न्यायमूर्ती रानडे यांच्या प्रकृतीसाठी त्यांच्या पत्नी रमाबाई यांनी करमाळा येथील खोलेश्वर देवास साकडे घातले. तेथे त्यांच्या बरोबर स्थानिक मुसलमान डॉक्टर होते आणि रानडे यांची अधिक काळजी घेण्यास पुण्याहून डॉक्टर आले ते विश्राम खोले. ते ज्योतिबांच्या संस्थेत काम करणारे. असे सामाजिक समन्वयाचे वातावरण महाराष्ट्रात एकोणिसाव्या शतकाअखेरीस होते. रमाबाईंच्या पुस्तकातील तो किस्सा जाणण्यासारखा आहे...
प्रतिभावंत लेखक, शाहीर आणि समाजसुधारक अवलिया म्हणजे अण्णाभाऊ साठे होत. अण्णाभाऊ यांचे स्वलिखित ‘फकिरा’ कादंबरीवर चित्रपटनिर्मिती करावी हे स्वप्न होते. अण्णाभाऊ यांच्या स्वप्नपूर्तीसाठी शेवगाव तालुक्यातील सामनगाव येथील चार-पाच शेतकरी एकत्र आले आणि स्वत:च्या जमिनी तारण ठेवून त्यांनी ‘फकिरा’ या चित्रपटाची निर्मिती केली. पण त्याचा शेवट मात्र शोकाकुल झाला...
बाळासाहेब भारदे यांची कुशल राजकारणी, गांधीवादी नेता अशी ओळख आहे. त्यांना इंदिरा गांधी यांनी यशवंतराव चव्हाण यांची साथ सोडून मुख्यमंत्री व्हावे असा निरोप दिला. बाळासाहेबांनी काळाची पावले ओळखून पदत्याग केला, परंतु निष्ठा सोडली नाही...
बाबुराव भारस्कर यांच्यावर गांधीवादाचे संस्कार झाले. ते मातंग समाजातून कॅबिनेट मंत्रीपदापर्यंत पोचलेले साठच्या दशकातील पहिले नेते. बाबुराव यांनी वंचित घटकांच्या विकासासाठी मोलाचे योगदान दिले...
कांबी गावचे महालक्ष्मी मंदिर हेमाडपंथी स्थापत्यशैलीत बांधलेले आहे. गाभाऱ्यात छतावर कोरलेली महालक्ष्मीची मूर्ती हे त्याचे मुख्य वैशिष्ट्य. महाराष्ट्रातील कोल्हापूरच्या अंबाबाईनंतर कांबीच्या महालक्ष्मीची महती सांगितली जाते…
पुण्याच्यामाऊली पानपट्टीने पुणेकरांच्या जीवनात दोन-पाच वर्षांत वेगळेच स्थान मिळवले आहे. पौड रोडवरील पानाच्या टपरीपासून सुरू झालेला पानपट्टीचा तो ब्रँड आता पुण्यात पाच ठिकाणच्या दुकानात मिळतो. थुंकण्याची गरज नसलेले व पचनाला पोषक अशा
नगरी बोली ही ठळकपणे उठून दिसणारी नाही; पण तिच्यात स्वतःचे असे वेगळेपण आहे. अहिराणी, वऱ्हाडी, तावडी, कोकणी, कोल्हापुरीया मराठीच्या बोलींना जसे स्थान लाभले तसे नगरी बोलीला मिळालेले नाही. पण ‘काय करू राह्यला?’,
नगरच्या अजित कुलकर्णीला सिनेनट आमीरखान याच्याबरोबर अर्धा-पाऊण तास घालवण्यास मिळाला होता. अजितला आमीरखानचे उमदेपण आवडले, तो सभोवतालचे जीवन जिव्हाळ्याने पाहतो व उत्सुकतेने प्रश्न विचारतो हेही जाणवले. त्याला आमीरखान आवडला, परंतु तो आमीरखानच्या भेटीमुळे एक्साईट झाला नाही.