पोळा हा सण बैलांचाच, परंतु अचलपूर येथे भोई समाजात गाढवांचा पोळा आयोजित केला जातो. गाढवांप्रती कृतज्ञता दाखवण्याचा दिवस म्हणजे गाढव पोळा होय. ही प्रथा मागील पन्नास-साठ वर्षांपासून परतवाडा शहरातील दयाल घाट येथे जपली जात आहे...
सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या धामणगाव गढी येथे सर्व लोक आकर्षित होतात ते तेथील रमेश जोशी यांच्या रोपवाटिकेबाबत ऐकून. धामणगाव गढी येथील साधा अल्पशिक्षित मोटर मेकॅनिक ते जोशी रोपवाटिकेचे संचालक रमेश जोशी या भन्नाट व्यक्तिमत्त्वाची ती किमया आहे. त्यांनी लाख-दीड लाख रोपट्यांची वाटिका तयार केली आहे ! त्यांच्या रोपवाटिकेमध्ये क्वचितच एखादे असे रोपटे असेल जे तुम्हाला मिळणार नाही...
जुळे हनुमान मंदिर अमरावती जिल्ह्याच्या अचलपूर तालुक्यात येते. मंदिरातील जुळ्या हनुमान मूर्ती हिंदू व मुस्लिम, दोन्ही संस्कृतींत श्रद्धेने पूजल्या जातात ! आश्चर्याची गोष्ट म्हणजे या भागातील मुस्लिम बंधू ‘हनुमान’ ही त्यांच्या जातीतील देवता आहे असे म्हणतात. त्यामुळे जुळे हनुमान मंदिर मुस्लिम बांधवांनाही हिंदूंएवढेच वंदनीय आहे...
अमरावती जिल्ह्यातील अचलपूर ही धार्मिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेली प्राचीन भूमी ! अचलपूर शहरावर मोगल, मराठा आणि निजाम अशा तिघांनी राज्य केले. पूर्वी या शहराचे नाव नौबाग होते. ती नाग देवांची जन्मभूमी, म्हणून नौबाग नाव पडले अशी आख्यायिका आहे...
श्री नृसिंह जन्मोत्सव वैशाख शुक्ल चौदाला अचलपूरच्या सावरकर नगरमध्ये वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने साजरा केला जातो. दशावतारातील चौथा अवतार हा नृसिंहाचा. त्या अवतारामागील कथा या दिवशी भक्तिमय वातावरणात नाट्यरूपाने अचलपूर येथे साकारली जाते. हे रोमांचकारी नाट्य गेली दोनशे वर्षे साकारले जाते...
अचलपूरला समृद्ध नाट्यपरंपरा लाभली आहे. विदर्भातील कालिदास आणि भवभूतींसारख्या नाट्य विभूतींनी नाट्यक्षेत्रात अजरामर कार्य केल्यानंतर तेथे आधुनिक रंगभूमी रुजली. अचलपुरातील बहुतेक नाट्यगृहे ही नाटके सादर करणाऱ्या मंडळांची स्वतःची आहेत. विशेष म्हणजे अचलपूरच्या जुन्या संस्था रंगमंचाची पूजा करताना नाटकांतील स्त्रीपात्रांचीही पूजा करत. कालौघात ती नाट्यगृहे नाहीशी झाली, पण नाट्यगृहांच्या समोरील मंदिरे जोरात चालू आहेत…
कवी अनिल यांना मुक्तछंदाचे प्रवर्तक मानले जाते. त्यांनी ‘दशपदी’ या नव्या काव्यप्रकाराचा आविष्कार केला. साधी, सरळ, भावस्पर्शी रचना आणि उत्कट गीतात्मता हे त्यांच्या कवितेचे वेगळेपण. मात्र, त्यांची कारकीर्द विविधतापूर्ण आहे…
ज्या लोकांना जातीनिहाय आरक्षण नको आहे, त्यांना त्यांची जात ‘माणूस’ अशी लिहिता आली पाहिजे. ज्यांना हिंदू धर्म ठेवायचा आहे, पण जातिभेद पाळायचा नाही, त्यांना आवश्यक असेल तेथे धर्म ‘हिंदू’ आणि जात ‘माणूस’ अशी नोंद करता आली पाहिजे. जातिभेद नाहीसे किंवा निदान कमी करण्यासाठी ते महत्त्वाचे पाऊल असेल…
गाडगेबाबा जिथं जिथं न्यून जाणवलं, तिथं तिथं ते भरून काढण्यासाठी नेटानं प्रयत्न करत राहिले. अनेकांची आयुष्यं त्यांच्या सहवासाच्या लेपानं सुगंधित झाली. गाडगेबाबा सभोवती माणसांचा समुद्र पसरलेला असतानाही आतून नि:संग राहिले...
गाडगेबाबा पुस्तकात सामावू शकत नाही. तो या मातीत रुजतो आणि मातीतून उगवतो, माणसाच्या मनात वसतो. सर्वसामान्य माणसाच्या बुद्धीचा आवाका लक्षात घेऊन साधीसोपी उदाहरणे देऊन विचार करण्यास लावणारे गाडगेबाबा विलक्षण आहेत...