने आणि ती तयार करण्यातील त्यांची कल्पकता पाहून तत्कालीन महाराष्ट्र सरकारने त्यांना सहा वर्षांसाठी ‘मॅफ्को’चे अध्यक्ष म्हणून नियुक्त केले होते. त्या वेळी मॅफ्को तोट्यात होती. निंबकर यांच्या अभिनव कल्पनांमुळे ते मॅफ्कोतून निवृत्त झाले तेव्हा ती नफादायक सरकारी कंपनी झाली होती...
अटलबिहारी वाजपेयी- स्वयंसेवक, प्रचारक ते पंतप्रधान!
‘अटलजी-कविहृदयाच्या राष्ट्रनेत्याची चरितकहाणी’ हे पाचशेतीस पानांचे पुस्तक पत्रकार सारंग दर्शने यांनी लिहिलेले आहे. अटलजी चौऱ्याण्णव्या वर्षांचे असून भीष्मासारखे शरपंजरी पडलेले आहेत; तरीही त्यांची लोकप्रियता...
मतदान केले; लोकांचे काम संपले ! (Right to Recall is a must in Democracy)
भारत हे सर्वांत मोठे लोकशाही राष्ट्र आहे असे सर्वलोक अभिमानाने बोलतात. ‘लोकशाहीचा उत्सव’ हा शब्दप्रयोग 2019 च्या निवडणुकीपासून प्रचारात आला. त्यामुळे एक घोटाळा झाला, की निवडणुका या दिवाळी/होळीसारख्या साजऱ्या होऊ लागल्या. गेली पाऊणशे वर्षे हे चालू आहे. तरीही देशातील जनतेच्या साध्या साध्या समस्या सुटलेल्या नाहीत. ‘आम्ही तुम्हाला कशाला निवडून दिले? पुरे झाली तुमची आमदारकी/ खासदारकी! आता घरी बसा!’ असे शब्द जरी कोणाच्या ओठांवर आले तरी ते उच्चारले जाऊ शकत नाहीत, उच्चारले तरी त्यांचा काही उपयोग होत नाही. कारण एकदा निवडून दिलेल्या उमेदवारांचे प्रतिनिधित्व कोणत्याही कारणाने रद्द करण्याचे अधिकार निवडून देणाऱ्या नागरिकांच्या हातात नाहीत ...
NOTA -None of the above एक परिणामशून्य निवडणूक साधन ? (NOTA needs to be...
भारतीय लोकशाही एका चिंताजनक वळणावर उभी आहे. लोकशाहीला दिशा देण्याचे कर्तव्य देशातील जनतेचे असते. त्यासाठी आवश्यक असणारे सामर्थ्य मतदानाच्या अधिकाराच्या रूपात देशाच्या मतदारांमध्ये असते असे मानले जाते. देशातील राजकीय पक्षांचा, शासकीय आणि प्रशासकीय व्यवस्थांचा निवडणुकांकडे पाहण्याचा सरंजामी दृष्टिकोन लक्षात घेऊन, योग्य उमेदवार उभे करण्याची आणि त्यांना निवडून आणण्याची क्षमता जनतेने गमावलेली असली तरी राजकीय पक्षांनी उभे केलेले अयोग्य उमेदवार नाकारण्याचा, त्याबद्दलची नाराजी व्यक्त करण्याचा, त्याद्वारे सरकारवर, राजकीय पक्षांवर आणि संबंधित व्यवस्थांवर दबाव निर्माण करून अंतिमतः निवडणूक पद्धतीमध्ये सुधारणा घडवून आणून ती परिणामकारक करण्याचा प्रयत्न होणं आवश्यक आहे. सर्वोच्च न्यायालयाने देशाच्या निवडणूक आयोगाला निवडणूक प्रक्रियेमधील मतदान पत्रिका (बॅलट पेपर) आणि EVM मध्ये मतदारांसाठी NOTA म्हणजेच None of the above (वरीलपैकी कुणीही नाही) या पर्यायाचा समावेश करण्याचे आदेश 2013 मध्ये दिले ...
लेणी कोंडाण्याची (Cave Sculpture of Kondana)
कोंडाणे लेणी रायगड जिल्ह्यात कर्जत तालुक्यात त्याच नावाच्या गावात आहेत. बोरघाटातील राजमाची किल्ल्याच्या पायथ्याशी घनदाट अरण्य आहे. मोठे वृक्ष, महाकाय वेली आणि जंगली श्वापदे यांचा वावर तेथे असतो. त्यात वृक्षवेलींच्या-झाडझाडोऱ्यांच्या गुंत्यात लपल्या होत्या कोंडाणे लेण्यांच्या अप्रतिम शिल्पकृती. लेणी इसवी सनापूर्वी पहिल्या-दुसऱ्या शतकांत साकारण्यात आली. परंतु ती लेणी किर्र रान, मुसळधार पाऊस आणि भूकंप यांनी झालेली पडझड यांमुळे ओसाड होऊन गेली आणि विस्मृतीच्या पडद्याआड सारली गेली...
गोपीनाथ पाटील : ठाणे-कळव्याचे ध्यासपर्व (Gopinath Patil’s dedicated work for Kalawa area)
ठाण्याजवळच्या कळवा गावचे गोपीनाथ पाटील हे ध्येय व ध्यास घेऊन सार्वजनिक जीवनात वावरले. त्यांच्या कार्यासाठी त्यांचे परवलीचे सूत्र होते, सहकार ! तेच कार्यसूत्र, खरे तर, स्वातंत्र्योत्तर काळातील संस्था, उपक्रम यांच्या स्थापनेत होते. गोपीनाथ यांच्यामुळे अनेक उपक्रम स्वतःच्या पायावर कळवा परिसरात भक्कमपणे उभे आहेत. ती त्यांच्या कार्याची पावती होय.
