बोरी अरब हे गाव यवतमाळ जिल्ह्याच्या दारव्हा या तालुक्यात येते. तेथील नदीला अडान नदी म्हणतात. त्या नदीमध्ये असलेल्या एका ठिकाणाला ‘लगीनबुडी’ असे म्हणतात. त्या गावचे माठ आणि चहा प्रसिद्ध आहेत. तेथे कापसाचा कारखानाही आहे...
पंचेचाळिसावे मराठी साहित्य संमेलन गोव्यात मडगाव येथे 1964 साली आयोजित करण्यात आले होते. त्या संमेलनाचे अध्यक्ष ज्ञानपीठ पुरस्कार सन्मानित कविश्रेष्ठ कुसुमाग्रज होते. त्यांना सहा भाऊ आणि कुसुम नावाची लहान बहीण होती. कुसुम ही एकुलती एक बहीण असल्याने शिरवाडकर यांनी कुसुमचे अग्रज अर्थात कुसुमाग्रज हे टोपणनाव धारण केले.
गावोगावच्या स्मशानभूमीप्रमाणे नाशिक जिल्ह्यातील लासलगावनजीक पिंपळगावची स्मशानभूमी आहे. मात्र तिच्या आजुबाजूचा परिसर स्थानिक लोकांसाठी रोज सकाळी- रात्री नैसर्गिक विधी उरकण्याचे निवांत ठिकाण बनून गेला...