Tag: वेंगुर्ला
दुर्गादास परब : शिस्तबद्ध, प्रामाणिक, कामसू…
सभोवताली नैराश्येचे वातावरण असताना नेहमीची चाकोरीबद्ध वाट सोडून नवी वाट चोखाळणारे शिस्तबद्ध, प्रामाणिक आणि कामसू अशी प्रतिमा असणारे दुर्गादास परब. दुर्गादास यांना ‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’तर्फे 2023 चा बाळासाहेब घमाजी मेहेर स्मृतिप्रित्यर्थ ‘जीवन प्रतिभा पुरस्कार' देऊन गौरवण्यात आले आहे…
मुराद बुरोंडकर यांचे आंबा संशोधन
मुराद महम्मद बुरोंडकर यांचे कर्तृत्त्व दापोलीत, विशेषत: कोकण कृषी विद्यापीठात बहरले; परंतु नियतीचा भाग असा, की मुराद बुरोंडकर यांनी बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातून 2021 साली स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि त्याच वर्षी त्यांचे कोल्हापूर येथे आकस्मिक निधन झाले...
दशावतारात अब्दुल नदाफ यांच्या नव्या नायिका (Abdul Nadaf – Popular Star of Dashavtari –...
अब्दुल नदाफ यांनी दशावतार कलेमध्ये खास करून स्त्रीभूमिका साकारल्या. त्यांनी खरा कलाकार जातिधर्माच्या बंधनात अडकून पडत नाही हे समाजाला दाखवून दिले. कलेसाठी त्यांची तळमळ पाहून, त्याबद्दलचे कौतुक प्रेक्षकांच्या उत्स्फूर्त प्रतिक्रियांत उमटते…
मी, सरस्वती नाईकांची लेक ! (Womens struggle to get education during early British Raj)
सावित्रीबाई फुले यांनी स्त्रियांत शिक्षणाचे फार मोठे काम केले, पण त्यांच्याच काळात अनेक अनाम एकाकी स्त्रियांनी देशाच्या कानाकोपऱ्यात राहून तसेच काम केले आहे ! त्यापैकीच एक माझी पणजी सरस्वती नाईक. म्हणून मी म्हणते, "मी सरस्वती नाईकांच्या लेकीच्या लेकीची लेक आहे"...
आदिलशाही आणि स्थापत्य (Architecture in Adilshahi Period)
प्राचीन दाभ्यपुरी म्हणजे आजचे दाभोळ ! ते कोकणातील बंदर. ते विदेशी व्यापारामुळे प्राचीन काळापासून भारताच्या मध्ययुगीन काळापर्यंत गजबजलेले असे. अनेक राजवटींचा तेथे संबंध आला. त्यांपैकीच एक आदिलशाही. पोर्तुगीज सेनापती आफांसो द आल्बुकर्कने गोवा जेव्हा 1510 साली जिंकून घेतले, तेव्हा आदिलशाहीकडे दाभोळ हेच एक मोठे बंदर उरले !...