अजानुबाहू, गजमुख आणि विश्वसुंदरी; कलात्मक प्रतीकांची वाटचाल (Symbol’s of Beauty over The Period)

0
118
देवादिकांची रूपे ही कलाकारांनी प्रतीकात्मक रीतीने आकारलेली व रचलेली आहे. देवतांच्या रूपांची विविधता हे वैदिक संस्काराचे महत्त्वाचे अंग आहे. तेव्हा, गणपतीचे गजमुख असणे हे उगाच, योगायोगाने आलेले नाही; वा ते अपघाती असू शकत नाही. क्रोधमूर्ती खुद्द रुद्रेश्वर पुत्राच्या बाबतीत सा हलगर्जीपणा करण्याचे धाडस करणार नाही. दृगोचर कला (Visual Arts) जेव्हा सादृश्य सोडून भावदर्शनाला व प्रतीकात्मकतेला प्राधान्य देते (Impressionism) तेव्हा कलाकार प्रतिकृती हुबेहूब न करता, सादृश्याशी तडजोड करत आलेले आहेत. कवी तशीच सवलत गद्य व्याकरणातून घेत असतो. तसे करता करता जी कलाकृती कलाकाराच्याहातातून कलात्मक, सुंदर, मनोहर व प्रमाणबद्ध आकारात वतरते, तीच समाजात स्वीकारार्ह, आदरणीय ठरते आणि अजरामरही होऊ शकते.
दृगोचर ही कला Imitative, Two Dimensional, Three Dimensional आणि Four Dimensional अशी विकसित होत गेली आहे (काल आणि अवकाश यांची युती हे चौथे परिमाण). कलाकारांनी प्रत्येक कालखंडामध्ये प्रतीकात्मक रूपे मांडताना सादृश्याशी फारकत घेऊन अतिशयोक्ती, सुबोधता इत्यादी लक्षणांचा अवलंब केलेला आहे. भारतीय (हिंदू) शिल्पांचा व पुराणांचा शोध कलात्मक अंगाने घेत असताना, गजमुख जसे नजरेत भरते तसे दुसरे उदाहरण आहे अजानुबाहू रामाचे. ज्याचे हात गुडघ्यापर्यंत लांब आहेत असा लंबबाहू! पुरुष शूर, पराक्रमी व थोर आहे हे दर्शवताना अजानुबाहू हे प्रमाण कित्येक शतकांपर्यत (100 BC to 300 BC) कलाकारांनी वापरले. अर्थात पुरुषोत्तश्रीरामचंद्र हे आद्य अजानुबाहू. श्रीविष्णूचे वर्णन से नाही. त्यांना चार/सहा हात दाखवतात. जर एखाद्या पुरुषाचे हात फक्त गुडघ्यापर्यंत लांब वाढले, तर ते निश्चितच बेढब दिसेल. ते तसे दिसू नये म्हणून कलावंतांनी त्या पुरुष प्रतिमेच्या प्रमाणात व आकारात जरुरीप्रमाणे फेरफार करून, त्यात सौंदर्य व नियमबद्धता आणून नवीधाटणी (Style) निर्माण केलीअसणार. पुढे गौतम बुद्ध व महावीर यांनापण बऱ्याचदा अजानुबाहू धाटणीत साकारलेले आहे. पण अजानुबाहू का?
