विनय चांदे
अजानुबाहू, गजमुख आणि विश्वसुंदरी; कलात्मक प्रतीकांची वाटचाल (Symbol’s of Beauty over The Period)
देवादिकांची रूपे ही कलाकारांनी प्रतीकात्मक रीतीने आकारलेली व रचलेली आहेत. देवतांच्या रूपांची विविधता हे वैदिक संस्काराचे महत्त्वाचे अंग आहे. तेव्हा, गणपतीचे गजमुख असणे हे उगाच, योगायोगाने आलेले नाही; वा ते अपघाती असू शकत नाही.