Home Tags मेघदूत

Tag: मेघदूत

मेघदूत: आषाढस्य प्रथम दिवसे… (Meghdut- First day of the month of Ashadh)

1
आषाढ महिन्याच्या पहिल्या दिवसाला सुजाण भारतीयांच्या मनात एक विशेष स्थान आहे. आश्चर्य म्हणजे हे स्थान कोणत्या एखाद्या सणामुळे किंवा घटनेमुळे नाही तर एका खंडकाव्यातील ओळीमुळे आहे. कविकुलगुरू कालिदास यांच्या ‘मेघदूत’ या खंडकाव्याच्या दुसऱ्या श्लोकात ‘आषाढस्य प्रथम दिवसे’ हा शब्दसमूह येतो. ‘मेघदूत’ या काव्याने अनेकांना भुरळ घातली आहे. बहुतेक सर्व भारतीय भाषांमध्ये आणि इंग्लिश, फ्रेंच, जर्मन या युरोपिय भाषांमध्ये त्याची भाषांतरे झाली आहेत. मराठीतच किमान सहा भाषांतरे उपलब्ध आहेत. अशा या अद्वितीय खंडकाव्याचा परिचय गीता जोशी रसिकतेने आणि मर्मग्राही दृष्टीने करून देत आहेत...

कहीं ये वो तो नहीं ?… भाग दोन (Musings)

ज्या प्रेक्षकाकडे पूर्वानुभव असतो त्याच्यापर्यंत दृश्यात सूचित होणाऱ्या या संवेदना दृश्य आणि ध्वनीतून पोचतात. चंद्रमल्लिकेचा, चंदनाचा गंध, चाफ्याच्या रंगाच्या साडीचा रंग, जवळिकीतून होणारा अस्पष्ट स्पर्श, येणारा अंगगंध या संवेदना दृश्यातल्या संवादातून आणि दृश्याच्या रचनेतून प्रेक्षकापर्यंत पोचतात. त्यातून संयत शृंगार रसाची निष्पत्ती होते. विविध कलांचा अनुभव देणाऱ्या संवेदनांचा अनुभव देणारा सिनेमा. आज विश्वाच्या संवेदनांना व्यापून राहिलेल्या ‘सिनेमा’तले हे काही सुंदर क्षण. किती वेचावेत, किती मोजावेत...

ऋतु बरवा : सहा ऋतूंचे सहा सोहळे… ( Rutu Barwa – ...

वातावरणातील ऋतुचक्र सूर्याच्या दक्षिणोत्तर गतीमुळे निर्माण होते. म्हणजे ऋतू सूर्यसंक्रांतीवर अवलंबून असतात. ती वस्तुस्थिती महाभारत काळातदेखील माहीत होती. असे असताना, दुर्गाबाईंनी चांद्रमासांवर आधारित ऋतुचक्र का लिहिले हा मला पडलेला प्रश्न आहे... ऋतुचक्राचा मेळ चैत्र, वैशाख वगैरे चांद्रमासांशी बसत नाही. मी मराठवाड्याच्या रखरखीत पठारावर जन्मलो. अठ्ठावन्न वर्षे तिकडेच काढली. पुण्याला आलो तो येथील झाडांच्या ओढीने. पुणे हे सर्वाधिक वृक्षविविधता असलेले, अतिशय वृक्षसमृद्ध असे शहर आहे हे मला वाचून माहीत होते. येथे सह्याद्री आहे. चार नद्या आणि सात धरणे आहेत...

कालिदासाचा मेघ (Kalidas’s cloud – How real was it?)

शिक्षा भोगत असलेला, विरहव्याकूळ यक्ष, कसेही करून त्याची खुशाली त्याच्या प्रिय पत्नीपर्यंत पोचवण्यासाठी दूत म्हणून मेघाची योजना करतो. हा मेघ ‘पुष्करावर्तकां’च्या प्रख्यात कुळात जन्मला असल्याचा उल्लेख ‘मेघदूता’च्या सहाव्या श्लोकात आला आहे. मेघांविषयी अधिक आणि महत्त्वाची; तसेच, रंजक माहिती ‘बोरवणकर- किंजवडेकर’ यांनी त्यांच्या पुस्तकात दिली आहे. मल्लिनाथाने ‘पुष्कर’ आणि ‘आवर्तक’ अशी मेघांची दोन निरनिराळी कुळे मानली आहेत...

