अष्टनायिकांचे उल्लेख संस्कृत साहित्यात वारंवार येतात. अष्टनायिकांविषयी जी माहिती कोशामध्ये आहे त्यात कृष्णाच्या आठ प्रमुख पत्नी, नंतर इंद्राच्या दरबारातील अष्टनायिका, त्यानंतर आठ प्रकारच्या ‘शृंगारनायिका’आढळतात, पण सर्वात जास्त चर्चिल्या गेलेल्या आणि कामशास्त्रापासून नाट्यशास्त्र व साहित्यशास्त्र येथपर्यंत ज्यांचे उल्लेख अनेकवार आढळतात, त्या म्हणजे भरताच्या नाट्यशास्त्रात वर्णन केलेल्या अष्टनायिका...