अष्टनायिका (Assets of Heroines on Sanskrit stage)

0
234

अष्टनायिकांचे उल्लेख संस्कृत साहित्यात वारंवार येतात. अष्टनायिकांविषयी जी माहिती कोशामध्ये आहे त्यात कृष्णाच्या आठ प्रमुख पत्नी, नंतर इंद्राच्या दरबारातील अष्टनायिका, त्यानंतर आठ प्रकारच्या ‘शृंगारनायिका’ आढळतात, पण सर्वात जास्त चर्चिल्या गेलेल्या आणि कामशास्त्रापासून नाट्यशास्त्र व साहित्यशास्त्र येथपर्यंत ज्यांचे उल्लेख अनेकवार आढळतात, त्या म्हणजे भरताच्या नाट्यशास्त्रात वर्णन केलेल्या अष्टनायिका. त्या पुढीलप्रमाणे आहेत –

वासकसज्जा – प्रियकराच्या वा पतीच्या स्वागतासाठी घर सजवून जी शृंगारोत्सुक मनाने बसलेली असते ती

विरहोत्कंठिता – प्रियकराच्या विरहामुळे जी व्याकूळ असते ती

स्वाधीनपतिका – पती जिच्या आधीन असतो ती

कलहान्तरिता – प्रियकराशी कलह केल्यामुळे पश्चात्तापाने जी व्याकुळलेली असते ती

खंडिता – प्रियकराच्या किंवा पतीच्या प्रेमापराधामुळे क्षुब्ध झालेली ती

विप्रलब्धा – संकेतस्थळी प्रियकर न आल्यामुळे व्याकुळलेली ती

प्रोषितभर्तृका – जिचा पती प्रवासाला गेला आहे ती

अभिसारिका – संकेतस्थळी प्रियकराला भेटायला जाणारी ती

यक्षपत्नीचे जे वर्णन ‘मेघदूता’मध्ये आहे ते प्रोषितभर्तृका नायिकेचे आहे. ती नायिका पती जवळ नसल्यामुळे सजण्या-नटण्यापासून दूर असलेली, केस कसे तरी बांधून ठेवलेली, प्रसाधन द्रव्यांचा वापर न करणारी, कृश झालेली आणि पतीच्या प्रवासाच्या संकल्पित दिवसांची गणना भिंतीवर रेषा काढून करणारी अशी असते. यक्षपत्नीचे तेच वर्णन ‘उत्तरमेघा’त वाचण्यास मिळते, तर ‘पूर्वमेघा’तील बेचाळिसाव्या श्लोकात ‘खंडिता’ नायिकेचा उल्लेख आहे. त्या सर्व नायिकांमधील एक समान गुण म्हणजे आकर्षणक्षमता. त्या गुणात केवळ शारीरिक सौंदर्य नव्हे तर बुद्धिचातुर्याचाही समावेश आहे.

(‘मेघदूत (पूर्वमेघ) …’ या पुस्तकातील परिशिष्टातून)
———————————————————————————————-

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here