कोल्हापूर
Tag: कोल्हापूर
अवनि – उपेक्षित बाल-स्त्रियाचा आधार !
संघर्षाशिवाय तरणोपाय नाही हे अनुराधा भोसले यांच्या लक्षात लहानपणीच आले ! कष्ट हे जणू त्यांच्या पाचवीला पुजले होते. त्यांनी अकरावी-बारावीचे शिक्षण घेत असताना शौचालयाच्या साफसफाईचे कामदेखील केले आहे ! पण त्यांची पुढील आयुष्यातील कामगिरी फार मोठी आहे. अनुराधा भोसले यांनी ‘अवनि’ संस्थेमार्फत कोल्हापूर वीटभट्टी कामगारांच्या मुलांसाठी सत्तावन ‘वीटभट्टी’ शाळा सुरू केल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील वंचित, निराधार मुलांसाठी शिक्षणाची दारे खुली झाली आहेत. अनुराधा यांनी एकल स्त्रियांसाठी ‘एकटी’ ही संस्था सुरू करून त्या स्त्रियांना आत्मसन्मान मिळवून दिला आहे. अनुराधा भोसले यांच्या नावावर कोल्हापूरात अनेक कामांच्या नोंदी आहेत...
राजाराम महाराजांचे इटालीमध्ये स्मारक ! (Rajaram Maharaj Memorial In Italy)
कोल्हापूरचे महाराज राजाराम (दुसरे) ह्यांनी वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षी, 1870 मध्ये युरोपात जाण्याचा निर्णय घेतला, तेव्हा जनसामान्यांत आणि काही कुटुंबीयांतही नाराजी उमटली. समुद्र ओलांडण्याला सनातनी हिंदुधर्मात मान्यता नाही असा समज होता ना ! पण राजाराम महाराज ती सर्व नाराजी ओलांडून निर्धाराने युरोपात गेले, कारण त्यांना युरोपीय शिक्षणपद्धत समजाऊन घेऊन ती स्वतःच्या संस्थानात सुरू करायची होती. राजाराम महाराज स्वतः इंग्रजी शिकलेले होते. त्यांनी उत्तम संभाषण इंग्रजीत करण्याइतकी पात्रता मिळवली होती. ब्रिटिशांनी राजाराम महाराजांना राज्यकारभार व शालेय शिक्षण, दोन्ही चांगल्या प्रकारचे देण्याची व्यवस्था केली होती...
दिवाळीच्या फराळाची खुमारी
दिवाळीतील आनंदाचा एक भाग म्हणजे एकाच वेळी खाण्यासाठी उपलब्ध होत असलेले आठ-नऊ प्रकारचे खमंग, तिखट व गोड पदार्थ बनवले किंवा विकत आणले जातात. त्या पदार्थ समूहाला दिवाळीचा ‘फराळ’ असे थाटाने आणि मानाने म्हटले जाते. मला फराळ प्रत्यक्ष खाण्यापेक्षा फराळाच्या पदार्थांनी ओसंडून वाहणारी दुकाने आणि दिवाळीपूर्वी घराघरांतून येणारे भाजणीचे आणि तळणीचे तिखटमधुर वास अधिक आवडतात. पहिला पदार्थ म्हणजे आमच्या घरच्या विदर्भातील चकल्या. आमच्या घरी दिवाळीसाठी म्हणून चिवडा, दोनतीन प्रकारचे लाडू, शंकरपाळी, करंज्या वगैरे अगोदर करून ठेवतात, पण चकल्या मात्र नरक चतुर्दशीच्या दिवशी सकाळी ताज्या करतात...
खिद्रापूरचे कोपेश्वर मंदिर
पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी पूर्व क्षितिजावर आलेला चंद्र आकाशात वर येऊ लागतो आणि पूर्वाभिमुख असलेल्या कोपेश्वर मंदिरावर त्याची किरणे पडू लागतात. मंदिर शुभ्रधवल चंद्रप्रकाशाने उजळू लागते. शरद ऋतूमधील आल्हाददायक चैतन्यमय वातावरण आणि त्रिपुरी पौर्णिमेचे टिपूर चांदणे उल्हसित करणारे भासते. त्रिपुरी पौर्णिमेच्या रात्री तारकाकृती मंदिराच्या स्वर्गमंडपाच्या छतावरील वर्तुळाकार झरोक्यातून चंद्रकिरण मंदिरात आत प्रवेश करतात. झरोक्याखाली असलेली रंगशिळा चंद्रप्रकाशात उजळून जाते. वर्षातून एकदा, फक्त त्रिपुरी पौर्णिमेच्या रात्री काही घटिकांपुरता होणारा हा सोहळा कोपेश्वर मंदिराचे सौंदर्य अंतर्बाह्य खुलवतो. हे प्राचीन शिव-विष्णू मंदिर शिल्पकृतींनी संपन्न आहे...
खिद्रापूरचा कोपेश्वर – छोटे खजुराहो !
कोल्हापूरनजीकच्या खिद्रापूर येथील कोपेश्वर शिवमंदिर म्हणजे श्रद्धा व शिल्पकला यांचे उत्तम मिश्रण आहे. तेथील प्राचीन वैभव सुस्थितीत आढळते. शिलाहारांनी अनेक देवळे बांधली, त्यांतील अंबरनाथ, पेल्हार, वाळकेश्वर येथील मंदिरे प्रसिद्ध आहेत. त्यातीलच एक आहे खिद्रापूरचे शिवमंदिर. रामायण, महाभारत, भौगोलिक विश्वसंस्कृती, प्रेम, साहित्य, पर्यावरण, वन्यजीव, स्थापत्यशास्त्र अशा बहुविषयांना स्पर्श केलेली शिल्पे मंदिरात आहेत...