युद्ध तंत्रज्ञानाची वाटचाल ही मानवाच्या हातांचा समन्वयी उपयोग करण्यापासून झाली. पुढे काठी, हातोडा, परशू अशी मजल मारत युद्ध तंत्रज्ञान धनुष्यबाणापर्यंत वैदिक रामायण काळात पोचले. नुर्धत्यांचे लक्ष्य दुरून वेधू शकत होते. त्यामुळे मानव हा सर्व प्राण्यांत सामर्थ्यवान झाला होता. पण दोन माणसांच्या(नुर्धरांच्या) आपसातील लढाईचे काय? अर्थात, जो धनुर्धर बाणांचा जास्त लांब व अचूक मारा करू शकेल, तो मोठा. त्याला समोरच्याचा(प्रतिद्वंद्व्याचा) बाण मारण्याचा पल्ला सोडून उभे राहिले, की मग निर्भयतेने बाणांचा वर्षाव करत विजय मिळवणे सहजशक्य होई. त्या धनुष्यबाणांची (आयुधाची) घडण व त्यात वापरले जाणारे साहित्य हे मर्यादित होते. तसेच, ते सर्वांना उपलब्ध होते. साहजिकच, जेवढे धनुष्य मोठे तेवढी त्याची बाण लांब फेकण्याची ताकद जास्त. तसेच, खेच (Streching) जेवढा लांब तेवढा बाणाचा वेग जास्त आणि बाण जेवढे जड तेवढे जास्त जड धनुष्यत्यामुळे ज्याचे हात जास्त लांब व ताकदवान आहेत तो जास्त मोठे धनुष्य वापरू शकणार! जो बाण सर्वात जलद जाऊन, शत्रूची बचावकवचे अचूक भेदतो आणि लक्ष्य वेधतो, तसा बाण सोडणारा राम हा अजानुबाहू णारच. कारण तरच तो शिजींच्या भव्य धनुष्याला प्रत्यंचा लावू शकणा!
असो. सांगण्याचा मुद्दा असा, की कलाकारांच्या विविध धाटणींना कोणत्या तरी वास्तवाचा आधार असतो. महाभारतात श्रीकृष्णाने बुद्धीचा वापर संख्याशक्तीविरूद्ध यशस्वीपणे करून दाखवला. त्यानंतरच्या काळात बुद्धी किंवा ज्ञान हे निव्वळ शरीरबळापेक्षा थोर आहे हे मान्यताप्राप्त झाले. विद्येचे महत्त्व वाढून तिला दैवताचा दर्जा देणे हे क्रमप्राप्तठरले. साहजिक सरस्वतीपती गणपती विद्येची देवता झाला! पण तो गजानन किंवा गजमुखच का? तो विद्यापती म्हणून विघ्नहर्ता. तो महर्षी व्यासाने सांगितलेले ब्रह्मज्ञान (वेद व वेदातीत) अचूक टिपणारा म्हणूश्रुतिश्रेष्ठ. त्याला ज्ञानाची अपार भूक वगैरे वगैरे. हुशारीचा व ज्ञानाचा शरीरयष्टीशी, रंगाशी, उंचीशी संबंध नाही. तेव्हा कलाकारांना प्रश्न पडला असणार, या दैवताचे प्रतीक कसे मांडावे?
शतके उलटली तरी भारतभ्रमण करूनही त्या प्रश्नाचे उत्तर सापडले नसावे, कारण गणपतीचे गजानन रूप प्रचलित झाले ते सातव्या-आठव्या शतकात. सातव्या शतकापर्यंत दोन गोष्टी घडल्या:  पहिली म्हणजे जगात इतर संस्कृती विकसित झाल्या विशेष करून ग्रीकोरोमन (त्याआधी इजिप्शयन, मेसोपोटेमीयन व चीनी संस्कृती अस्तित्वात होत्या). दुसरे म्हणजे दळणवळण प्रस्थापित झाल्याने ज्ञानाची व माहितीची देवाणघेवाण सुरू झाली. अविकसित हबशी नकटे तर विकसित ग्रीक नेटक्या नाकाचे. म्हणून ग्रीक संस्कृतीत जो मोठ्या व धारदार नाकाचा तो हुशार अशी समजूत होती. त्या कल्पना दळणवळणाबरोबर पसरत गेल्या. तशा त्या भारतीय शिल्पकारांकडेहीपोचल्या असणार. त्या टप्प्यावर भारतीय संस्कृतीचा अभ्यासक म्हणून मला