Tag: केशवसुत
नास्तिकांची दापोली
कोकणी माणूस त्याचे कुळाचार, त्या त्या समाजाने ठरवलेल्या रूढी-प्रथा-परंपरा कटाक्षाने पाळणारा आहे. कोकणवासी मंडळी धार्मिक सण-उत्सव यांत वर्षभर मग्न व दंग असतात. तरीही दापोली तालुक्यातील नास्तिक नमुने त्यांच्या वेगळेपणाने उठून दिसतात याचा मला अचंबा वाटत आला आहे. दापोलीतील निरीश्वरवादी मंडळींवर उपजत चिकित्सक वृत्ती, वाचन, नास्तिक मंडळींचा सहवास आणि समाजवादी धोरण या घटकांचा प्रभाव दिसून येतो...
ग.ह. पाटील यांचे कवितेचे सुंदर आकाश …
ग.ह. पाटील हे खेड्यातील निसर्ग- वातावरण यांचा दृढ संस्कार असलेले, सश्रद्ध, हळव्या-कोवळ्या मनाचे, जुन्या पिढीतील कवी. कवी, बालसाहित्यकार, शिक्षणतज्ज्ञ ही त्यांची ओळख. ग.ह. पाटील यांच्यापाशी मन लहान मुलांच्या निरागस वृत्तीशी, कुतूहलाशी, उत्कट-सुंदर भावविभोरतेशी नाते सांगणारे होते...
बेचाळिसावे साहित्य संमेलन (Forty-Second Marathi Literary Meet 1960)
रा.श्री. जोग यांची ओळख मर्मज्ञ समीक्षक अशी साहित्य विचारक्षेत्रात आहे. जोग यांच्या ‘अभिनव काव्यप्रकाश’ या ग्रंथाने मराठी साहित्य विचाराचा पाया घातला गेला. त्यांनी त्या ग्रंथात पाश्चिमात्य साहित्य, इंग्रजी साहित्यशास्त्र व मानसशास्त्र यांची जोड देऊन जुन्या संस्कृत-साहित्यशास्त्राचे संस्करण केले. जोग यांनी अर्वाचीन वाङ्मयनिर्मितीच्या रसग्रहणाला आणि मूल्यमापनाला समर्थ ठरेल अशी अभिनवता साहित्य विचाराला प्रदान केली...
आचार्य भागवत – लोकांतातील एकांत (Acharya Bhagwat – Gandhi Thinker)
आचार्य भागवत हे त्यांचा एकांत सत्य, निर्भय वृत्ती, सेवाभाव, सत्याग्रही समाजवाद, अहिंसा, नैतिकता या जीवनमूल्यांवर दृढ निष्ठा ठेवून लोकांतात जपत ! ते मानवतेवर प्रेम करत अलिप्तपणे जगले. त्यांनी साहित्याभिरुची जपली. ते मित्र-नातेवाईक-परिवार यांच्याशी जोडलेले राहिले, पण कशातही गुंतून पडले नाहीत...
चाळिसावे साहित्य संमेलन (Fortyth Marathi Literary Meet 1958)
कवी अनिल यांना मुक्तछंदाचे प्रवर्तक मानले जाते. त्यांनी ‘दशपदी’ या नव्या काव्यप्रकाराचा आविष्कार केला. साधी, सरळ, भावस्पर्शी रचना आणि उत्कट गीतात्मता हे त्यांच्या कवितेचे वेगळेपण. मात्र, त्यांची कारकीर्द विविधतापूर्ण आहे…
तेहतिसावे मराठी साहित्य संमेलन अध्यक्ष यशवंत (Thirty-third Marathi Literary Meet – 1950)
तेहतिसावे मराठी साहित्य संमेलन मुंबई येथे 1950 साली झाले. त्याचे अध्यक्ष यशवंत दिनकर पेंढारकर ऊर्फ राजकवी यशवंत हे होते. कवी यशवंत यांचा हातभार आधुनिक कवितेला उज्ज्वल आणि कीर्तिवंत करण्यात फार मोठा आहे. त्यांनी कवी केशवसुत, बालकवी, गोविंदाग्रज यांच्यानंतर मराठी कविता अधिक समृद्ध केली...
तिसावे साहित्य संमेलन (Thirtieth Marathi Literary Meet – 1946)
गजानन त्र्यंबक माडखोलकर हे बेळगाव येथे 1946 साली झालेल्या तिसाव्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. ते कादंबरीकार, निबंधकार, पत्रकार आणि संपादक म्हणून प्रसिद्ध होते. राजकीय कादंबरी ही त्यांची खासीयत.
दापोली तालुक्यातील बुद्धिवैभव!
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक (23 जुलै 1856 – 1 ऑगस्ट 1920) - टिळकांचे मूळ गाव दापोली तालुक्यातील ‘चिखलगाव’. टिळकांचा जन्म रत्नागिरी येथे झाला. त्यांचे...
महाराष्ट्राचे काव्यतीर्थ – केशवसुत (Keshavsut)
'झंकारीत वीणा इथे प्रगटली ही शालिनी शारदा, नादाने भुलली इथेच रमली ही मानिनी संपदा'
महाराष्ट्राचे काव्यतीर्थ - केशवसुत स्मारक
नवीन पिढीच्या स्मृतीत, जुन्या पिढीतील कर्तृत्ववान लोकांच्या...