महाराष्ट्रात प्रत्येक पट्ट्याची खास खाद्यसंस्कृती आहे. त्यात प्रामुख्याने कोकणी, पुणेरी, मराठवाडी, कोल्हापूरी, खान्देशी, वऱ्हाडी या म्हणता येतील. कोकणात नारळ व तांदूळ मुबलक उपलब्ध असल्यामुळे तेथील पारंपरिक खाद्यपदार्थांत खोबरे व तांदूळ यांपासून बनवलेले पदार्थ जास्त आढळतात...