Home Tags साहित्य अकादमी पुरस्कार

Tag: साहित्य अकादमी पुरस्कार

मराठी भाषासंस्कृती धोक्यात (Marathi Language and Culture in Danger)

सुधीर रसाळ हे संभाजीनगरचे सुविख्यात समीक्षक. ‘विंदांचे गद्यरूप’ या ग्रंथास साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला तेव्हा त्यांनी वयाची नव्वदी पार केली होती. त्यामुळे त्या घटनेची विशेष प्रशंसेने दखल घेतली गेली. संभाजीनगरच्याच ‘मुक्त सृजन’ संस्थेने रसाळ यांचा जीवनगौरव पुरस्कार देऊन सत्कार केला. त्या निमित्ताने वृंदा देशपांडे-जोशी यांनी ‘अमृताचे बोल’ नावाचा ब्लॉग लिहिला. त्यात रसाळ यांचे पूर्ण भाषण शब्दन् शब्द उद्धृत केलेच, पण स्वतःच्या भावनाही व्यक्त केल्या. सुधीर रसाळ यांनी वेगवेगळे चार मुद्दे मांडून त्यांचे भाषण नेमके व नेमक्या वेळात केले. त्यांतील मराठी भाषेसंबंधीचा मुद्दा प्रासंगिक महत्त्वाचा वाटल्याने तो येथे उद्धृत करत आहोत. अर्थात त्यातील निरीक्षणे चिरकालीन आहेत...

कवितेचा जागल्या ! (A Tribute to Dr. M. S. Patil)

1
डॉ. म.सु. पाटील हे 1980 नंतरच्या मराठी समीक्षकांमधले अग्रगण्य नाव. ते समीक्षक असण्याबरोबरच विद्यार्थी प्रिय प्राध्यापक होते. ते मनमाड महाविद्यालयाचे वीस वर्षे प्राचार्य होते. त्यांनी त्या काळात अनेक विद्यार्थी घडवले. ते महाविद्यालय नावारूपाला आणले. त्यांनी मराठी साहित्याच्या नकाशावर अस्तित्वात नसलेल्या मनमाड या गावाला साहित्यिक चळवळीचे केंद्र बनवले. त्यांच्या तिथल्या वास्तव्यात विविध चर्चासत्रे, व्याख्याने, ‘अनुष्टुभ’ सारख्या दर्जेदार मासिकाची चळवळ असे मनमाडचे साहित्यजीवन विविध अंगांनी बहरले. अनेक नामवंत साहित्यिकांचा राबता वाढला. त्यांचे निधन 31 मे 2019 रोजी झाले. त्यांच्या निधनानंतर त्यांची कन्या, ज्येष्ठ कवयित्री, कथाकार, कादंबरीकार नीरजा यांनी त्यांच्याविषयी ‘लोकसत्ता’मध्ये लिहिलेल्या लेखाचा संपादित अंश प्रकाशित करत आहोत...

सकस बालसाहित्यिक संजय वाघ (Sahitya Academy award winner Sanjay Wagh)

0
संजय वाघ यांना ‘साहित्य अकादमी’चा बालसाहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांच्या ‘जोकर बनला किंगमेकर’ या किशोर कादंबरीसाठी तो पुरस्कार दिला गेला आहे. ते नाशिकचे पत्रकार आणि साहित्यिक आहेत. दरवर्षी जाहीर होणाऱ्या ‘साहित्य अकादमी’च्या पुरस्कारांतून नाशिकच्या वाट्याला आलेला साहित्य अकादमीचा बाल साहित्यातील हा पहिला पुरस्कार आहे...

एकतिसावे साहित्य संमेलन (Thirty-first Marathi Literary Meet -1947)

एकतिसावे साहित्य संमेलन हैदराबाद येथे 1947 साली झाले. नरहर रघुनाथ फाटक हे तेथे अध्यक्ष होते. फाटक यांच्या आयुष्याची सुरुवात वृत्तपत्र लेखनाने आणि संपादन सहकार्याने झाली. पुढे, ते नाथीभाई ठाकरसी विद्यापीठ व रुईया कॉलेजात मराठीचे अध्यापक झाले...