महाराष्ट्रातील पहिले वर्तमानपत्र – साप्ताहिक दर्पण

बाळशास्त्री जांभेकर यांनी महाराष्ट्रातील पहिले वर्तमानपत्र – इंग्रजी, मराठी साप्ताहिक ‘दर्पण’ आणि पहिले मराठी मासिक ‘दिग्दर्शन’ 6 जानेवारी 1932 रोजी काढले. त्यांच्याच प्रेरणेने, साह्याने व मार्गदर्शित्वाने भाऊ महाजन यांनी ‘प्रभाकर’, ‘धूमकेतु’ ही साप्ताहिके व ‘ज्ञानदर्शन’ नामक त्रैमासिक चालवले. अर्थात स्वतः वृत्तपत्र व मासिक काढूनच नव्हे, तर दुसऱ्यांसही तशी प्रेरणा करून बाळशास्त्री यांनीच आधुनिक महाराष्ट्राला वृत्तपत्रांचे व मासिकांचे महत्त्व पटवून दिले असे दिसून येईल.

परंतु एवढेच त्यांचे महत्त्व नव्हे. महाराष्ट्रातील, किंबहुना हिंदुस्थानातील पहिले कॉलेज प्रोफेसर, महान गणिती व ज्योतिषी, मराठी ग्रंथकार, भारतेतिहास संशोधक इत्यादी अनेक प्रकारची ख्याती त्यांनी अगदी अल्पवयात संपादन केली. दादाभाई नौरोजी यांच्यासारखे आधुनिक भारताचे पि तामह बनलेले शिष्य त्यांना मिळाले व त्यांच्यावरही गुरूच्या चारित्र्याची व बुद्धिमत्तेची छाप बसलेली होती… हिंदू समाजाला महाराष्ट्रात आधुनिक दृष्टीचा व समाजसुधारणेचा उपदेश करण्याचा मानही त्यासच द्यावा लागतो. अशा प्रकारे आधुनिक महाराष्ट्राच्या निर्मितीस प्रारंभ करून हा तेजस्वी, बुद्धिमान व परोपकारी देशभक्त केवळ तेहतीस-चौतीस वर्षांचा असतानाच निधन पावला, हे खरोखर महाराष्ट्राचे दुर्दैव होय !

(‘बाळशास्त्री जांभेकर : शताब्दी-स्मारक ग्रंथा’वरील आचार्य शं. द. जावडेकर यांनी दिलेल्या अभिप्रायातून, ‘रुची’ दिवाळी अंक, 1996 वरून उद्धृत)

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here