Home Tags कोल्हापूर

Tag: कोल्हापूर

कोल्हापूर

केळशी महालक्ष्मी मंदिर – मोगलकालीन प्रभाव(Mahalaxmi Temple at Kelshi)

रत्नागिरी जिल्ह्यातील केळशी येथील महालक्ष्मी मंदिराची जी इमारत आहे, तिच्यावर दाक्षिणात्य आणि मोगलकालीन कलेचा ठसा आढळतो. तेथील ध्वनीवर्धन, उगवतीच्या व मावळतीच्या सूर्यकिरणांचा देवीच्या चरणांना होणारा स्पर्श, झरी, पोळी या आगळ्यावेगळ्या गोष्टी मंदिराचे सौंदर्य वाढवतात...

वाल्मिकीचे पठार – पानेरी

वाल्मिकी पठार हे निसर्गरम्य पर्यटनस्थळ आहे. या पठारावर वाल्मिकी ऋषींनी वास्तव्य केल्याचे सांगितले जाते. तेथील वाल्मिकी मंदिर पूर्वाभिमुख असून, वाल्मिकींची मूर्ती गर्भगृहात आहे. त्या भागाचे आणखी महत्त्वाचे आकर्षण म्हणजे वन्य जीवांचा अधिवास असलेले घनदाट जंगल…

महालक्ष्मी मंदिर कांबीचे (Mahalakshmi Temple at Kambi)

कांबी गावचे महालक्ष्मी मंदिर हेमाडपंथी स्थापत्यशैलीत बांधलेले आहे. गाभाऱ्यात छतावर कोरलेली महालक्ष्मीची मूर्ती हे त्याचे मुख्य वैशिष्ट्य. महाराष्ट्रातील कोल्हापूरच्या अंबाबाईनंतर कांबीच्या महालक्ष्मीची महती सांगितली जाते…

सखा कलाल – एका कथाकाराची अखेर

सखा कलाल गेले आणि पंचेचाळीस वर्षांचा स्नेह सरला. सखा कलाल स्वत:विषयी फार कमी बोलायचे, त्यामुळे त्यांची जीवनकथा त्यांच्यासमवेत गेली. त्यांचे ‘ढग’ आणि ‘सांज’ हे दोन कथासंग्रह प्रसिद्ध झाले...

शालेय शिक्षणक्रमात नैतिक मूल्ये !

समाजात गुन्हेगारी वाढू नये याकरता मुलांना शालेय वयापासून नैतिकतेचे धडे देणे आवश्यक आहे असे म्हणणे कोल्हापूर येथील कारागृहाचे वरिष्ठ अधीक्षक चंद्रमणी इंदुरकर यांचे आहे. ते राष्ट्रपती पदकाने तसेच विविध पुरस्कारांनी सन्मानित अधिकारी आहेत...

… बेडेकर मोठे साहित्यिक का? (Why Bedekar is a great writer?)

‘रणांगण’ या एकमेव कादंबरीचे लेखक विश्राम बेडेकर कोल्हापूरला आले होते. त्यांना विचारलेला एक प्रश्न आणि त्याचे त्यांनी दिलेले उत्तर...

पस्तिसावे मराठी साहित्य संमेलन (Thirty fifth Marathi Literary Meet 1952)

पस्तिसावे साहित्य संमेलन अंमळनेर येथे 1952 साली झाले. त्या संमेलनाचे अध्यक्ष भाषाशास्त्रज्ञ आणि व्याकरणकार कृष्णाजी पांडुरंग (कृ.पां.) कुलकर्णी हे होते. त्यांचे मूळ गाव सातारा जिल्ह्याच्या कराड तालुक्यातील ओंड हे होय. ते भाषेच्या व्युत्पत्तिशास्त्राचे प्रकांडपंडित मानले जातात...

कथा कोल्हापूरातील पोलिश आश्रितांची – गांधी नगरची (Polish migrants during II world war in...

हिटलरचा प्रभाव पोलंड, हंगेरी, झेकोस्लाव्हाकिया वगैरे देशांत वाढू लागला तसतसे तेथील नागरिक कोणत्या ना कोणत्या कारणाने स्थलांतरित झाले व दोस्त राष्ट्रांच्या आश्रयाला आले. इंग्लंडच्या आश्रयास आलेल्या पोलिश लोकांना भारतात आणून त्यांची व्यवस्था कोल्हापूरजवळ वळिवडे कँपात केली गेली. जो परिसर आता गांधीनगर म्हणून ओळखला जातो...

भास्करराव जाधव : कोल्हापूरचे दुसरे शिल्पकार (Bhaskarrao Jadhav : Reformer from Kolhapur)

1
भास्करराव विठोजीराव जाधव यांचे वर्णन शिक्षणतज्ज्ञ जे.पी. नाईक यांनी कोल्हापूरचे दुसरे शिल्पकार असे केले आहे. पहिले अर्थातच शाहू महाराज. भास्करराव यांच्या नावे कोल्हापुरात एक चौक, एक ग्रंथालय आहे. शाहू छत्रपतींना सारी कारभारसूत्रे 1894 मध्ये मिळाली. त्यांच्या नजरेने भास्करावांना हेरले...

उद्धव महाराजांचे वाठार (How Wathar is connected with saint Eknath!)

बुवांचे वाठार हे सांगलीपासून जवळ असलेले गाव प्रसिध्द आहे. ते कोल्हापूर जिल्ह्यात येते. उद्धव महाराजांचे वास्तव्य वाठार या गावी होते. हे उद्धव महाराज म्हणजे एकनाथांचे नातू. वाठार गाव निसर्ग संपन्न आहे.