Home Tags गाविलगड किल्ला

Tag: गाविलगड किल्ला

निसर्गरम्य बेलकुंड – वनविश्रामगृहांचे सौंदर्य

3
मेळघाट सुंदर सुंदर वनविश्रामगृहांनी भरलेले आहे. रायपूर, चौराकुंड, रंगूबेली, कोकटू ... ही सर्व वनविश्रामगृहे इंग्रजांनी वनसंपत्तीच्या प्रशासनासाठी बांधली. त्यांतील विलायती झाक मोहक वाटते. त्या सगळ्यांत आगळेवेगळे दिसणारे विश्रामगृह म्हणजे बेलकुंडचे ! बेलकुंडच्या निसर्गरम्य परिसरातील पर्यटन म्हणजे साहसी आव्हानांचा एक रसरशीत अनुभव...

मराठी भाषा-साहित्य : अचलपूरचे योगदान

अचलपूर तालुक्याने मध्यप्रदेश या हिंदीभाषिक राज्याच्या सीमेवर असतानासुद्धा मराठी भाषा केवळ जगवली नव्हे तर वाढवलीसुद्धा आहे. अचलपूर परिसरातील बोलीचे सौंदर्य, तिचे उच्चारविशेष, रूपविशेष, तिचे आगळेपण भाषातज्ज्ञसुद्धा मान्य करतात. मूळात अचलपूरला मोठी वाङ्मयीन परंपरा लाभलेली आहे. ती मराठी भाषेच्या वृद्धीकरता पूरक ठरलेली आहे...

बहिरम – व्यापाऱ्यांची जत्रा (Bahiram Festival – Different Perspective)

बहिरम यात्रेला विदर्भात मोठे ऐतिहासिक स्थान आहे. ते बैतुल-होशंगाबाद या जुन्या राजमार्गावर येते. तेथील यात्रेचा उल्लेख वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या संदर्भात वेगवेगळ्या प्रकारे येतो. कॅप्टन मेडोज टेलरच्या ‘कन्फेशन ऑफ ए ठग’ या पुस्तकामध्ये त्याचे काही संदर्भ सापडतात. बहिरमचे दगडी मंदिर, त्याशी जोडलेली मच्छिंद्रनाथ, गोरखनाथ यांची नावे हे सारे भारतीय संस्कृतीचा वेगळ्याच दृष्टीने विचार आणि तत्संबंधी संशोधन करण्यास भाग पाडते...

स्थित्यंतर अचलपूर : गतवैभवाची फक्त साक्ष !

1
‘अचलपूरचा इतिहास म्हणजेच वऱ्हाडचा इतिहास’! या वचनात गावाचा शहराबद्दलचा अभिमान आहे. मात्र ते अचलपूर (आणि परतवाडा) हे शहर पार बदलून गेले आहे. संपन्नतेची साक्ष पटवणाऱ्या खुणा फक्त शिल्लक आहेत ! शहराच्या गतकाळातील वैभवाची साक्ष ऐतिहासिक वास्तूंमुळे पटते हे मात्र खरे ...

गाईगोधन परंपरेचे हनवतखेडा

हनवतखेडा हे अचलपूर पासून दहा किलोमीटर अंतरावर वसलेले टुमदार असे गाव आहे. गावाच्या मधोमध असणारे नागद्वार मंदिर संस्थान, नदीपलीकडे असणारे दत्तझिरी मंदिर प्रसिद्ध आहे. गावातील उत्तम शरीरसौष्ठव व उत्कृष्ट सजावट असणाऱ्या गार्इंच्या मालकांना पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते...
carasole

गाविलगड – वैभवशाली बांधकामाचा बलदंड किल्‍ला

गाविलगड हा वैभवशाली बांधकाम असलेला बलदंड किल्ला विदर्भाचे भूषण आहे. तो किल्ला अमरावतीतील चिखलदऱ्याजवळ, मेळघाट व्याघ्र प्रकल्पामधे आहे. किल्ला अमरावती जिल्ह्यातील मेळघाटच्या पर्वतरांगांमध्ये असलेल्या चिखलदरा तालुक्यातील पठाराच्या दक्षिणेस सुमारे पाच कि.मी. अंतरावर स्थित आहे...