Tag: सांस्कृतिक नोंदी
लोककलांचा वारसा: भारूड आणि कीर्तन (Folk Arts – A Cultural Heritage)
महाराष्ट्राला लोककलांची समृद्ध परंपरा आहे. लोकनाट्य, वगनाट्य, दशावतार, तमाशा, कीर्तन, भारूड, पोवाडा अशा लोककलांशी सर्वसाधारण मराठी माणसाचा परिचय असतो. या सर्व कला ही मनोरंजनाची साधने आहेत. सहजता, उस्फूर्तता ही लोककलांची वैशिष्ट्ये. अशा अनेक लोककलांनी महाराष्ट्र समृद्ध आहे. त्यांपैकीच दोन लोककला म्हणजे 'भारूड' आणि 'कीर्तन'. मनोरंजनातून प्रबोधन हे ह्या दोन्ही लोककला प्रकारांचे वैशिष्ट्य आहे. लेखात भारूड आणि कीर्तन या लोककलांच्या विविध प्रकारांचा परिचय करून दिला आहे...
कोजागिरी पौर्णिमा अर्थात मोत्यांची पौर्णिमा
कोजागिरी पौर्णिमा मी इतक्या वेगवेगळ्या ठिकाणी आणि वेगवेगळ्या लोकांबरोबर साजरी केली आहे की बस ! कधी शेतात, कधी गच्चीवर, कधी नदीकाठी; तर कधी कोणाच्या अंगणात. त्या प्रत्येक पौर्णिमेची आठवण माझ्यासाठी खास आहे. आमच्या घरी त्या दिवशी पहिल्या अपत्याला, म्हणजे मला ओवाळायचे, नवे कपडे घ्यायचे. काहीतरी गोडधोडाचे जेवण करायचे...
कालिदासाचा मेघ (Kalidas’s cloud – How real was it?)
शिक्षा भोगत असलेला, विरहव्याकूळ यक्ष, कसेही करून त्याची खुशाली त्याच्या प्रिय पत्नीपर्यंत पोचवण्यासाठी दूत म्हणून मेघाची योजना करतो. हा मेघ ‘पुष्करावर्तकां’च्या प्रख्यात कुळात जन्मला असल्याचा उल्लेख ‘मेघदूता’च्या सहाव्या श्लोकात आला आहे. मेघांविषयी अधिक आणि महत्त्वाची; तसेच, रंजक माहिती ‘बोरवणकर- किंजवडेकर’ यांनी त्यांच्या पुस्तकात दिली आहे. मल्लिनाथाने ‘पुष्कर’ आणि ‘आवर्तक’ अशी मेघांची दोन निरनिराळी कुळे मानली आहेत...
अष्टनायिका (Assets of Heroines on Sanskrit stage)
अष्टनायिकांचे उल्लेख संस्कृत साहित्यात वारंवार येतात. अष्टनायिकांविषयी जी माहिती कोशामध्ये आहे त्यात कृष्णाच्या आठ प्रमुख पत्नी, नंतर इंद्राच्या दरबारातील अष्टनायिका, त्यानंतर आठ प्रकारच्या ‘शृंगारनायिका’आढळतात, पण सर्वात जास्त चर्चिल्या गेलेल्या आणि कामशास्त्रापासून नाट्यशास्त्र व साहित्यशास्त्र येथपर्यंत ज्यांचे उल्लेख अनेकवार आढळतात, त्या म्हणजे भरताच्या नाट्यशास्त्रात वर्णन केलेल्या अष्टनायिका...
