‘रेनवॉटर हार्वेस्टिंग’ एक प्राचीन संकल्पना आहे. ती पाषाणयुगापासून अस्तित्वात असावी. पावसाचे पाणी गोळा करणे आणि ते विविध भांड्यांमध्ये साठवणे, या केवळ दोन कृतींचा त्यात समावेश आहे. भूपृष्ठजलाशी (Surface Water) निगडित अशी ती संकल्पना आहे. भूपृष्ठजलाला बाष्पीभवन, वाहून येणारा मातीचा गाळ, दूषितीकरण, अल्पायुष्य अशा अनेक अंगभूत मर्यादा आहेत...