नारायण मेघाजी लोखंडे यांना भारतीय कामगार चळवळीचे जनक असे सार्थपणे म्हटले जाते. ते महात्मा जोतीराव फुले यांचे सहकारी होते, रावबहादूर होते. त्यांची भूमिका धर्म, जाती यांवरून कष्टकऱ्यांमध्ये, समाजात फूट पडू नये अशी होती. ते मराठा ऐक्येच्छू सभा, मराठा रुग्णालय यांचे संस्थापक होते. त्यांनी ‘पंचदर्पण’ या पुस्तिकेचे लेखन, ‘सत्यशोधक निबंधमाला’ अथवा ‘हिंदू धर्माचे खरे ज्ञान’ या पुस्तिकांचे लेखन; तसेच, ‘दीनबंधू’तून समाजाभिमुख परंतु परखड लेखन सातत्याने केले...