कालिदासाचा यक्ष आणि यक्षांच्या अष्टसिद्धी (Kalidas’s Yaksha and Yaksha’s achievements)
अमरकोशानुसार, दहा देवयोनी आहेत- विद्याधर, अप्सरा, यक्ष, राक्षस, गंधर्व, किन्नर, पिशाच्च, गुह्यक, सिद्ध आणि भूत. त्यांपैकी ‘यक्ष’ हा ‘मेघदूता’चा कथानायक होय. सर्वसाधारणपणे, यक्ष हा देखणा, ऐश्वर्यसंपन्न, सुखात आकंठ बुडालेला, पत्नीवर अत्यंत प्रेम असलेला आणि माणसांच्या दृष्टीने अतीन्द्रिय शक्ती ज्याच्यापाशी आहेत असा मानला जातो. सर्व यक्ष हे कुबेराचे सेवक. कुबेर हा त्यांचा स्वामी. यक्षांवर जबाबदारी कुबेराच्या उद्यानांचे आणि कोशाचे रक्षण करण्याची असे. कालिदासाच्या ‘मेघदुता’तील कथानायक यक्षाने त्याच्यावर सोपवण्यात आलेल्या कामात कुचराई केली आणि त्याला कुबेराच्या क्रोधाला सामोरे जावे लागले...
‘अ’चे सहा अर्थ
नामाच्या किंवा विशेषणाच्या आधी जोडल्या जाणाऱ्या ‘अ’ला असलेले सहा अर्थ ग्रंथित करणारा श्लोक असा आहे – तत्सादृश्यमभावश्च तदन्यत्वं तदल्पता । अप्राशस्त्यं विरोधश्च नञर्थाः षट् प्रकीर्तिताः...
उपनयन- शैक्षणिक संस्कार
व्यक्तिविकासाचा विचार पाच प्रमुख पैलूंच्या संदर्भात केला जातो- शारीरिक, मानसिक, बौद्धिक, सामाजिक आणि नैतिक. मुलांच्या घडणीच्या वयातील टप्प्याचे महत्त्व ओळखून प्राचीन अभ्यासकांनी उपनयन संस्काराची योजना केली असावी. मुले पूर्वी उपनयनानंतर गुरुच्या घरी ब्रह्मचारी म्हणून निवास करत आणि अभ्यास पूर्ण करून मग स्वत:च्या घरी परत येत असत. तो काळ ब्रह्मचारी म्हणून आयुष्य जगत असताना, अभ्यास करून स्वत:च्या भावी जीवनाची दिशा निश्चितपणे घडवण्याचा होय...
सोळा संस्कार विधी (Hindu Code of Sixteen Rituals for Human Life)
संस्कार हे भारतीय संस्कृतीतील आचारधर्माचे वैशिष्ट्य मानले जाते. आचारधर्म म्हणजे आचरणाचे, वर्तनाचे, वागण्या-बोलण्याचे नीतिनियम. सोळा संस्कार हे मानवी आयुष्याशी आणि माणसाने जपावयाच्या मूल्यांशी निगडित आहेत. गर्भधारणेपासून ते अंतेष्टीपर्यंत म्हणजे मृत्यूवेळेपर्यंत व्यक्तीवर आईवडील, गुरू आणि पुरोहित यांच्याकडून विधी केले जावे असे गृहित आहे. त्यांना संस्कार असे म्हटले जाते...
निसर्गदत्त महाराज – आधुनिक उपनिषदकार
‘I AM THAT’ हा ग्रंथ जगभरातील अनेक देशांमध्ये प्रसिद्धी पावला आहे. ग्रंथाचे भाषांतर त्या त्या देशातील भाषेतही झाले आहे. त्याची भाषांतरे विविध भारतीय भाषांमध्ये झाली आहेत. आध्यात्मिक क्षेत्रातील विद्वद्जनांनी त्या ग्रंथाला आधुनिक उपनिषद म्हणून गौरवले आहे. त्या ग्रंथामुळे जगातील कानाकोपऱ्यातून शेकडो अभ्यासू, पंडित, संशोधक यांची जणू रीघ भारतात आधुनिक काळात लागली ! या ग्रंथाचे कर्ते निसर्गदत्त महाराज या नावाने ओळखले जातात...
गायीम्हशींसाठी माणसाची कृतघ्नता
माणसाच्या बाबतीत, माय स्वत:च्या बाळाला अंगावर दूध पाजते. बाळाला ती स्तनपान करते. निसर्गाने बाळासाठीच आईच्या शरीरात ती योजना केली आहे. मग गाय, म्हैस यांचेही दूध, खरे तर, त्यांच्या बाळांसाठीच असण्यास हवे ना ? परंतु आधुनिक काळात भावना नष्ट होत आहेत...