‘माझ्या मना लागो छंद गोविंद-नित्य गोविंद’ ही भावना माझ्या मनात वृद्धिंगत होण्यासाठी कारण घडले, ते म्हणजे आमची मैत्रीण, निवृत्त झाल्यानंतर तिच्याकडून आम्ही घेतलेली गीतेची संथा; आणि तीसुद्धा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून! म्हणजे ‘व्हॉट्स अॅप व्हॉइस मेसेज’चा वापर करून. संजयाला महाभारतात जशी कुरुक्षेत्रावर काय घडत आहे ते पाहण्याची दिव्यदृष्टी लाभली तशीच सोय आम्हाला आमच्या वास्तव जीवनात या व्हॉइस मेसेजने लाभली आणि आम्हाला ‘भगवंताची वाणी’ मोबाईलच्या W/A वरून ऐकताना जणू काही ‘दिव्य कान’ लाभले...