Home Authors Posts by किशोर पेटकर

किशोर पेटकर

1 POSTS 0 COMMENTS
किशोर पेटकर, रेल्वेच्या विधी विभागात नागपूर येथे कार्यरत. लेखन व व्यंगचित्र रेखाटन हा छंद- काही कथा प्रसिद्ध. स्वत:च्या शेगाव(बु) गावी ‘कवितेचे घर’ नावाची काव्यप्रसारासाठी अभिनव कल्पना; तसेच, ‘विकास ग्रूप’ नावाच्या गावोगाव प्रसार होत असलेल्या चळवळीत सहभाग.

सीताफळांचे वैभव – खेमजई

चंद्रपूर जिल्ह्याच्या वरोरा तालुक्यातील खेमजई गावामध्ये निराळाच प्रयोग राबवण्यात येत आहे. खेमजई हे गाव सीताफळांसाठी प्रसिद्ध होते. त्या गावातील सीताफळाच्या झाडाचे जे फळ असे त्याची चव लोकांना फार आवडायची. तरुण ग्रामपंचायत सदस्यांच्या सूत्रसंचालनाखाली गाव एकत्र आले. सीताफळ लागवडीचा कार्यक्रम आखला, रोपवाटिका निर्माण केली, ‘मनरेगा’शी जोडून महिलांना लागवडीचे काम दिले गेले. त्यामुळे सीताफळांचे वन पुन्हा साकारण्याची आशा तयार झाली आहे. त्याच बरोबर ‘सीडबॉल’ची कल्पना राबवून साऱ्या गावकऱ्यांनी गावाभोवतीच्या पडिक, उजाड जमिनीत वृक्षराजीचा संकल्प सोडला आहे...