Home Search
संस्था - search results
If you're not happy with the results, please do another search
श्रद्धेचे व्यवस्थापन – श्री गजानन महाराज संस्थान
मी शेगावला कामानिमित्त जाणार आहे, असे बायकोला सांगितल्यावर तिने सात्त्विक राग व्यक्त केला. मग म्हणाली “मी महाराजांची पोथी वाचते आणि तुला महाराज बोलावतात. हे...
शुभदा लांजेकर व आवाबेन नवरचना संस्था
शुभदा लांजेकर यांचा जन्म पुण्यातील. बालपण बरे गेले. त्या अकरावीपर्यंत शिकल्या. वडील अतिशय कडक शिस्तीचे. आई प्रेमळ, मनमिळाऊ, पाककलेची आवड असणारी गृहिणी होती. दुसऱ्यांना...
कुरूंदवाड संस्थान
पटवर्धन घराणे पेशवाईत प्रसिध्दी पावले. त्यांचा मूळ पुरूष हरिभट. त्यांचा मुलगा त्र्यंबकराव. त्यांना दोन मुलगे -निळकंठराव आणि कोन्हेरराव. ते दोघे पराक्रमी होते अशी इतिहासात...
आपटे गुरुजी – येवल्यातील राष्ट्रीय शाळेचे संस्थापक
नाशिक जिल्ह्यातील येवले हे तालुक्याचे शहर तात्या टोपे यांची जन्मभूमी म्हणून ओळखले जाते. तेथे कै. आपटे गुरुजी यांनी 23 मे 1921 रोजी राष्ट्रीय शाळा...
दहिगाव संस्थानचे वर्तमान
सोलापूर जिल्ह्याच्या माळशिरस तालुक्यातील दहिगाव हे जैनांचे भगवान महावीर व ब्रम्हमहती शांती सागर महाराज यांच्या क्षेत्रामुळे प्रसिद्ध आहे. दहिगाव नातेपुतेपासून दहा किलोमीटर अंतरावर आहे....
त्र्यं.वि. सरदेशमुख : साहित्याचे आध्यात्मिक मूल्य (Prof T V Sardeshmukh took criticism to spiritual...
त्र्यं.वि. सरदेशमुख यांची जन्मशताब्दी 2020 साली झाली. त्यांची मुख्य ओळख कादंबरीकार आणि समीक्षक म्हणून आहे. त्यांनी कादंबरी, कविता, समीक्षा, नाटक, अनुवाद असे वेगवेगळ्या प्रकारचे लेखन केले. त्यांच्या साहित्यकृतीचा लेखक निशिकांत ठकार यांनी लेखस्वरूपात घेतलेला आढावा...
नमन-खेळे : श्रद्धा व नाट्य यांचे मिश्रण (Naman-Khele – Folk art that combines Devotion...
नमन-खेळे हा कोकणातील एक लोकनाट्य प्रकार आहे. नमन-खेळे यातील नमन या शब्दाचा अर्थ देवाला नमस्कार करणे, देवापुढे नम्र होणे, देवापुढे वाकणे, लवणे हा आहे. खेळे म्हणजे आराध्य देवतांची भक्ती करताना शक्ती, नृत्यक्रीडा व नाट्य यांचा समन्वय साधून सादर केलेला लोकनाट्यप्रकार. नमन-खेळेच्या आरंभी बारा नमने असतात. देव-देवता, ग्रामदेवता, धरित्री माता, चंद्र-सूर्य, पाच पांडव, सप्तऋषी, सप्तसागर, गुरुस्वामी, दहाखंडकाशी रावण व प्रेक्षक यांना नमन केले जाते...
गोपीनाथ पाटील : ठाणे-कळव्याचे ध्यासपर्व (Gopinath Patil’s dedicated work for Kalawa area)
ठाण्याजवळच्या कळवा गावचे गोपीनाथ पाटील हे ध्येय व ध्यास घेऊन सार्वजनिक जीवनात वावरले. त्यांच्या कार्यासाठी त्यांचे परवलीचे सूत्र होते, सहकार ! तेच कार्यसूत्र, खरे तर, स्वातंत्र्योत्तर काळातील संस्था, उपक्रम यांच्या स्थापनेत होते. गोपीनाथ यांच्यामुळे अनेक उपक्रम स्वतःच्या पायावर कळवा परिसरात भक्कमपणे उभे आहेत. ती त्यांच्या कार्याची पावती होय.
ते ज्या कळवा गावात राहत होते ते गाव ठाणे या शहराला लागून असूनसुद्धा अनेक सुविधांपासून दूर होते. कळवावासीयांना दैनंदिन व्यवहारिक गरजा भागवण्यासाठी ठाण्याची वाट तुडवण्याला पर्याय नव्हता. कळव्यातील ते अंधारयुग नष्ट करण्यासाठी आंतरिक तळमळीने उभे राहिले ते गोपीनाथ पाटील. त्यांच्या सार्वजनिक कार्यातून उभ्या राहिल्या अनेकानेक संस्था...
ताराबेन मश्रुवाला – माधानच्या दीपशिखा (Taraben Mashruwala changed the face of Madhan village)
ताराबेन मश्रुवाला या नाजुक-किरकोळ प्रकृतीच्या, व्रतस्थ ब्रह्मचारी स्त्रीने त्यांचे पूर्ण आयुष्य लोककल्याणासाठी खर्ची घातले. त्यांनी विदर्भातील अमरावती जिल्ह्यात आडमार्गावर असलेल्या माधान या लहानशा खेड्याचा कायापालट केला. तेथे त्या आधी कोणत्याही प्रकारच्या सोयीसुविधा नव्हत्या. ताराबेन यांनी महात्मा गांधी यांचे ग्रामसुधारणेचे स्वप्न तेथे प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न केला. माधान हे सातपुडा डोंगर पायथ्याशी वसलेले ओसाड असे खेडेगाव आहे. ते महाराष्ट्रात ‘आदर्श ग्राम’ रूपात आणि सामाजिक कार्याच्या रूपात नावाजले गेले...
नरसिंग महाराजांच्या नाना लीला
अकोला जिल्ह्यातील आकोटजवळच्या जळगाव (नाहाटे) गावात एक ब्राह्मण वतनदार पाटील होता. ही 1720 पूर्वीची गोष्ट. गावात गवळी लोकांची वस्ती जास्त होती. वतनदार पाटलांच्या पूर्वजांनी तेथे एक गढी बांधली होती. त्या गढीच्या उत्तर बाजूला एक दरवाजा होता. गढीत असलेल्या पाटलाच्या वाड्याला ‘चंदनाचा वाडा’ असे म्हणत. त्यापैकी वाडा वगळता गाव, कोट, बुरूज, विहीर व दरवाज्यांचे अवशेष कायम आहेत. त्याच नाहाटे वंशात पुंजाजी पाटील नामक गृहस्थ होते. त्यांना दोन पत्नी होत्या. ज्येष्ठ पत्नी यमाबाई व कनिष्ठ पत्नी राजुबाई. राजुबाईंचे माहेर जळगाव(नाहाटे)पासून तीन मैलांवरील शिरसोली ग्राम हे होते...