Home Authors Posts by विजय इंगोले

विजय इंगोले

1 POSTS 0 COMMENTS
विजय इंगोले यांनी इलेक्ट्रिकल व इलेक्ट्रॉनिक्स या विषयांतील पीएच डी पर्यंतच्या अनेक पदव्या प्राप्त केल्या आहेत. त्यांची वृत्ती संशोधनाची आहे. ते क्रॉम्पटन ग्रीव्हजमधील नोकऱ्यांत चीफ डिझाइन इंजिनीयर झाले. त्यांनी वेगवेगळ्या यंत्रांची निर्मिती केली, उपकरणे बनवली. त्यांच्या संशोधनाला पेटंट मिळाले. त्यांचे नाव एका उपकरणाला देण्यात आले आहे. त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. ते लघुउद्योजकांना मार्गदर्शन करतात.

निसर्गरम्य बेलकुंड – वनविश्रामगृहांचे सौंदर्य

3
मेळघाट सुंदर सुंदर वनविश्रामगृहांनी भरलेले आहे. रायपूर, चौराकुंड, रंगूबेली, कोकटू ... ही सर्व वनविश्रामगृहे इंग्रजांनी वनसंपत्तीच्या प्रशासनासाठी बांधली. त्यांतील विलायती झाक मोहक वाटते. त्या सगळ्यांत आगळेवेगळे दिसणारे विश्रामगृह म्हणजे बेलकुंडचे ! बेलकुंडच्या निसर्गरम्य परिसरातील पर्यटन म्हणजे साहसी आव्हानांचा एक रसरशीत अनुभव...