मोसम गणेशोत्सवाचा आहे. गणपती घरी बसवणाऱ्यांकडे धामधूम चालू आहे. गणेश ही देवता आता केवळ महाराष्ट्रापुरती राहिलेली नाही. मराठी समाज जेथे जेथे गेला तेथे तेथे महाराष्ट्राचे वैशिष्ट्य म्हणून गणपतीला घेऊन गेला. बघता बघता गणपती अन्य समाजातही पसरला आणि आता तो केवळ भारताला बांधणाराच नव्हे तर जगाला जोडणारा देव होऊ शकतो अशी चिन्हे दिसतात...
इतिहासात अनेक मराठा पराक्रमी घराणी होऊन गेली. मध्ययुगातील इतिहासप्रसिद्ध म्हणजे यादव राजघराणे. ते देवगिरी येथून राज्य करत होते. यादव राजवंशाची नाणी मुख्यतः सोने या धातूमध्ये आढळून येतात. यादवकालीन नाण्यांचे धातूची शुद्धता हे वैशिष्ट्य दिसून येते. त्यांनी चांदी व काही प्रमाणात तांबे या धातूंमध्येही नाणी पाडली...
अचलपूरची विदर्भ मिल केव्हाच बंद पडली. तेथे आणलेली ‘फिनले मिल्स’ही टिकू शकली नाही. परंतु ‘विदर्भ मिल्स’चे कामगार व कर्मचारी यांच्यासाठी बाबासाहेब देशमुख यांच्या पुढाकाराने बांधलेल्या वसाहतीतील सांस्कृतिक जीवन हा कित्येक दशकांसाठी तेथील रहिवाशांकरता ठेवा होऊन राहिला आहे. त्या कामगार-कर्मचाऱ्यांचे गणेशोत्सवापासून क्रिडास्पर्धेपर्यंत अनेकानेक ‘इव्हेण्टस’ होत. त्या प्रत्येक घटनेमधून मुलामाणसांसाठी नवा संस्कार प्रस्थापित होई. तेच तर त्या रहिवाशांचे ‘धन’ होते. त्यामुळे मिल चालू असणे वा बंद असणे याचा परिणाम त्यांच्या जीवनावर क्वचितच जाणवला असेल...
माझ्या मुरुड गावच्या गावकऱ्यांची भाषा अगदी रोखठोक ! ते बोलताना नाकाचा वापर करतात की काय, असे ऐकणाऱ्याला वाटेल. त्यांनी बरेचसे शब्द मोडून घेऊन मुखात बसवलेले आहेत. म्हणजे घ्यायचं, द्यायचं, करायचं असे म्हणायचे असेल तर ते घैचं, दैचं, कराचं असे बोलतात...
शिमग्याच्या म्हणजेच होळीच्या सणाच्या उत्सवातील ‘पिसईचा नकटा’ दापोलीत लोकप्रिय आहे. नकटा म्हणजे देवीचा रखवालदार. नकट्याचे सोंग घेणारी व्यक्ती लाकडी मुखवटा घालते. तो मुखवटा काजूच्या झाडाच्या खोडापासून बनवलेला असतो. तो परंपरेने चालत आलेला असतो. नकट्याचा मुखवटा पोराबाळांना भीतीदायक वाटतो...
वऱ्हाड प्रांतातील पुरातत्त्वीय स्थानांचा परिचय विवेक चांदूरकर या युवा संशोधकाने ‘उद्ध्वस्त वास्तू - समृद्ध इतिहास’ या पुस्तकात करून दिला आहे. या पुस्तकातील प्रत्येक नोंद ही ऐतिहासिक दस्तावेज ठरावा इतके मूल्य असलेली आहे. विदर्भाच्या सर्व जिल्ह्यांना ऐतिहासिक वास्तूंचा वारसा लाभला आहे...
रंभाजीराव बंडखोर वृत्तीचे होते. त्यांनी उत्तर आयुष्यात हातातील समशेर खाली ठेवली व लेखणी हातात घेतली. त्यांनी आदिशक्तीचे कलापूर्ण मंदिर करमाळा येथे बांधले. कमलादेवीच्या उत्सवाचा मुख्य दिवस कार्तिक वद्य चतुर्थीस असतो. त्या पूर्वी चार दिवस म्हणजे कार्तिकी पौर्णिमेपासून यात्रेची सुरुवात होते...
लेकुरवाडी टेकडी ही बुलढाणा जिल्ह्यातील खामगावजवळ आहे. संजय गुरव यांनी त्यांच्या पत्नीसह त्या टेकडीवर बीजारोपण, वृक्षारोपण, वनराई बंधारे, पक्षी निरीक्षण अशी कामे केली. त्यांचे काही मित्र त्यांच्या पत्नींसह या सामाजिक कार्यासाठी जोडले गेले. त्यांनी त्या ‘सत्संगा’चे नामकरण ‘नवरा-बायको फाऊंडेशन’ असे केले आहे. ती संस्था फक्त श्रमदानाकरता आहे ...
गणेशोत्सवाला 2022 साली तीनशेसेहेचाळीस वर्षे पूर्ण झाली. गणपती हा सर्व कार्यांत प्रथम पूजला जातो. ‘सुखकर्ता दुःखहर्ता...’ ही गणपतीची आरती रामदास स्वामी यांनी रचली आहे. त्यांनीच गणेशोत्सवाची कल्पनाही राबवली. याबाबतची पार्श्वभूमी महत्त्वाची आहे...
संतकवी रामदास स्वामी व हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना एकमेकांबद्दल आदर होता. लोकांमध्ये राष्ट्रप्रेम निर्माण व्हावे, संस्कृती रुजावी यासाठी शिवाजी राजे आणि रामदास स्वामी या दोघांनी मिळून गणेशोत्सव भाद्रपद शुद्ध चार ते माघ शुद्ध पाच म्हणजे गणेश जयंतीपर्यंत, पाच महिने 1675 साली साजरा केला...