Home Tags छंद

Tag: छंद

महेश लाडणे : नाणीसंग्रह; अभ्यास अभी बाकी है !

शेवगाव तालुक्यातील अमरापूर गावच्या महेश लाडणे याच्या नाणीसंग्रहाची सुरुवात कुतूहलातून झाली. तो इयत्ता नववीत शिकत असताना घरात जुनी पितळी तांब्याची भांडी, वजनमापे अशा काही वस्तू असल्याचे त्याच्या लक्षात आले. त्यात वजनमापे वाटतील अशा गोलाकार आणि जाडजूड तांबे धातूच्या काही गोष्टी होत्या. तो ते साहित्य जमवत गेला. त्यातून त्याचा नाणेसंग्रह आकारास आला. त्याच्या संग्रहात आठशे नाणी आहेत. ती विविध धातूंची, विविध आकारांची, विविध किंमतीची, विविध लिपींतील आहेत...

शंकराचार्यांचा विवेकचूडामणि ग्रंथ

शंकराचार्य हे भारतीय संस्कृतीतील धर्मविचारांचे आद्यगुरू. शिवगुरु भट्ट व आर्याम्बा यांच्या पोटी शंकराचा प्रसाद म्हणून त्यांचा जन्म झाल्याची भावना मनी बाळगून त्यांचे नाव शंकर असे ठेवण्यात आले. शंकर मेधावी होते. ते प्रकांडपंडित म्हणून वयाच्या सहाव्या वर्षीच ओळखले जाऊ लागले. त्यांना वयाच्या आठव्या वर्षी गुरू गोविंदांकडून संन्यास प्राप्त झाला. त्यांना आयुष्य केवळ बत्तीस वर्षांचे लाभले. त्यांनी जवळपास चाळीस ग्रंथांची निर्मिती केली आहे...

तोरू दत्त – पहिली हिंदुस्थानी इंग्रजी कादंबरीकार (Toru Dutt – First Indian Novelist in...

0
तोरू दत्त ही पहिली हिंदुस्थानी इंग्रजी कादंबरीकार. तिचे काव्यही युरोपात अठराव्या शतकात गाजले. तिने फ्रेंच भाषेतही लेखन केले. तिचे एकूण दत्त कुटुंब हेच लोकविलक्षण होते. त्यांनी विल्यम कॅरे या इंग्रजी धर्मप्रसारकास आश्रय दिला; स्वत: ख्रिश्चन धर्म स्वीकारला, इंग्लंडला स्वत:ची मातृभूमी मानले आणि प्रेम मात्र हिंदुस्थानवर केले व हिंदुस्थानी जनतेची काळजी वाहिली...

कोकणचे इतिहाससंशोधक अण्णा शिरगावकर ! (Dabhols Historian Anna Shirgaonkar)

अनंत धोंडूशेठ शिरगावकर हे अण्णा शिरगावकर या नावाने कोकण परिसरात ओळखले जात. त्यांनी शिक्षण, सहकार, कामगार संघटना, अपंगांसाठीच्या संस्था, वाचनसंस्कृती, पंचायतराज, संग्रहालयशास्त्र, कोकणच्या प्राचीन इतिहासाचा शोध अशा विविध विषयांत मैलाचे दगड ठरतील असे संशोधन व लेखन कार्य केले आहे. त्यांचा जन्म 5 सप्टेंबर 1930 गुहागरमधील विसापूर गावचा. त्यांना मृत्यू वयाच्या त्र्याण्णव्या वर्षी 11 ऑक्टोबर 2022 रोजी आला...

अवलिया कलावंत- वसीमबारी मणेर

0
फलटणचा वसीमबार्री मणेर हा अवलिया कलावंत आहे ! कला हा त्याच्या जगण्याचा ध्यास आहे. तो चित्रपट दिग्दर्शक-निर्माता, लेखक, चित्रकार, चलचित्रकार, शिक्षक, प्रकाशक, बालसाहित्यिक, स्थापत्य विशारद अशा विविध क्षेत्रांत, जेथे जेथे संधी मिळेल तेथे तेथे मुशाफिरी करतो; सिनेनिर्मिती आणि लेखन कार्यशाळा घेतो...

नर्मदा परिक्रमेचा प्रचार – सुरेंद्र दामले शैलीने ! (Surendra Damle’s novel way to propogate...

सुरेश रामचंद्र दामले, वय वर्षे त्र्याहत्तर, इलेक्ट्रिक मोटर वाइंडिंगचा व्यवसाय. तो पिढीजात चालत आलेला. त्यांच्या पत्नी आशा दामले यांनी ‘नर्मदा परिक्रमे’वरील व्याख्यान ऐकले आणि त्या भारावून गेल्या.