होट्टल गावाची ख्याती शिवमंदिरांचे गाव म्हणून सर्वदूर आहे. तेथे चार भव्यदिव्य शिवमंदिरे आढळतात- सिद्धेश्वर, रेब्बेश्वर, सोमेश्वर आणि परमेश्वर अशी त्यांची नावे. शिवमंदिरांची उभारणी अकराव्या शतकात झाली. नितांतसुंदर अशा शिल्पकलेने नटलेली अशी ती शिवमंदिरे आहेत. होट्टल ही कल्याणीच्या चालुक्यांची उपराजधानी होती. बदामी ही मुख्य राजधानी होती. होट्टलची बुट्टीजत्रा ही आगळीवेगळी आहे...