विधवा स्त्रीला समाजाने कायम दुय्यम स्थान दिलेले आहे. त्या या विधवा प्रथेला बळी पडल्या आहेत. त्या त्या काळातील विचारवंतांनी, समाजसुधारकांनी त्याविरुद्ध आवाज उठवून, त्याबाबत समाजात प्रबोधन केले, चळवळीही उभारल्या. परंतु एकविसाव्या शतकातील विज्ञानवादी व प्रगतशील समाजात विधवा प्रथेसारख्या जोखडात स्त्री भरडली जाते. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने विधवा प्रथा निर्मूलनासाठी घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे...
न्यायमूर्ती रानडे यांच्या प्रकृतीसाठी त्यांच्या पत्नी रमाबाई यांनी करमाळा येथील खोलेश्वर देवास साकडे घातले. तेथे त्यांच्या बरोबर स्थानिक मुसलमान डॉक्टर होते आणि रानडे यांची अधिक काळजी घेण्यास पुण्याहून डॉक्टर आले ते विश्राम खोले. ते ज्योतिबांच्या संस्थेत काम करणारे. असे सामाजिक समन्वयाचे वातावरण महाराष्ट्रात एकोणिसाव्या शतकाअखेरीस होते. रमाबाईंच्या पुस्तकातील तो किस्सा जाणण्यासारखा आहे...
कल्याण इनामदार आकाशवाणी आणि दूरदर्शन यांचे मान्यताप्राप्त कवी होते. त्यांच्या कवितेतून रचना, अभिव्यक्ती, आशय-विषय यांची विविधता आणि नादमयता यांचा सुखद प्रत्यय येतो. इनामदार यांची पाऊणशे पुस्तके प्रकाशित आहेत. त्यांना ‘कवितेचा ध्यास आणि कविताच त्यांची श्वास’ बनली...
श्री.के. क्षीरसागर म्हणजेच श्रीकेक्षी हे निर्भय आणि नि:स्पृह वृत्तीचे समीक्षक होते. ते सावरकर आणि पटवर्धन यांच्या भाषाशुद्धीविषयक विचारांवर ‘सह्याद्री’ मासिकातून परखड टीका केल्याने प्रकाशात आले. त्यांनी भाई डांगे यांच्या मार्क्सवादी भूमिकेवर व साने गुरुजी यांच्या उपदेशप्रधान वाङ्मयीन भूमिकेवरही टीका केली...
प्रतिभावंत लेखक, शाहीर आणि समाजसुधारक अवलिया म्हणजे अण्णाभाऊ साठे होत. अण्णाभाऊ यांचे स्वलिखित ‘फकिरा’ कादंबरीवर चित्रपटनिर्मिती करावी हे स्वप्न होते. अण्णाभाऊ यांच्या स्वप्नपूर्तीसाठी शेवगाव तालुक्यातील सामनगाव येथील चार-पाच शेतकरी एकत्र आले आणि स्वत:च्या जमिनी तारण ठेवून त्यांनी ‘फकिरा’ या चित्रपटाची निर्मिती केली. पण त्याचा शेवट मात्र शोकाकुल झाला...
बाबुराव भारस्कर यांच्यावर गांधीवादाचे संस्कार झाले. ते मातंग समाजातून कॅबिनेट मंत्रीपदापर्यंत पोचलेले साठच्या दशकातील पहिले नेते. बाबुराव यांनी वंचित घटकांच्या विकासासाठी मोलाचे योगदान दिले...
बोधेगावातील ‘बानुबाई’ नामक आध्यात्मिक दृष्ट्या प्रगत अशी एक मुस्लिम स्त्री म्हणजेच बन्नोमाँ. त्या शिर्डीचे साईबाबा यांच्या समकालीन असून आध्यात्मिक व योगशक्तीच्या धनी होत्या. बन्नोमाँ देवी बोधेगावचे ग्रामदैवत आहे...
उत्तर अमेरिकेतील सर्व मराठी मंडळांना एका छत्राखाली आणण्यासाठी स्थापन केलेली संस्था म्हणजे बृहन्महाराष्ट्र मंडळ (बी एम एम). ती संस्था दर दोन वर्षांनी एखाद्या सबळ मंडळाला यजमानपद देऊन अधिवेशन म्हणजे सर्व मराठी मंडळांचे संमेलन घडवून आणते. तो सोहळा यावर्षी न्यू जर्सी येथील ‘मराठी विश्व’ या संयोजक संस्थेच्या वतीने साजरा होत आहे. प्रशांत कोल्हटकर हे अधिवेशनाचे निमंत्रक आहेत...
काळ सरतो, माणसे अंतरतात. पण, त्यांच्या आठवणी मात्र अजरामर राहतात. दादा कोंडके यांच्यासारख्या कसलेल्या, हजरजबाबी कलाकाराने घेतलेली फिरकी, केलेल्या कोट्या आयुष्यभराची पुंजी होऊन जातात.
हिंदुस्थानी महिलेने लिहिलेले आणि इंग्लंडमध्ये प्रकाशित झालेले पहिले पुस्तक मराठी लेखिकेचे होते. ते लंडनमध्ये 1895 साली प्रसिद्ध झाले. त्या पुस्तकाचे नाव Ratanbai - A Sketch of a Bombay High Caste Young Wife. त्या पुस्तकाच्या लेखक शेवंतीबाई निकंबे या होत्या. पुस्तकाच्या सतरा आवृत्त्या 1895 ते 2017 या काळात निघाल्या...