Tag: खेड
कुंभवे – शुद्ध पर्यावरण, शांत सहजीवन (Kumbhave – Pure environment, peaceful symbiosis)
प्रत्येकाला त्याचे गाव प्रिय असते. माझ्या गावाचे नाव ‘कुंभवे’ आहे. ते रत्नागिरी जिल्ह्याच्या दापोली तालुक्यात येते. कुंभवे हे दापोलीपासून दहा किलोमीटर अंतरावर आणि रत्नागिरीपासून पंधरा किलोमीटरवर आहे. गावाचे एकूण भौगोलिक क्षेत्र चारशेसाठ हेक्टार म्हणजेच अकराशे एकर आहे. गावची लोकसंख्या एक हजार तीनशेबावन्न आहे. हिरवळ, झाडे, पक्ष्यांचा गोड-मंजुळ असा आवाज, निसर्गरम्य वातावरण अशी गावाची चित्रे मनात उमटू लागतात...
अप्रसिद्ध रामगड (रामदुर्ग)
‘रामगड’ हा किल्ला दापोली-खेड तालुक्याच्या सीमेवर आहे. तो खेडपासून सतरा किलोमीटर अंतरावर आहे. तो साने गुरुजींच्या ‘पालगड’ गावाच्या पूर्वेस आहे. तो किल्ला ‘रामदुर्ग’ या नावानेही ओळखला जातो. तो समुद्रसपाटीपासून साधारण चारशेआठ मीटर उंचीवर आहे. किल्ला अदमासे एक एकर जागेवर उभा आहे. तो पालगडचा जोडकिल्ला मानला जातो. त्यामुळे तो अज्ञात व म्हणून अप्रसिद्ध होता. त्या किल्ल्याची स्थाननिश्चिती कागदपत्रांच्या आधारे प्रस्तुत लेखकाने केली आहे...
विसापूर – दापोलीच्या छायेत
विसापूर म्हणजे गुणवत्तेची खाण ! निसर्ग आणि मनुष्यसंपत्ती- दोन्हींची श्रीमंती. गाव दापोली तालुक्याहून मंडणगडकडे जाताना लागते. एकीकडे दापोली व दुसरीकडे खेड, हे दोन्ही तालुके प्रत्येकी बावीस किलोमीटरवर येतात. मंडणगड तालुका अठरा किलोमीटरवर तर महाड तालुका बत्तीस किलोमीटरवर आहे. म्हणून ते गाव मध्यवर्ती ठिकाण. गावाची रचना म्हणजे मध्यवर्ती विसापूर व सभोवताली नऊ वाड्या. गावाभोवती चहुबाजूंनी हिरवेगच्च डोंगर आहेत, गावातून कालवा काढलेला असावा अशी नदी वाहते...
चौऱ्याऐंशी गावांची मालकीण – झोलाईदेवी
झोलाईदेवीचे प्रसिद्ध मंदिर दापोली तालुक्याच्या माटवण या गावी आहे. झोलाईदेवीला दापोली, मंडणगड आणि खेड या तीन तालुक्यांतील चौऱ्याऐंशी गावांची मालकीण म्हणून संबोधले जाते. झोलाईदेवीचा उत्सव होळी पौर्णिमेला धुमधडाक्यात साजरा केला जातो. कोकणात पहिली होळी फाल्गुन शुक्ल पंचमीला पेटवली जाते. झोलाईदेवीची पालखी त्यानंतर सहाव्या दिवशी माटवणमधील मंदिरातून निघते...
स्वच्छ आल्हाददायक हवेचे देगाव (Degaon village for clean and pleasant weather)
दापोली तालुक्यातील देगाव दापोली आणि खेड या दोन्ही तालुका शहरांपासून सुमारे तीस किलोमीटर दूर आहे; समुद्र सपाटीपासून उंचावर आहे. त्यामुळे थंड हवेचे व निसर्गसौंदर्याने नटलेले असे निरव शांततेचे आहे. तेथील सकाळ व संध्याकाळ विविध पक्षांच्या किलबिलाटाने आगळी असते. दक्षिणेकडील डोंगर-रांगेच्या कुशीत भर दुपारीही उन्हाला मज्जाव करणारे पाचकुडीचे दाट जंगल आहे. गावात भडवळ टेप, रावण टेप अशा टेकड्या आहेत...
पन्हाळेकाजी लेणी समूह : विविध तरी एकात्म ! (Panhalekaji cave sculpture – varied styles...
दापोलीजवळचा पन्हाळेकाजी लेणी समूह म्हणजे भारतातील स्थापत्यकलेत व धार्मिक पंरपरेत बदल कसे होत गेले त्याचे उत्तम उदाहरण आहे. तेथे हीनयान, वज्रयान, शैव, गाणपत्य, नाथ अशा विविध धर्मसंप्रदायांचा वेगवेगळ्या काळातील प्रभाव दिसून येतो. लेणी मोठ्या कालखंडात खोदली गेली, तथापी त्याची शिल्पशैली त्यानुसार विविध तरी एकात्म दिसून येते...
भारतरत्न पां.वा. काणे (BharatRatna P.V. Kane)
भारतरत्न पांडुरंग वामन अर्थात पां.वा. काणे हे अलौकिक व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी एका मानवी आयुष्यात विविध तऱ्हांचे ज्ञानसंशोधनात्मक व संघटनात्मक अफाट कार्य केले. त्यांचे सर्वात मोठे काम म्हणजे त्यांनी ‘भारतीय धर्मशास्त्राचा कोश’ आधुनिक काळात संकलित केला. तो पाच खंडांत व काही हजार पृष्ठांत आहे...
पालगड किल्ला – चोरवाटा व दुर्गम कड्याकपारी
दापोली व खेड यांच्या सीमेवर पालगड हा दुर्गम किल्ला आहे. तो पोर्तुगीज, डच, इंग्रज या परकीय सत्तांबरोबरच शिवशाही व पेशवाई या राजवटींतील स्थित्यंतराचाही साक्षीदार आहे. पालगड हा मुख्य किल्ल्यांना रसद, दारूगोळा, तोफखाना पुरवण्यासाठी; तसेच, टेहळणी करण्याकरता बांधला गेलेला छोटेखानी किल्ला आहे. त्यामुळे त्यावर लढाईच्या फारशा खाणाखुणा नाहीत...
हिरव्या डोंगरांनी वेढलेले पिसई
चहुबाजूंनी डोंगर आणि त्यांच्या मध्यात वसलेले गाव म्हणजे पिसई. अठरापगड जातीचे लोक गावात राहतात, तरी त्यांच्यामध्ये सामाजिक एकोपा आहे. हे गाव लोककलेच्या क्षेत्रात अग्रेसर आहे. पिसईच्या गावकऱ्यांनी त्यांची लोकसंस्कृती टिकवून ठेवली आहे...
आमचा रोड
एखाद्या मित्राच्या सहवासात आश्वस्त वाटते, तसे त्या रोडवर वाटते. निसर्गाच्या सर्व ऋतूंचे दर्शन तेथे होते. त्याच्याशी होणाऱ्या हितगुजाने मनातील किल्मिषे निघून जातात व मन स्वच्छ, मोकळे आणि प्रसन्नतेने भरून जाते. शिवतर नावाच्या गावी जाणारा तो रोड अनेक मौजेच्या गोष्टींचा साक्षीदार आहे...