Tag: गावगाथा
जाल तुम्ही जालगावी सुज्ञ बनोनी!
दापोली-जालगावची हनुमान जयंती भैरी देवाच्या जत्रेने मोठी होते. त्या ठिकाणी जालगाव, गव्हे आणि गिम्हवणे अशा तीन गावांचे मनोमिलन होते ! दोनशे वर्षांची ही केवढी थोर परंपरा आहे. एरवीही दापोलीचे उपनगर असे जालगाव गेल्या दहा वर्षांत दुपटीने वाढले आहे. बारा वाड्या आणि तीस नगरे असा त्याचा पसारा झाला आहे...
स्वच्छ आल्हाददायक हवेचे देगाव (Degaon village for clean and pleasant weather)
दापोली तालुक्यातील देगाव दापोली आणि खेड या दोन्ही तालुका शहरांपासून सुमारे तीस किलोमीटर दूर आहे; समुद्र सपाटीपासून उंचावर आहे. त्यामुळे थंड हवेचे व निसर्गसौंदर्याने नटलेले असे निरव शांततेचे आहे. तेथील सकाळ व संध्याकाळ विविध पक्षांच्या किलबिलाटाने आगळी असते. दक्षिणेकडील डोंगर-रांगेच्या कुशीत भर दुपारीही उन्हाला मज्जाव करणारे पाचकुडीचे दाट जंगल आहे. गावात भडवळ टेप, रावण टेप अशा टेकड्या आहेत...
मुर्डी : दापोली तालुक्यातील उद्यमनगरी
दापोली तालुक्यातील मुर्डी हे परंपरा आणि नवता एकत्र असलेले गाव. ते स्वतःचे असे खास अस्तित्व जपत असते. गाव त्याच्याच तोऱ्यात आणि मिजाशीत असते असे म्हटले तरी चालेल. ते छोटेसे टुमदार गाव; डोंगराच्या कुशीत वसले आहे. लोकमान्य टिळक यांनी जेव्हा सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केले त्या वेळेस मुर्डीत कृष्णशास्त्री पेंडसे यांच्या घरी दहा दिवसांचा गणेशोत्सव सुरू झाला. तो खाजगी असला तरी तो सर्व गावाचा वाटावा असे त्याचे स्वरूप सार्वजनिक होते. गावचे खोत, पेंडसे यांची आठ-नऊ घरे गावात राहती होती. खोती प्रतिवर्षी प्रत्येक घरी बदलती असे...
किन्होळा : जालन्यातील शिक्षकांचे गाव
किन्होळा हे हे गाव डोंगराच्या पायथ्याशी वसलेले आहे. या गावामध्ये जवळजवळ पस्तीस व्यक्ती शिक्षक या पदावर असून ‘शिक्षकांचे गाव’ अशी या गावाची ख्याती पंचक्रोशीत आहे. मात्र असे शैक्षणिक वातावरण गावात कशामुळे निर्माण झाले हे सांगता येत नाही. पण यांतील बरीच घरे दोन पिढ्या तरी शिक्षकी पेशात आहेत. गावाला सांस्कृतिक परंपरा लाभली आहे...
बोरी खुर्दला वैभव नदीचे !
बोरी अरब हे गाव यवतमाळ जिल्ह्याच्या दारव्हा या तालुक्यात येते. तेथील नदीला अडान नदी म्हणतात. त्या नदीमध्ये असलेल्या एका ठिकाणाला ‘लगीनबुडी’ असे म्हणतात. त्या गावचे माठ आणि चहा प्रसिद्ध आहेत. तेथे कापसाचा कारखानाही आहे...
दावलवाडी : जालना-बदनापूर जवळची संपन्नता
दावलवाडी हे गाव जालना जिल्ह्याच्या बदनापूर या तालुक्यात आहे. ते जालन्यापासून आठ किलोमीटर तर बदनापूर या तालुक्याच्या केंद्रापासून दहा किलोमीटर अंतरावर वसले आहे. या गावाने आर.आर. पाटील ग्रामविकास मंत्री असताना, ‘संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियाना’त जिल्ह्यात 2002 मध्ये दुसरा क्रमांक तर पुढच्याच वर्षी 2003 मध्ये पहिला क्रमांक मिळवला होता. गावाला राष्ट्रपती पुरस्कार 2000 ते 2005 या काळातील उल्लेखनीय कामाबद्दल मिळालेला आहे...
कोळथरे गावचा कासव जलार्पण सोहळा !
कोळथरे हे स्वच्छ आणि सुंदर समुद्रकिनाऱ्यासाठी प्रसिद्ध असलेले दापोली तालुक्यातील गाव ! तेथील समुद्र हा पर्यटकांच्या आकर्षणाचा भाग आहे. ते गाव दाभोळमधील बुरोंडीच्या पुढे मुख्य रस्त्यापासून खाली, समुद्रकिनारी वसलेले आहे. तेथील पंचनदी ही छोटीशी नदी जेथे समुद्राला मिळते तेथील परिसर निसर्गरम्य आहे. भारताच्या क्रिकेट संघातील एके काळचा जलदगती गोलंदाज अजित आगरकर यांचे कोळथरे हे गाव...
बालंबिका देवीचे बालमटाकळी
बालमटाकळी हे अहमदनगर जिल्ह्याच्या शेवगाव तालुक्याच्या पूर्व टोकाला वसलेले जुने गाव. त्या गावाला पूर्वी टाकळी किंवा बोधेगाव-टाकळी असे म्हटले जात असे. त्या शेजारीच बोधेगाव आहे. त्या गावाचे हे जोडगाव गणले जाई. गावाचे ग्रामदैवत बालंबिका देवी. तिच्या नावावरून त्या गावाला बालमटाकळी म्हणू लागले...
गाईगोधन परंपरेचे हनवतखेडा
हनवतखेडा हे अचलपूर पासून दहा किलोमीटर अंतरावर वसलेले टुमदार असे गाव आहे. गावाच्या मधोमध असणारे नागद्वार मंदिर संस्थान, नदीपलीकडे असणारे दत्तझिरी मंदिर प्रसिद्ध आहे. गावातील उत्तम शरीरसौष्ठव व उत्कृष्ट सजावट असणाऱ्या गार्इंच्या मालकांना पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते...
ऐतिहासिक वारसा असणारे मुंगी गाव
गोदावरी नदीकाठी गोदा संस्कृतीचा उदय झाला व तेथे अनेक गावे वसली. त्या गावांना धार्मिक, ऐतिहासिक, सामाजिक, राजकीय, आर्थिक महत्त्व आहे. मुंगी गाव त्यापैकी एक. त्याच्या एका बाजूला शांतिब्रह्म एकनाथ महाराजांचे पैठण, तर दुसऱ्या बाजूला संत शिरोमणी ज्ञानेश्वरांचे जन्मस्थान आपेगाव आहे. मुंगी गावाला पूर्वीच्या काळी पैठण शहरासारखे महत्त्व होते...