Home Tags दशावतार

Tag: दशावतार

जामनेर – बागायती आणि सुसंस्कृत (Jamner – city with rich development and cultural activities)

जामनेर हा जळगाव जिल्ह्यातील एक प्रमुख तालुका आहे. तो जळगाव शहरापासून साधारणपणे छत्तीस किलोमीटर अंतरावर आहे. जामनेर तालुका पाचोरा, भुसावळ, बोदवड, जळगाव, बुलढाणा या गावांनी वेढलेला आहे. जामनेर तालुक्यात एकशेअठ्ठावन्न गावे आहेत. त्यांपैकी शेंदुर्णी, फत्तेपूर, तोंडापूर, कापुसवाडी, नेरी, पहूर, देऊळगाव, वाकडी ही मोठी अशी गावे आहेत. जामनेर हे गाव टेकडीवजा एका डोंगराच्या कोपऱ्यात पायथ्याशी वसले आहे. मात्र त्या डोंगराला सिद्धगड या भारदस्त नावाने संबोधले जाते. गाव सुखी, संपन्न आणि समृद्ध असे आहे. जामनेर गाव नदीमुळे दोन विभागांत विभागले गेले आहे- जामनेर आणि जामनेरपुरा. दोन्ही गावांना सांधण्यासाठी नदीवर दोन ठिकाणी पूल बांधलेले आहेत. नदीचे नाव कांग असे आहे...

अचलपूर – आधुनिक नाट्यपंढरी (Achalpur – The origin of Marathi stage)

अचलपूरला समृद्ध नाट्यपरंपरा लाभली आहे. विदर्भातील कालिदास आणि भवभूतींसारख्या नाट्य विभूतींनी नाट्यक्षेत्रात अजरामर कार्य केल्यानंतर तेथे आधुनिक रंगभूमी रुजली. अचलपुरातील बहुतेक नाट्यगृहे ही नाटके सादर करणाऱ्या मंडळांची स्वतःची आहेत. विशेष म्हणजे अचलपूरच्या जुन्या संस्था रंगमंचाची पूजा करताना नाटकांतील स्त्रीपात्रांचीही पूजा करत. कालौघात ती नाट्यगृहे नाहीशी झाली, पण नाट्यगृहांच्या समोरील मंदिरे जोरात चालू आहेत…

दशावतारात अब्दुल नदाफ यांच्या नव्या नायिका (Abdul Nadaf – Popular Star of Dashavtari –...

अब्दुल नदाफ यांनी दशावतार कलेमध्ये खास करून स्त्रीभूमिका साकारल्या. त्यांनी खरा कलाकार जातिधर्माच्या बंधनात अडकून पडत नाही हे समाजाला दाखवून दिले. कलेसाठी त्यांची तळमळ पाहून, त्याबद्दलचे कौतुक प्रेक्षकांच्या उत्स्फूर्त प्रतिक्रियांत उमटते…

दशावतारी नाटक (Dashavtari – Traditional Marathi Theatre Form)

कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकशेअडतीस दशावतारी मंडळे आहेत. इतर लोककला काळाच्या उदरात गडप होत असताना, दशावतार मात्र अस्तित्व टिकवून आहे. अब्दुल नदाफ सारख्या नव्या नटांमुळे या कलाप्रकाराचे औत्सुक्य वाढत आहे...

धयकाल्याच्या रात्री…

0
कोकणातील श्रीकृष्ण अष्टमीच्या दहीकाल्यात गाजते ती गणेशाची पूजा. रंगमंचावर गणपतीची पूजा करताना भटजींकडून होणारे विनोद आणि गणपतीची होणारी आरती हे सारेच मालवणी लोकसंस्कृतीचे आगळेवेगळे संचित आहे. गणेशाची पूजा केली जात असताना, आरती म्हणताना होणारा संवाद ऐकण्यास खूपच गोड असतो. मालवणी शिवी ही ओवीप्रमाणे असते याची प्रचीती तेथे येते...

मराठी नाटकाची पूर्वपरंपरा (Marathi Stage has long tradition)

0
नाटक, दशावतार, भारूड, कीर्तन असे कोणतेही नवनवे कलाप्रकार एकाएकी जन्माला आलेले नाहीत. त्यांना पूर्व परंपरा आहे. ते घटक आणि काळाबरोबर विकसित होत असलेल्या नवनवीन कल्पना यांच्या एकत्रीकरणातून नवे ताजे काही जन्माला येते...

मराठी संगीत रंगभूमी- मर्मबंधातील ठेव (Musicals on Marathi Stage – Rich Tradition)

1
मराठी संगीत रंगभूमी ही महाराष्ट्रीय मनाच्या मर्मबंधातील ठेव आहे. त्यामुळे पद्याला, संगीतकलेला रंगभूमीचे अधिष्ठान मिळाले आणि तो वेलू जो गगनावेरी गेला, तो अनेक वळणे घेत, चढउतार अनुभवत, आजतागायत लोकप्रियतेच्या किमान पातळीवर राहिला.
carasole

मानसीश्वराची दिवाबत्तीतील जत्रा

वेंगुर्ले-शिरोडा येथील मानसीश्वराचे स्थान आहे श्री देव मानसीच्या देवचाराचे. म्हणून त्याला मानसीश्वर असे म्हणतात. तेथे भाविकांचा महापूर असतो, पण कानठळ्या बसणारे आवाज नसतात आणि...
दशावताराच्या सादरीकरणाचे एक दृश्यृ

कोकणातील दशावतार (Dashavatar in Konkan)

दशावतार म्हणजे विष्णूने जे दहा अवतार धारण केले ते - मत्स्य, कूर्म, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, कलंकी व बुद्ध. यांपैकी पहिली चार...