सदाशिव अमरापूरकर यांचे व्यक्तिमत्त्व असण्यापेक्षा ‘दिसण्या’वर भाळणाऱ्या सिनेमासारख्या चंदेरी दुनियेला अजिबात मानवणारे नव्हते. त्यामुळे त्यांनी त्या जगात वावरूनही स्वत:च्या प्रतिमेपेक्षा स्वत:च्या प्रतिभेवर विश्वास ठेवला आणि रूढी-चौकटी मोडून स्वत:साठी वेगळी वाट निवडली. त्यांनी सिनेमात करियर केली. पण ते स्वत:च्या विचाराने व स्वत:च्या शैलीने जगले. त्यांनी लोकप्रियता हा सगळ्यात महत्त्वाचा गुण मानल्या गेलेल्या सद्य काळात मूल्ये महत्त्वाची मानली. ते अहमदनगर जिल्ह्याच्या शेवगाव तालुक्यातील अमरापूर गावातून आले होते...
अण्णा हजारे यांचे दिल्लीतील उपोषण गाजले नाही. त्याची फलनिष्पत्तीदेखील अण्णांचे कार्यकर्ते व सरकार यांच्याकडून खूप उत्साहाने व्यक्त झाली नाही, त्याचे एक कारण म्हणजे अण्णांनी...
अण्णा हजारे यांनी त्यांच्या राळेगण सिद्धी या मूळ गावात पावसाचे नाल्यातून वाहून जाणारे अतिरिक्त पाणी अडवून आणि जमिनीच्या पोटात ढकलून नंतर ते गावातील विहिरींमार्फत...
अण्णा हजारे यांच्यावर होणाऱ्या विकृत टीकेमधून एक वेगळाच मुद्दा लक्षात आला. आम्ही सामाजिक व्यक्तींना कठोरपणे तपासतो व त्याउलट राजकारण्यांत सद्गुण शोधतो! महिन्यापूर्वी झालेल्या राज...
ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांनी अण्णा हजारे यांच्या आंदोलनाबद्दल आरंभापासून विरोधी सूर लावला आहे. नुकतीच त्यांनी एनडीटिव्ही आणि सीएनएन-आयबीएन या दोन वाहिन्यांवरून भाषणे करत...
- डॉ.अनिलकुमार भाटे
उपवास ही गोष्ट भारतीय संस्कृतीचा आणि विशेषत: अध्यात्माचा अविभाज्य भाग आहे. प्राचीन काळापासून अलिकडच्या सुमारे शंभर वर्षांपूर्वीपर्यंत उपवास ही व्यक्तिगत बाब...