फलटण हे पुण्याजवळचे संस्थानी छोटे गाव, पण ते सांस्कृतिक दृष्टया पुण्यासारख्या शहरापासून फार वेगळे वाटत नाही. त्याचे श्रेय मालोजीराजे नाईक निंबाळकर या द्रष्ट्या समाजाभिमुख संस्थानिकाकडे जाते. त्यांचा राज्याभिषेक 15 ऑक्टोबर 1917 रोजी झाला. त्यांनी त्यांच्या हाती राज्य कारभार घेताच, तीन घोषणा दरबारात केल्या- स्त्रियांचे समान हक्क, हरिजनांना दरबारात प्रवेश आणि कुलाचार म्हणून देवीला मांस व मद्य यांच्या नैवेद्याला बंदी. तिन्ही घोषणा केवढ्या पुरोगामी व प्रगल्भ ! त्यावेळी त्यांचे वय होते अवघे एकवीस वर्षे...