Tag: स्वातंत्र्य चळवळ
जवाहरलाल नेहरू आणि सोलापूरचा मि. वेडी
जवाहरलाल नेहरू यांनी ‘भारताला संपूर्ण स्वातंत्र्य हवे’ अशी मागणी करणारा ठराव मांडला, तो लाहोर काँग्रेसमध्ये एकमताने मंजूर झाला. तेव्हा एकीकडे सविनय कायदेभंगाच्या चळवळीने उग्ररूप धारण केले, तर दुसरीकडे जवाहरलाल यांना अटक झाली. जवाहरलाल कैदेत सापडल्याने देशभरातील तरुण वर्ग प्रक्षुब्ध झाला. त्यातूनच सोलापूरच्या हाजूभाई चौकात कलेक्टरला खुनाची धमकी देणारे पत्र चिकटवलेले सापडले. त्या पत्राखाली पत्रलेखक म्हणून ‘मि. वेडी’ अशी सही होती…
दादांच्या स्मृतिग्रंथात शालिनीताई अनुपस्थित !
वसंतदादा हे असामान्य, कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्व होतेच, पण शालिनीताई यांचेही कार्यकर्तृत्व स्वतंत्रपणे विचारात घ्यावे लागेल. त्या महाराष्ट्रातील एक माजी मंत्री, माजी खासदार व सहकार क्षेत्रातील कार्यकर्त्या होत्या. त्यांनी राजकारणात स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले. त्यांच्याविषयीची माहिती पुस्तकात असणे आवश्यकच होते...
महाराष्ट्रीय मुसलमान त्रिशंकू स्थितीत (The Plight of Marathi Muslims in Maharashtra)
महाराष्ट्रातील मुसलमानांची मातृभाषा मराठी असून संस्कृती महाराष्ट्रीय आहे, असे प्रतिपादन करणारा कॉ. अमर शेख यांचा लेख ‘किर्लोस्कर’मध्ये प्रसिद्ध झाला आहे. आजच्या भाषिक आणि सांस्कृतिक जागृतीच्या काळात प्रसिद्ध झालेला हा लेख महत्त्वपूर्ण आहे, तथापि तो परिपूर्ण नाही...