एक कल्पना लढवावीशी वाटते… जसे प्रभू रामचंद्रांचे हात (अजानबाहू) लांब केले, तसे गणेशाचे नाक लांब करावे असे मनात आलेअसणार. अती लांब नाकाचा म्हणजेच सर्वात हुशार असा प्रतकात्मक चेहरा काही करता येईना. पार्वतीने केलेले मातीचे मॉडेल शिवाने नापसंत केले आणि रागावून त्याचे डोकेउडवून टाकले! तेव्हा सर्वजण ब्रह्माजींना शरण गेले. “हे सृष्टीकर्त्या, तुम्ही अब्जावधी रचना व निर्मिती केल्या आहेत, तुमचा अनुभव अपार आहे. तुम्हीच यातून मार्ग दाखवा. आम्हाला आराखडा द्या.” ब्रह्माजी म्हणाले असणार, “रे मूढांनो, असे गुण प्रतीत करणारी रचना मी केलेलीच आहे तीच वापरा. सर्वात लांब नाकाचा, मोठे श्रवणेद्रिय (कान) असणारा, शाकाहारी, ज्याचा आकार बघून(घाबरून) सर्व (संकटे) पळून जातात असा, परंतु तरीही जवळून बघणाऱ्यास कोमलनयनी, शंभर ते सव्वाशे पुरुषांना जमणार नाही एवढे खाऊन पोटात साठवणारा, दहा-वीस वर्षांच्या भ्रमंतीनंतरही स्वत:ची जन्मभूमी आणि स्मशानभूभी अचूकपणे लक्षात ठेवणारा, कामाचे ओझे वाहू शकेल असा अपार ताकदवालाज्याच्यावर काम सोपवले की निश्चिंत व्हावे असा, ज्याचा जीवनकाल मनुष्याशी मिळताजुळता आहे, भव्य कपाळाचा असा गुणवान सस्तन प्राणी मी पृथ्वीवर पाठवलेला आहे. तो आहे हत्ती. त्याचे डोके-पोट वापरा.”
आठव्या शतकातील व या चालू शतकातील गजमुखाचा पूर्णाविष्कार हा साक्षी आहे. गणेश पुराण संपले तरीही सादृष्याशी दुरावा करून अर्थकारणाची भेसळ करण्यासाठी किंवा कशासाठीही प्रतिमा जास्त ठळकपणे मांडण्याची कलावंतांची परंपरा चालू आहे. नवीसंस्कृतीप्रमाणे नवनवीन कलाकृती उदयास येतात. अगदी अलिकडे जाहिरातबाजीने सौंदर्याविष्कारात बाजी मारली आहे ती लंबपद विश्वसुंदरीने. अजानबाहू, गजमुख यांची प्रतीके बनून ती पुराणकथांत सामील झाली. गजमुखाच्या संकल्पनेला अजानबाहूच्या पुढे अर्थ काय प्राप्त झाला तो त्या आकाराच्या शक्यतांतील विविधतेने. त्यामुळे गजमुख अक्षरश: सहस्रावधी/लक्षावधी प्रकारे आविष्कृत होत असते. त्याला जाती-धर्म-प्रांत-प्रदेश कशाचे बंधन राहिलेले नाही. निव्वळ सौंदर्याचे प्रतीक म्हणून ते पाहिले जाऊ शकते. अजानुबाहू राम मात्र त्याच्या शौर्यादी गुणांमुळे भारतीय भावजीवनापुरता सीमित राहिला आहे. सध्या सुंदर म्हणजे अती लांब पायांची, रंभोरू नव्हे. काडीयष्टी हे प्रमाण खरे सुंदर आहे म्हणून लोकमान्य नाही; तर त्यावर टांगलेले कपडे, फोटो काढताना सुरकुतले जात नाहीत म्हणून. कपडे विकले गेल्याशी कारण. तोच तर विश्वसुंदरी प्रतिमा बनवण्यामागील हेतू आहे. कलाकारांनी अती लांब पायांची प्रमाणशून्यता लपवून कलाकृती/रचना सुंदर होईल असे कपडे विश्वसुंदरीवर चढवले आहेत. त्यांच्या त्या कौशल्याचे कौतुक करायलाच हवे.
– विनय चांदे
vinaychandearchitect@gmail.com
————————————————————————————————————————

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here