Tag: वरोरा तालुका
सीताफळांचे वैभव – खेमजई
चंद्रपूर जिल्ह्याच्या वरोरा तालुक्यातील खेमजई गावामध्ये निराळाच प्रयोग राबवण्यात येत आहे. खेमजई हे गाव सीताफळांसाठी प्रसिद्ध होते. त्या गावातील सीताफळाच्या झाडाचे जे फळ असे त्याची चव लोकांना फार आवडायची. तरुण ग्रामपंचायत सदस्यांच्या सूत्रसंचालनाखाली गाव एकत्र आले. सीताफळ लागवडीचा कार्यक्रम आखला, रोपवाटिका निर्माण केली, ‘मनरेगा’शी जोडून महिलांना लागवडीचे काम दिले गेले. त्यामुळे सीताफळांचे वन पुन्हा साकारण्याची आशा तयार झाली आहे. त्याच बरोबर ‘सीडबॉल’ची कल्पना राबवून साऱ्या गावकऱ्यांनी गावाभोवतीच्या पडिक, उजाड जमिनीत वृक्षराजीचा संकल्प सोडला आहे...
झाडीचा हिरा – मानाचा तुरा : हिरालाल पेंटर (Hiralal Painter – Versatile Actor...
हिरालाल पेंटर हा विनोदाची खाण आणि टायमिंगची उत्तम जाण असणारा विदर्भातील कसदार अभिनेता आहे. तो ‘विनोदाचा बादशहा - हिरालाल पेंटर’ म्हणून झाडीपट्टीत प्रसिद्ध आहे. त्याचा जन्म ब्रह्मपुरी तालुक्यातील मालडोंगरी या छोट्याशा गावात झाला. तो त्याची ओळख ‘आठवी पास, नववी नापास !’ अशीच करून देतो...
चंद्रपूर जिल्ह्यातील रामदेगी (Ramdegi)
रामदेगी हे चंद्रपूर जिल्ह्यातील निसर्गरम्य पण फार परिचित नसलेले ठिकाण. रामदेगी वरोरा तालुक्यात आहे. आनंदवनापासून शेगाव बुद्रुक हे आठवडी बाजाराचे गाव ओलांडले, की पुढे...