पाऊस पहावा (Enjoying Rains)
पावसाळा हा सृजनाचा, आनंदाचा ऋतू. प्रत्येक माणसाच्या मनात पावसाच्या काही खास आठवणी असतात. मित्रमैत्रिणींबरोबर केलेल्या पावसाळ्यातल्या भटकंतीच्या, धबधब्यांच्या, सह्याद्रीतील दऱ्याखोऱ्यांच्या, हिरवाईच्या आणि क्वचित निसर्गाच्या कोपाला एकत्र येऊन तोंड देण्याच्याही. जसजसा काळ जातो तसतशा या आठवणी अधिक गहिऱ्या होत जातात.
भारतासारख्या कृषीप्रधान देशात ग्रामीण भागात पावसाची अशी एक खास परिभाषा, पावसाविषयी ठोकताळे आहेत. ते जाणून घेण्यात मजा आहे. सध्या पावसाने संततधार धरली आहे. अशा या बाहेरच्या पावसाविषयीचा डॉ. मंजूषा देशपांडे यांचा ललित लेख ज्याच्यात्याच्या मनातल्या पावसाच्या आठवणी हमखास जाग्या करेल...
शाहूंचा राज्याभिषेक – काव्यमय वृत्तांत
कोल्हापूरचे शाहू महाराज यांच्या राज्यारोहण समारंभाचे एका प्रत्यक्षदर्शीने केलेले काव्यमय वर्णन... त्याची संशोधित आणि संपादित स्वरूपातील देखणी आवृत्ती प्रकाशित झाली आहे. तो समारंभ 2 एप्रिल 1894 रोजी झाला. ती ऐतिहासिक महत्त्वाची घटना होय. तो प्रसंग कोल्हापूरसाठी सुवर्णयुग घेऊन आला. त्या क्षणापासून कोल्हापूर संस्थानात सामाजिक क्रांतीचे नवे पर्व सुरू झाले ! त्यातून देशभरातील सामाजिक सुधारणांना वेगळी दिशा मिळाली. तो ठेवा पुन्हा प्रकाशात आणण्याची महत्त्वाची कामगिरी यशोधन जोशी यांनी केली आहे. ती घटना 'मुक्त्यारी समारंभ’ अथवा ‘श्रीमन्ममहाराज शाहू छत्रपती यांचा राज्याधिकार स्वीकारोत्सव’ या नावाने ओळखली जाते. ती मूळ संहिता आहे बाळाजी महादेव करवडे यांची...
शाहू महाराज – शैक्षणिक कार्य !
करवीर म्हणजे कोल्हापूर हे स्वातंत्र्यपूर्व भारतातील एक संस्थान. अशी पाचशेपासष्ट संस्थाने भारतात होती. शाहू महाराजांनी त्यांच्या कारकिर्दीत करवीर संस्थानामध्ये जे कार्य केले, त्यामुळे ते संस्थान स्मरणात राहिले आहे. शाहू महाराजांचे कार्य इतके प्रभावी आणि महत्त्वपूर्ण होते, की स्वतंत्र भारताची राज्यघटना तयार करताना शाहू महाराजांनी केलेल्या कार्याची नोंद घटना समितीला घ्यावी लागली ! शाहू महाराजांनी समाज सुधारणा, शिक्षण, दलितांचा उद्धार, जाती निर्मूलन, अंधश्रद्धा निर्मूलन अशा काही क्षेत्रांत महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे...
गल्लीतली दिवाळी सुट्टी (Diwali Vacation in Good Old Days!)
आमची गल्ली म्हणजे राजारामपुरी अकरावी गल्ली, कोल्हापूर. आमच्या लहानपणी आम्ही या गल्लीत राहत असू. सहामाही परीक्षा संपली की शाळेला दिवाळीची सुट्टी लागायची. त्यावेळच्या दिवाळी सुट्टीचे, दिवाळीच्या अगोदरची आणि दिवाळीच्या नंतरची सुट्टी असे सरळ सरळ दोन भाग करता येत. त्या काळातल्या आठवणींनी डोळे क्षणभर पाणावतात. केवळ क्षणभरच... आजच्या सुट्टीतली मजा विकत घेतलेली असली तरी... सोयीची आहे... कालसुसंगत आहे... हे जाणवत राहतं...
कोल्हापूर-गगनबावड्याचे मोरजाई पठार !
मोरजाई परिसरातील भटकंती म्हणजे महाराष्ट्राच्या मातीचा, पर्वतांचा, संस्कृतीचा, पाण्याचा, अरण्यांचा, स्थापत्यांचा अस्सल अनुभव ! तो अनुभव इतिहासातही जिवंत असण्याचा भाव निर्माण करू शकतो. कोल्हापूर-गगनबावडा रस्त्यावर आसळज गावापासून तीन-चार किलोमीटर डावीकडील बाजूस सह्याद्रीच्या कुशीत लपलेला एक ओढा आहे. मुख्य रस्ता सोडून थोडे आत... गर्द वनराई, निवळशंख पाणी आणि त्यासोबत काही हिनयान पंथीय छोटी, पण टुमदार लेणी असे ते विलक्षण नैसर्गिक पण माणसाचा यथायोग्य हस्तक्षेप झालेले ठिकाण आहे...