ते ज्या कळवा गावात राहत होते ते गाव ठाणे या शहराला लागून असूनसुद्धा अनेक सुविधांपासून दूर होते. कळवावासीयांना दैनंदिन व्यवहारिक गरजा भागवण्यासाठी ठाण्याची वाट तुडवण्याला पर्याय नव्हता. कळव्यातील ते अंधारयुग नष्ट करण्यासाठी आंतरिक तळमळीने उभे राहिले ते गोपीनाथ पाटील. त्यांच्या सार्वजनिक कार्यातून उभ्या राहिल्या अनेकानेक संस्था...
पद्मश्री प्रेमा पुरव – स्वातंत्र्य सेनानी, क्रांतिकारी महिला
2 जुलैची सकाळ. उदास उदास. धड पाऊस नाही, धड ऊन नाही. मेधाताईचा उठल्यावर एसएमएस पाहिला, ‘आई गेली रात्री’. आई म्हणजे प्रेमाताई पुरव आणि मेधाताई म्हणजे त्यांची मुलगी मेधा पुरव-सामंत. पद्मश्री प्रेमा पुरव यांचे वयाच्या अठ्ठ्याऐंशीव्या वर्षी निधन झाले. प्रेमा तेंडुलकर, गोवा मुक्तीसंग्रामातील क्रांतिकारक, सामाजिक कार्यकर्त्या आणि ‘अन्नपूर्णा महिला मंडळ, मुंबई’च्या संस्थापक. ताई ‘संयुक्त महाराष्ट्र समिती’, ‘महागाई प्रतिकार समिती’, ‘साने गुरुजी व्याख्यानमाला’ अशा संस्थांमधून घडत गेल्या...
गझल : दुसऱ्याच्या भूमीवरची शेती (Borrowing Gazal Ideas)
‘गझल : दुसऱ्याच्या भूमीवरची शेती’ हे लेखाचे नाव थोडे विचित्र वाटू शकेल. प्रत्येक भाषेची स्वत:ची संस्कृती असते. उर्दूमध्ये आपल्यापेक्षा ज्येष्ठ असलेल्या कवी/शायर यांच्या गझलमधल्या ओळी घेऊन त्यापुढे स्वतःच्या ओळी जोडण्याची सर्रास पद्धत आहे. यात वाङ्मयचौर्य वगैरे न समजता ही ज्येष्ठ कवीला दिलेली मानवंदना आहे असे समजतात. हिंदीतले प्रसिद्ध कवी आणि सिनेगीतकार देवमणी पांडेय यांच्या ह्या लेखाचे मराठी कवयित्री रेखा शहाणे यांनी भाषांतर केले आहे. अनेक सुप्रसिद्ध गझल आणि गीतांमधील देवमणी पांडेय यांनी दाखवून दिलेले साम्य मननीय आहे...
निढळाच्या घामाची नगरी – धारावी (A City of Hard Working People)
आशियातील सगळ्यात मोठी झोपडपट्टी हे बिरुद (!) मिरवणारी धारावी ही झोपडपट्टी. सुरुवातीला ती मुंबई शहराच्या शीवेच्या म्हणजे सायनच्या बाहेर होती. पाण्याने एखाद्या बेटाला विळखा घालून पुढे जावे, तसे मुंबई शहर धारावीला विळखा घालून पुढे सरकत गेले. धारावी आता वाढत्या शहराच्या मध्यावर आली आहे. तो कष्टकऱ्यांचा मिनीभारतच आहे ! भारतभरच्या सगळ्या प्रांतांमधील विविध भाषा बोलणारे, वेगवेगळ्या धर्मांचे, पंथांचे लोक तेथे वस्ती करून आहेत. घेट्टो करून रहाणं ही माणसांची स्वाभाविक प्रवृत्ती आहे. त्यामुळे एकच व्यवसाय करणाऱ्या लोकांच्या प्रांतनिहाय वस्त्या धारावीत आहेत. धारावीने मुंबईच्या मध्यभागी जवळपास सहाशे एकर जमीन व्यापली आहे. सध्याच्या काळात जमिनीला आलेले मोल कोणाला सांगायला नको...
भगवानलाल इंद्रजी (Bhagwanlal Indraji)
पंडित भगवानलाल इंद्रजी (1839 - 1888) हे नाव सर्वसामान्य वाचकांना माहीत नसते. तसे ते माहीत असण्याचे कारणही नाही. भगवानलाल इंद्रजी हे मुळचे जुनागढचे. ते पुरातत्त्वशास्त्रज्ञ, शिलालेखांचे संशोधक आणि पुराणवस्तूंचे संग्राहक होते. ते मुळचे गुजरातचे असले तरी त्यांनी बरेचसे काम डॉ. भाऊ दाजी लाड यांच्याबरोबर केले. त्यांनी भारतभरच्या ब्राह्मी लिपीतल्या इतर असंख्य शिलालेखांचे वाचन केले आहे. पण त्यांचे नाव कायमचे जोडले गेले आहे ते रुद्रदमनच्या गिरनार येथील अडीच हजार वर्षांपूर्वीच्या शिलालेखाशी ! भगवानलाल इंद्रजींनी डॉ. भाऊ दाजी लाड यांचे साहायक म्हणून अनेक वर्षे काम केले. भाऊ दाजी यांनी त्यांच्या संशोधनासाठी, प्रवासासाठी, उत्खननासाठी निधी उपलब्ध करून दिला...