रेखा नार्वेकर हे नाव मुंबई-कोकण परिसरात तरी, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात सर्वपरिचयाचे आहे. लेखिका-कवयित्री-ज्ञानेश्वरीच्या रसाळ प्रवचनकर्त्या आणि साहित्यिक समारंभातील जिव्हाळ्याचा वावर...सदैव हसतमुख आणि प्रसन्न चेहरा. त्या शिकल्या विज्ञानशाखेत, पण त्यांनी कास धरली साहित्यकलेची. त्यांनी हौसेने कथा, ललित गद्य लिहिले, कविता केल्या. त्यांच्या त्या साहित्याचे संग्रह प्रसिद्ध आहेत...