Home Search
संशोधक - search results
If you're not happy with the results, please do another search
स्त्रीपुरूष तुलना – काल आणि आज (Comparing Men and Women – Yesteryears...
ताराबाई शिंदे यांचा ‘स्त्रीपुरूष तुलना’ हा निबंध सन 1882 मध्ये प्रकाशित झाला. एका विधवा स्त्रीने केलेल्या भ्रूणहत्येमुळे खवळून उठलेल्या आणि त्या स्त्रीला धारेवर धरणाऱ्या समाजावर धारदार लेखणीने ताराबाईंनी या निबंधात अक्षरश: कोरडे ओढले आणि त्यावर मीठही चोळले. हिंदू शास्त्र-पुराणांविषयी आणि देवादिकांविषयी तर त्यांचे विचार असे जहाल आहेत की ते वाचताना आज त्या हयात नाहीत हे लक्षात येऊन हायसे वाटते. त्या स्वदेशी उद्योगधंद्यांच्या -हासाचीही चिकित्सा करतात...
महाराष्ट्रातील पहिले वर्तमानपत्र – साप्ताहिक दर्पण
बाळशास्त्री जांभेकर यांनी महाराष्ट्रातील पहिले वर्तमानपत्र - इंग्रजी, मराठी साप्ताहिक ‘दर्पण’ आणि पहिले मराठी मासिक ‘दिग्दर्शन’ काढले. त्यांच्याच प्रेरणेने, साह्याने व मार्गदर्शित्वाने भाऊ महाजन यांनी ‘प्रभाकर’, ‘धूमकेतु’ ही साप्ताहिके व ‘ज्ञानदर्शन’ नामक त्रैमासिक चालवले. अर्थात स्वतः वृत्तपत्र व मासिक काढूनच नव्हे, तर दुसऱ्यांसही तशी प्रेरणा करून बाळशास्त्री यांनीच आधुनिक महाराष्ट्राला वृत्तपत्रांचे व मासिकांचे महत्त्व पटवून दिले असे दिसून येईल...
जगाचे नेतृत्व करणारी दहा शहरे (The Cities that Led the World: From Ancient Metropolis...
‘द सिटीज् दॅट लेड द वर्ल्ड: फ्रॉम एन्शन्ट मेट्रोपोलिस टू मॉडर्न मेगासिटी’ हे पॉल स्ट्रॅदन लिखित पुस्तक जगातील दहा अस्तित्वात असलेल्या आणि नसलेल्या महानगरांच्या माध्यमातून जवळपास सहा हजार वर्षांच्या मानवी इतिहासाचा आढावा घेते. महानगरे ही संस्कृती-संकराची वाहक असतात. त्यांच्यामुळे मानवी संस्कृतीला आजचे रूप येत गेले आणि पुढेही येत राहील. या संस्कृतिकारणाचा शोध इसवी सन पूर्व चार हजार वर्षे बॅबिलॉन या शहरापासून सुरू होतो तो आजच्या बिजिंग आणि मुंबई या शहरांपर्यंत येऊन थांबतो. इतिहासाचा हा दीर्घ पल्ला आहे. या चित्तवेधक पुस्तकाचा परिचय करून देत आहेत नामवंत वास्तूविशारद आणि शहर नियोजनकार सुलक्षणा महाजन...
उच्च शिक्षण, संशोधन – काही प्रश्न काही उत्तरे…
देशाला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्षे झाली. मात्र शिक्षणाचे मूळ उद्दिष्ट समजून घेतले जात नाही. शिक्षण हे पदवी-सर्टिफिकेट घेण्यासाठी अन् पर्यायाने नोकरीसाठी गरजेचे म्हणून घेतले जाते. ज्ञान मिळवण्यासाठी शिक्षण हे मूळ उद्दिष्ट बाजूला राहते. त्यामुळे शिकवणारे, शिकणारे या सर्वांची दिशाभूल होते. सगळे लक्ष मार्क्स, श्रेणी, पर्सेंटेज यांकडे लागलेले. परीक्षांचे नियोजनदेखील त्या उद्दिष्टाने केले जाते. कोणतीही परीक्षा विद्यार्थी काय, कसे शिकला हे तपासत नाही...
क्रांतियुद्ध 1857 च्या आधीचे उठाव (Uprisings against British prior to struggle for independence of...
स्वातंत्र्यासाठी ब्रिटिश सत्तेविरूद्ध उठाव 1857 च्या क्रांतियुद्धाअगोदरही झालेले होते. दक्षिणेतील वेलोर छावणीतील हिंदी शिपायांना कपाळावर गंध लावण्यास, कानात भिकबाळ्या घालण्यास किंवा दाढी राखण्यास बंदी 1806 साली घातली होती. त्यामुळे हिंदू-मुसलमानांनी त्यांच्या भावना –धर्मभावना दुखावल्या गेल्या म्हणून उठाव केलेला होता. कंपनी सरकारने साताऱ्याचे छत्रपती प्रतापसिंह यांना पदच्युत करून त्यांचे राज्य 1839 साली खालसा केले...