संस्कृत महाकवी कालिदास (Great Sanskrit Poet)

कालिदास हा महाकवी मानला जातो. त्याच्या कार्यकाळाविषयी विद्वानांमध्ये एकवाक्यता नाही. इसवी सनपूर्व पहिल्या शतकापासून ते इसवी सनाच्या सातव्या शतकापर्यंतचा वेगवेगळा कालावधी, कालिदासाचा कार्यकाळ म्हणून वेगवेगळ्या विद्वानांनी नोंदवलेला आहे. त्याच्या जन्मस्थानाविषयीही ठोस अशी माहिती उपलब्ध नाही. बहुतांश विद्वानांच्या मते, उज्जयिनी ही त्याची जन्मभूमी होय. कालिदासाने चाळीसहून अधिक ग्रंथांची रचना केली, पण त्या सर्व रचना करणारा कालिदास हा एकच नव्हता तर, कालिदास नावाचे अनेक कवी असल्याचाही एक मतप्रवाह आहे...

कुबेर – देवांचा खजिनदार (Treasury Man from God’s World)

हिंदू पुराणांप्रमाणे, कुबेर हा देवांचा खजिनदार आणि उत्तर दिशेचा दिक्पाल समजला जातो. कुबेराचे खरे नाव सोम आहे. त्याला धनाची देवता म्हणून धनेश असेही म्हटले जाते. तो स्वामी सगळ्या यक्षांचा आहे. त्याला भगवान शिवाचा द्वारपाल असेही म्हटले जाते. तो विश्रवस् ऋषींचा पुत्र आणि लंकाधिपती रावणाचा सावत्र भाऊ होता. कुबेर हाही एक यक्षच होता, पण तो इतर यक्षांप्रमाणे देखणा नव्हता. तो कुरूप आणि बेढब होता...

अष्टनायिका (Assets of Heroines on Sanskrit stage)

अष्टनायिकांचे उल्लेख संस्कृत साहित्यात वारंवार येतात. अष्टनायिकांविषयी जी माहिती कोशामध्ये आहे त्यात कृष्णाच्या आठ प्रमुख पत्नी, नंतर इंद्राच्या दरबारातील अष्टनायिका, त्यानंतर आठ प्रकारच्या ‘शृंगारनायिका’आढळतात, पण सर्वात जास्त चर्चिल्या गेलेल्या आणि कामशास्त्रापासून नाट्यशास्त्र व साहित्यशास्त्र येथपर्यंत ज्यांचे उल्लेख अनेकवार आढळतात, त्या म्हणजे भरताच्या नाट्यशास्त्रात वर्णन केलेल्या अष्टनायिका...

कालिदासाचा यक्ष आणि यक्षांच्या अष्टसिद्धी (Kalidas’s Yaksha and Yaksha’s achievements)

अमरकोशानुसार, दहा देवयोनी आहेत- विद्याधर, अप्सरा, यक्ष, राक्षस, गंधर्व, किन्नर, पिशाच्च, गुह्यक, सिद्ध आणि भूत. त्यांपैकी ‘यक्ष’ हा ‘मेघदूता’चा कथानायक होय. सर्वसाधारणपणे, यक्ष हा देखणा, ऐश्वर्यसंपन्न, सुखात आकंठ बुडालेला, पत्नीवर अत्यंत प्रेम असलेला आणि माणसांच्या दृष्टीने अतीन्द्रिय शक्ती ज्याच्यापाशी आहेत असा मानला जातो. सर्व यक्ष हे कुबेराचे सेवक. कुबेर हा त्यांचा स्वामी. यक्षांवर जबाबदारी कुबेराच्या उद्यानांचे आणि कोशाचे रक्षण करण्याची असे. कालिदासाच्या ‘मेघदुता’तील कथानायक यक्षाने त्याच्यावर सोपवण्यात आलेल्या कामात कुचराई केली आणि त्याला कुबेराच्या क्रोधाला सामोरे जावे लागले...

‘अ’चे सहा अर्थ

नामाच्या किंवा विशेषणाच्या आधी जोडल्या जाणाऱ्या ‘अ’ला असलेले सहा अर्थ ग्रंथित करणारा श्लोक असा आहे – तत्सादृश्यमभावश्च तदन्यत्वं तदल्पता । अप्राशस्त्यं विरोधश्च नञर्थाः षट् प्रकीर्तिताः...

शेवगावचे रमेशसर – विविधांगी कर्तृत्व

शेवगावचे रमेश भारदे यांना शिक्षणसम्राट होणे सहज शक्य होते, तसे राजकीय संबंधही त्यांचे होते; पण ते शिक्षक झाले ! आणि नंतर सेवाभाव, ध्येयनिष्ठ असे शिक्षणसंस्था चालक बनले. त्यांच्या या कर्तबगारीचा केवळ शेवगाव नव्हे तर नगर जिल्ह्यावर एक वेगळा ठसा उमटला आहे. रमेश भारदे यांनी ज्ञानदानाचे व्रत अखंड जपले...