Home Tags रांगोळी

Tag: रांगोळी

ज्ञानकमळ रांगोळी (Dnyankamal Rangoli)

ज्ञानकमळ नावाची एक रांगोळी प्रसिध्द आहे. त्या रांगोळीच्या मागे अंधश्रध्दा अशी होती, की ग्रहणाच्या काळात ज्ञानकमळ काढण्यास शिकले, की बुध्दी वाढते ! मी एका ग्रहणकाळातच ज्ञानकमळ रेखाटण्यास शिकले. या रांगोळीसाठी गणिती तत्त्व (मॅथेमॅटिकल फॉर्म्युला) वापरला जातो. मी माझे बालपण संपल्यानंतर कित्येक वर्षांत ते ज्ञानकमळ काढले नाही, पण तरी संख्यांचा तो क्रम पक्का डोक्यात बसला. शेकडो वर्षांपूर्वी कोणातरी पणजी वा खापरपणजीने हा क्रम ठरवून ज्ञानकमळाची रचना केली असणार, तिला संख्याज्ञान असेल का? की फक्त 1 ते 10 आकडे मोजता येत असतील? असे प्रश्न माझ्या मनात अनेकदा उठले...

गल्लीतली दिवाळी सुट्टी (Diwali Vacation in Good Old Days!)

आमची गल्ली म्हणजे राजारामपुरी अकरावी गल्ली, कोल्हापूर. आमच्या लहानपणी आम्ही या गल्लीत राहत असू. सहामाही परीक्षा संपली की शाळेला दिवाळीची सुट्टी लागायची. त्यावेळच्या दिवाळी सुट्टीचे, दिवाळीच्या अगोदरची आणि दिवाळीच्या नंतरची सुट्टी असे सरळ सरळ दोन भाग करता येत. त्या काळातल्या आठवणींनी डोळे क्षणभर पाणावतात. केवळ क्षणभरच... आजच्या सुट्टीतली मजा विकत घेतलेली असली तरी... सोयीची आहे... कालसुसंगत आहे... हे जाणवत राहतं...

मराठवाडा : सण बाई दिवाळीचा राजा

0
मराठवाड्यातील दिवाळी खास आहे ती काही परंपरांमुळे. रेड्यांच्या टकरी, शेणापासून बनवलेले गोकुळ, म्हशींची मिरवणूक, गाई-म्हशींना ओवाळणे हे सारे कृषिसंस्कृतीतून, लोकसंस्कृतीतून झिरपलेले टिकून आहे...

गिरगावची दिवाळी – फराळ, अंघोळ, आकाशकंदिल…

पाठारे प्रभू ज्ञातीचे वास्तव्य दक्षिण मुंबईत प्राधान्याने होते. ते स्वतःला अस्सल मुंबईकर मानतात. त्या ज्ञातीमध्ये वर्षभर सर्व सण धूमधडाक्यात साजरे करण्याची परंपरा आहे. दिवाळीत पाठारे प्रभू पद्धतीचे सुकडी, तवसे, शिंगडी, भानवले, पंगोजी, मुम्बरे, बुंदीचे कडक लाडू असे पदार्थ केले जात. त्यांच्या पारंपरिक पदार्थांबरोबरच तेथील विशिष्ट प्रकारच्या रांगोळ्या प्रसिद्ध होत्या. असे म्हणतात, की त्या रांगोळ्या बघण्यास त्या काळी ब्रिटिश अधिकारी घोडागाडीतून येत...
_rangoli

महागाव – रांगोळी कलेचे गाव

कोल्हापूर जिल्ह्याच्या गडहिंग्लज तालुक्यामधील ‘महागाव’ला रंगांच्या उधळणीचा, ‘रांगोळींचा वारसा’ लाभला आहे! तोही फार जुना नव्हे, जेमतेम चाळीस वर्षांचा, पण तो मुरला आहे असा, की...
rangoli

रांगोळी – पारंपरिक संस्कृती

‘रांगोळी’ शब्दाची उत्पत्ती संस्कृत शब्द ‘रंगावली’वरून झाली आहे. तो मूळ शब्द ‘रंग’ आणि ‘आवली’ अर्थात पंक्ती यांच्यापासून बनला आहे; त्याचाच अर्थ रंगांची पंक्ती म्हणजे...
-heading-chaitrangan

रांगोळीत रांगोळी – चैत्रांगण (Chaitrangan)

वसंत उत्सवाची सुरुवात झाडांना नवी पालवी फुटून होते. तो नव्या देहाचा जन्म जुने-जीर्ण टाकून देऊन झालेला असतो. सृष्टीचा तो सोहळा पाहून मन प्रसन्न होते...

शिवाजीराजांची रांगोळी अकरा एकरांत; कोपरगावात

0
कोपरगावच्या बारा वर्षें वयाच्या सौंदर्या संदीप बनसोड हिला रांगोळी काढण्याचा छंद आहे. तिने तिची कला जनतेसमोर यावी यासाठी नगर-मनमाड महामार्गावर, कोपरगावजवळ राजेंद्र फुलफगर यांच्या...
carasole_01

प्रतीकदर्शन रांगोळी

रांगोळी हे शुभचिन्ह म्हणून भारतीय संस्कृतीचे आणि संस्कारांचे प्रतीक आहे. भारतात घरातील देवघरापुढे किंवा अंगणात छोटीशी का होईना रांगोळी रोज काढतात. दिवाळी ह्या सणाचे...
carasole

रांगोळी-नृत्यकलाकार – भूषण पाटील

9
जूचंद्र हे गाव रांगोळी कलाकारांसाठी प्रसिद्ध आहे. ते ठाणे जिल्ह्याच्या वसई तालुक्यात येते. जूचंद्रचे कलाकार प्रसिद्धीच्या झोतात नव्वदच्या दशकापर्यंत फारसे नव्हते. परंतु तेव्हा सुनील...