वाडवळी बोली – अम्लान लेणे (Dictionary of Wadvali Dialect)
वाडवळी ही उत्तर कोकणपट्टीतली प्रचलित बोली. कोंकणी, पोर्तुगीज, लॅटीन, फारसी, अरबी आणि मराठी अशा विविध भाषांमधले शब्द सामावून घेणारी ही एक मनोज्ञ बोलीभाषा आहे. या बोलीभाषेचा शब्दकोश मूळचे वसईचे असलेले आणि सध्या ऑस्ट्रेलियात स्थायिक झालेले रिचर्ड नुनीस यांनी संपादित केला आहे. मराठीला कोशवाङ्मयाची समृद्ध परंपरा आहे त्या परंपरेत हा शब्दकोश मोलाची भर घालेल. या शब्दकोशाला डॉ. सिसिलिया कार्व्हालो यांनी अभ्यासपूर्ण प्रस्तावना लिहिली आहे. त्या प्रस्तावनेतला हा संपादित अंश...
रुक्ष, ओसाड बरड : पालखीचा तेवढा विसावा ! (Barren Barad)
माणूस ज्या भूमीत, ज्या गावात-खेड्यात जन्मला त्या भूमीचा एकेक कण त्याला काशी, गया, मथुरा ह्यासम पवित्र-पावन असतो. तेथील काटेरी बोरीबाभळींना त्याच्या हृदयी पाईन-देवदारपेक्षाही वीतभर जास्तच उंची लाभलेली असते ! गाववेशीवरील म्हसोबा, वेताळ अन बिरोबा ही तर त्याची खरीखुरी ज्योतिर्लिंगे असतात ! बरड हे माझे गाव माझ्यासाठी प्रेमाचे तशा प्रकारे आहे. अन्यथा बरड गाव नावाप्रमाणे वैराण, उजाड आहे. ते सातारा जिल्ह्याच्या पूर्वेकडे आहे. ते गाव पुणे-पंढरपूर ह्या राज्य महामार्गावर फलटणपासून पूर्वेस अठरा किलोमीटर अंतरावर आहे...
फलटणचे दीडशे वर्षांचे वाचनालय (Phaltan public library celebrates 150 years of its foundation)
फलटण संस्थानामध्ये एकोणिसाव्या शतकात वाचनालयाची स्थापना झाली. ती कामगिरी संस्थानचे अधिपती मुधोजीराजे नाईक-निंबाळकर यांची. तेव्हा तिला ‘नेटिव्ह जनरल लायब्ररी’ असे म्हटले गेले. स्थापना दिन आहे 9 ऑगस्ट 1870. म्हणजे लायब्ररीला दीडशे वर्षे होऊन गेली आहेत. तालुका पातळीवरील वाचनालय हे त्या काळी अप्रूप होते. मुधोजीराजांनी दोन हजारांपेक्षा अधिक ग्रंथ वाचनालयात संग्रहित केले. ते जुने ग्रंथ हे त्या वाचनालयाचे वैशिष्ट्य ठरले आहे. ते ग्रंथ जतन करण्यात आले आहेत...
नागलवाडीचे नागार्जुन – पुराणे शास्त्रज्ञ
नगर जिल्ह्याच्या शेवगाव तालुक्यातील नागलवाडी हे मराठवाड्याच्या सीमेलगत वसले आहे. म्हणून त्याला तालुक्यातील शेवटचे गाव असे म्हणतात. नागलवाडी गाव छोटे असले तरी त्याची महती थोर आहे. गावाला पौराणिक व ऐतिहासिक असे दोन्ही संदर्भ लाभले आहेत. तेथे केदारेश्वरचे जुने मंदिर आहे. तेथून जवळ असलेल्या गुहेत प्राचीन रसायनशास्त्रज्ञ नागार्जुन यांची प्रयोगशाळा व वास्तव्य होते असे सांगितले जाते...
अहमदनगरचा ऐतिहासिक फराहबक्ष महाल
मलिक अहमदने भिंगारजवळ एक किल्ला आणि शहर वसवावे असे ठरवले. त्याप्रमाणे शहर आणि शहरातील वास्तू उभारण्यास 28 मे 1490 या दिवशी सुरुवात केली. अहमदनगर शहरातील तशा वास्तूंपैकी एक आहे फराहबक्ष महाल. त्याला नगरी भाषेत फऱ्याबाग किंवा फराहबाग म्हणून ओळखतात. ती नगरमधील सर्वांत मोठी ऐतिहासिक वास्तू आहे. ती वास्तू निजामशाहीतील वैभवशाली दिवसांची साक्ष आहे...