Tag: Pune
ऋतु बरवा : सहा ऋतूंचे सहा सोहळे… ( Rutu Barwa – ...
वातावरणातील ऋतुचक्र सूर्याच्या दक्षिणोत्तर गतीमुळे निर्माण होते. म्हणजे ऋतू सूर्यसंक्रांतीवर अवलंबून असतात. ती वस्तुस्थिती महाभारत काळातदेखील माहीत होती. असे असताना, दुर्गाबाईंनी चांद्रमासांवर आधारित ऋतुचक्र का लिहिले हा मला पडलेला प्रश्न आहे... ऋतुचक्राचा मेळ चैत्र, वैशाख वगैरे चांद्रमासांशी बसत नाही. मी मराठवाड्याच्या रखरखीत पठारावर जन्मलो. अठ्ठावन्न वर्षे तिकडेच काढली. पुण्याला आलो तो येथील झाडांच्या ओढीने. पुणे हे सर्वाधिक वृक्षविविधता असलेले, अतिशय वृक्षसमृद्ध असे शहर आहे हे मला वाचून माहीत होते. येथे सह्याद्री आहे. चार नद्या आणि सात धरणे आहेत...
ओतूरची सांदुरी पुरी
पुण्याजवळील ओतूर हे माझे आजोळ. कपर्दिकेश्वराचे मंदिर व संत तुकाराम महाराजांचे गुरु बाबाजी चैतन्य यांची संजीवन समाधी ही गावाची श्रध्दास्थाने. या दोन्ही मंदिरांना वळसा घालून वाहणारी मांडवी नदी ही ओतूरची जीवनरेखा आहे. पूर्वी उन्हाळ्याच्या सुटीच्या दिवसांत गावी हमखास नात्यात लग्नं असायची. ओतूर भागातील लग्नप्रथा लिहावी तर - महिनाभर आधीपासूनच घरात पाहुणे-रावळे येत. लग्नात सर्वात जास्त लक्ष वेधून घेणारा घटक म्हणजे लग्नातील रुखवत. त्या साऱ्या पदार्थांमध्ये दर्दी लोकांचे लक्ष मात्र राळ्याचे सारण भरलेल्या पुऱ्यांवर असे...
जयंतराव टिळक – केसरीचे नवे रूप
पुण्यातील दोन खुणा जयंतराव टिळक यांची आठवण चिरकाल ठेवतील. शनिवारवाड्यासमोरचा पूल आणि त्यांच्या नावाने सहकार नगर येथे उभारलेले गुलाब पुष्प उद्यान. जयंतरावांचे गुलाब पुष्प प्रेम प्रसिद्ध आहे. त्यांनी गुलाब पुष्पाबद्दल पुणेकर नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण केली. ते लोकमान्यांचे नातू होत...
शिवाजी, रामदास आणि गणेशोत्सव
संतकवी रामदास स्वामी व हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना एकमेकांबद्दल आदर होता. लोकांमध्ये राष्ट्रप्रेम निर्माण व्हावे, संस्कृती रुजावी यासाठी शिवाजी राजे आणि रामदास स्वामी या दोघांनी मिळून गणेशोत्सव भाद्रपद शुद्ध चार ते माघ शुद्ध पाच म्हणजे गणेश जयंतीपर्यंत, पाच महिने 1675 साली साजरा केला...
स्थलांतरित मुलांचे शिक्षण – दौंडचा अनुभव (Education of Migrant Children -Daund’s Experience)
शालेय मुलांचे ऑनलाईन शिक्षण लॉकडाऊनमुळे 2020 मध्ये सुरू झाले, परंतु स्थलांतरित मुलांच्या शिक्षणाची मोठी अडचण निर्माण झाली. तशा मुलांच्या अनेक झोपड्या नांदूर गावात कोरोनाच्या सर्वेक्षणाच्या निमित्ताने जुलै 2020 महिन्यात दिसून आल्या. परंतु ऊसतोडीला पालकांबरोबर दिवसभर गेलेली ती मुले संध्याकाळीच माघारी येत. त्यांचे सर्वेक्षण करणे कठीण होते...
शिक्षक विद्यार्थ्यांच्या दारी ! – गुंजकर गुरुजी (Teacher at the door of students)
शिक्षक विद्यार्थ्यांच्या दारी (ऑनलाईन व ऑफलाईन शिक्षण प्रक्रिया) नावाच्या उपक्रमाची सुरुवात गुंजकर सरांनी लॉकडाऊनच्या आधीपासून केली होती. तो उपक्रम राबवला जातो रविवार व इतर सुट्टीच्या दिवशी...
निराधार वृद्धांचे डॉक्टर मायबाप
भीक मागत फिरणारे आयुष्याच्या उतारवयातील आजी-आजोबा रस्त्यावर कोठेकोठे दिसतात. कधी जोडीने किंवा कधी एकेकटे. ती म्हातारी मंडळी त्यांचे म्हातारपण कोणाच्या तरी शिळ्यापाक्या अन्नावर किंवा किरकोळ पैशांच्या भिकेवर कंठत असतात- रस्त्यावर. फूटपाथवरील त्या जगण्यात त्यांना कधी कुत्री, उंदीर, घुशी चावतात, तर कधी त्यांचे अपघात होतात. उतारवयामुळे कधी डोळ्यांची दृष्टी अधू होते तर कधी मोतिबिंदू होऊन डोळे पूर्ण जातात. जेथे मुळात अन्नपाण्याचीच सोय नाही तेथे जखमांच्या दुरूस्तीसाठी पैसा कोठून आणणार? अभिजित आणि मनीषा सोनवणे हे दाम्पत्य तशा आजीआजोबांसाठीच काम करते...
विवेक सबनीस – जुन्या पुण्याच्या शोधात
'स्मरणरम्य पुणे' किंवा 'पुणे नॉस्टॅल्जिया' हे कॅलेंडर मराठी आणि इंग्रजी अशा दोन भाषांत तयार केले गेले आहे. पुणे शहर काळाच्या ओघात बदलत गेले. ते...
शुभदा लांजेकर व आवाबेन नवरचना संस्था
शुभदा लांजेकर यांचा जन्म पुण्यातील. बालपण बरे गेले. त्या अकरावीपर्यंत शिकल्या. वडील अतिशय कडक शिस्तीचे. आई प्रेमळ, मनमिळाऊ, पाककलेची आवड असणारी गृहिणी होती. दुसऱ्यांना...
स्किझोफ्रेनिया अवेअरनेस असोसिएशन (सा)
पुण्याची 'सा' ही संस्था स्किझोफ्रेनिया व इतर मानसिक आजार यांच्यासाठी काम करते. कॅनडाचे रहिवासी डॉ. जगन्नाथ वाणी यांनी १९९७ साली त्या संस्थेची स्थापना...