Home Authors Posts by सुनिल प्रसादे

सुनिल प्रसादे

1 POSTS 0 COMMENTS
सुनिल प्रसादे हे उद्योजक व क्रियाशील पर्यावरण कार्यकर्ता म्हणून दापोलीत कार्यरत आहेत. ते ‘पागोळी वाचवा अभियाना’च्या माध्यमातून ‘पावसाची शेती’ या पद्धतीचा प्रसार, प्रशिक्षण आणि मार्गदर्शन जून 2019 पासून करत आहेत. ते रत्नागिरी जिल्ह्याच्या दापोली तालुक्यात राहतात. त्यांनी भारतीय स्टेट बँकेतून स्वेच्छानिवृत्ती पत्करली आहे.

रेनवॉटर हार्वेस्टिंग आणि पाण्याची शेती

‘रेनवॉटर हार्वेस्टिंग’ एक प्राचीन संकल्पना आहे. ती पाषाणयुगापासून अस्तित्वात असावी. पावसाचे पाणी गोळा करणे आणि ते विविध भांड्यांमध्ये साठवणे, या केवळ दोन कृतींचा त्यात समावेश आहे. भूपृष्ठजलाशी (Surface Water) निगडित अशी ती संकल्पना आहे. भूपृष्ठजलाला बाष्पीभवन, वाहून येणारा मातीचा गाळ, दूषितीकरण, अल्पायुष्य अशा अनेक अंगभूत मर्यादा आहेत...