Tag: भारूड
लोककलांचा वारसा: भारूड आणि कीर्तन (Folk Arts – A Cultural Heritage)
महाराष्ट्राला लोककलांची समृद्ध परंपरा आहे. लोकनाट्य, वगनाट्य, दशावतार, तमाशा, कीर्तन, भारूड, पोवाडा अशा लोककलांशी सर्वसाधारण मराठी माणसाचा परिचय असतो. या सर्व कला ही मनोरंजनाची साधने आहेत. सहजता, उस्फूर्तता ही लोककलांची वैशिष्ट्ये. अशा अनेक लोककलांनी महाराष्ट्र समृद्ध आहे. त्यांपैकीच दोन लोककला म्हणजे 'भारूड' आणि 'कीर्तन'. मनोरंजनातून प्रबोधन हे ह्या दोन्ही लोककला प्रकारांचे वैशिष्ट्य आहे. लेखात भारूड आणि कीर्तन या लोककलांच्या विविध प्रकारांचा परिचय करून दिला आहे...
सर्जनशील शेगाव – कवितेचे घर आणि स्व-विकास ग्रूप असलेले (Innovative Shegaon’s House of Poetry...
व्यक्त होणे हे मनमोकळ्या स्वभावाचे लक्षण असते. छोट्या मुलांना आणि स्त्री-पुरुषांना अभिव्यक्तीचे व्यासपीठ निर्माण करून देणारे श्रीकांत पेटकर आणि त्यांचे बंधू किशोर यांनी त्यांच्या शेगाव बुद्रुक या गावी ‘कवितेचे घर’ची स्थापना केली आहे. त्याबरोबर आपण जेथे राहतो, तेथे अर्धवट अशी सार्वजनिक सरकारी कामे पडलेली असतात...रस्ते नाहीत, खड्डे-गटार नाही, पाणी नाही अशा अनंत सरकारी गैरसोयी ! त्यावर कोणी तरी येऊन ते काम करेल अशी वाट न पाहता, त्यांनी निर्माण केलेला अनुकरणीय असा ‘व्हॉट्सॲप’वरील ‘विकास ग्रूप’...
ओरिया- मराठी नाते
कोणत्याही नवख्या प्रांताशी ओळख करून घेण्याची पहिली पायरी म्हणजे तेथील स्थानिक भाषा. मी ओरिया भाषेचे प्राथमिक शिक्षण मसुरीच्या आयएएस प्रशिक्षणादरम्यान सौदामिनी भुयाँ यांच्याकडून घेतले होते. त्यांची शिकवण्याची पद्धत छान होती...
मराठी नाटकाची पूर्वपरंपरा (Marathi Stage has long tradition)
नाटक, दशावतार, भारूड, कीर्तन असे कोणतेही नवनवे कलाप्रकार एकाएकी जन्माला आलेले नाहीत. त्यांना पूर्व परंपरा आहे. ते घटक आणि काळाबरोबर विकसित होत असलेल्या नवनवीन कल्पना यांच्या एकत्रीकरणातून नवे ताजे काही जन्माला येते...
भारूड
संतांनी सर्वसामान्य लोकांना अध्यात्माची शिकवण सोप्या भाषेत देण्यासाठी ओवी, अभंग, भारूड अशा वेगवेगळ्या काव्यरचना केल्या. त्यांतील रूपकात्मक आणि जनसमुदायासमोर नाट्यमय रीतीने सादर केली जाणारी रचना म्हणजे भारूड. एकनाथपूर्व काळात ज्ञानेश्वर आणि नामदेव यांनी तर एकनाथांच्या पश्चात तुकाराम आणि रामदास यांनीही भारूडे रचली. असे असले तरी एकनाथांची भारूडे सर्वांत लोकप्रिय झाली. त्यामुळेच ‘ओवी ज्ञानेशाची’, ‘अभंग तुकयाचा’ तसे ‘भारूड नाथांचं’ असे म्हटले जाते...