भारतात विशेषत: महाराष्ट्रात एक माणूस – एक संस्था अशी घट्ट परंपरा आहे; त्याच वेळी, संस्थाजीवन हे त्या त्या संस्थांमध्ये गुंतलेल्या ध्येयप्रवृत्त माणसांच्या पलीकडे बहरले पाहिजे असेही समाजाला वाटत असते, ‘काडी काडी वेचताना...’ हे अविनाश बर्वे यांचे पुस्तक वाचत असताना या दोन्ही समजुतींचा प्रत्यय येतो आणि विचाराला टोक येऊ शकते. डोंबिवलीजवळच्या खोणी येथील ‘घरकुल’ या त्यांच्या संस्थेची कहाणी ‘काडी काडी वेचताना...’ या पुस्तकात आहे...
महाराष्ट्रात नृत्यकलेला पन्नासच्या दशकात फारशी प्रतिष्ठा नव्हती. त्यावेळी पुरुष नृत्य कलाकाराला ‘नाच्या’ म्हणून हिणवण्यात येत असे. अशा काळात कुटुंब आणि समाजातील अपसमजांना डावलून वसईतील श्रीधर पारकर यांनी केलेली वाटचाल महत्त्वपूर्ण ठरते. पारकर पति-पत्नीने ‘नृत्यकिरण’ या संस्थेच्या माध्यमातून जवळपास सात दशके नृत्यसेवा केली...
न्यायमूर्ती रानडे यांच्या प्रकृतीसाठी त्यांच्या पत्नी रमाबाई यांनी करमाळा येथील खोलेश्वर देवास साकडे घातले. तेथे त्यांच्या बरोबर स्थानिक मुसलमान डॉक्टर होते आणि रानडे यांची अधिक काळजी घेण्यास पुण्याहून डॉक्टर आले ते विश्राम खोले. ते ज्योतिबांच्या संस्थेत काम करणारे. असे सामाजिक समन्वयाचे वातावरण महाराष्ट्रात एकोणिसाव्या शतकाअखेरीस होते. रमाबाईंच्या पुस्तकातील तो किस्सा जाणण्यासारखा आहे...
भोपाळच्या गादीवर महिला १८१८ पासून शंभर वर्षे राज्य करत होत्या. त्यांनी कल्याणकारी राज्य स्थापण्याचा प्रयत्न केला. त्यात सिकंदर बेगम व सुलतान जहाँ बेगम यांनी लष्कर सेवा, प्रशासन व्यवस्था आणि न्यायव्यवस्था यात केलेल्या सुधारणा महत्त्वपूर्ण ठरल्या…
‘अनुपमा’ हे अनागारिका माताजी अनुत्तरा म्हणजे पूर्वाश्रमीच्या अनुपमा अर्जुन बोरकर लिखित आत्मकथन आहे. ते आंबेडकरी चळवळीतील स्त्री आत्मभान जपणारे पुस्तक आहे. त्यात आंबेडकरी चळवळ, शैक्षणिक परिवर्तन, सामाजिक-धार्मिक परिवर्तन यांचा ऐतिहासिक संदर्भ येतो आणि त्यामुळे ते महत्त्वाचे ठरते...
‘ज्यावेळी, मरणारा माणूस उपासमारीनंतर येणाऱ्या अतिसाराच्या विकाराने दगावतो, तेव्हा अतिसाराच्या जंतूंपेक्षा, अन्नाचा अभाव हे त्या मृत्यूचे कारण असते. ----’ हे पुस्तक म्हणजे वेदनेचा चित्कार, करुणेचे आर्जव, अश्रूंची आणखी एक लाट याहून काहीतरी अधिक आहे...