Home सांस्कृतिक नोंदी

सांस्कृतिक नोंदी

अमृत्या – आमच्या कशेळीचा फणस

माझे आजोबा म्हणत, ’अमृत्या खाशी, त्याची कीर्ती वीस कोशी’. दरवर्षी त्याला खूप फणस लागतात. हा लाल मातीचा गुण असावा. कशेळी गाव तिन्ही बाजूंनी पसरलेल्या अथांग अरबी समुद्राच्या कुशीत उतरत्या डोंगरात शांत वसलेले आहे. त्या गावात 1661 मध्ये शिवाजी महाराजांचे आगमन झाले होते ! गावात कऱ्हाडे ब्राह्मणांची वस्ती जास्त आहे. आमच्या आगरातील बरक्या फणसाचे वैशिष्टय असे, की त्याचे गरे रसाळ व चवीला अमृतासारखे गोड लागत. म्हणून आमच्या पूर्वजांनी त्याला ’अमृत्या’ असे योग्य नाव दिले होते...

मुंतोजी – मुसलमान मराठी संतकवी

अनेक मुसलमान संतकवी महाराष्ट्रात पंधराव्या शतकापासून ते अठराव्या शतकापर्यंत होऊन गेले आहेत. त्यांनी मराठी भाषेत अभंग लिहिले. त्यांमधील अग्रगण्य कवी म्हणजे शहा मुंतोजी ब्रह्मणी किंवा मुंतोजी बामणी. ते ‘मृत्युंजयस्वामी’ या नावाने प्रसिद्ध होते. ते एकनाथ-तुकाराम यांच्या काळातील. ते शहा मुतबाजी कादरी आणि ‘ज्ञानसागर अय्या’ अशा नावांनीही ओळखले जात. ते बहमनी राजघराण्यातील होते असे अनुमान आहे. त्यांना आनंद संप्रदायातील सहजानंद स्वामींचा गुरूपदेश मिळाला होता...

साने गुरुजींचा पंढरपूर मंदिरप्रवेश सत्याग्रह

पंढरपूरची वारी पुण्याजवळच्या देहू-आळंदीपासून सुरू होते. महाराष्ट्राच्या गावागावांतून दिंड्या निघालेल्या असतातच. लक्षावधी वारकरी वीस दिवस चालत असतात. वारीची सांगता एकादशीला पंढरपूर तीर्थक्षेत्री होते. डोळ्यांत भक्ती आणि मुखावर हरिनाम जपणारे हे वारकरी, समाजातील एकतेचे जिवंत चित्र उभे करतात. त्यामुळे वारी केवळ धार्मिक यात्रा राहत नाही; ती महाराष्ट्राच्या संस्कृतीचे प्रतीक होते. मात्र लक्षात घेतले पाहिजे, की हाच सोहळा कधी काळी समाजाच्या एका मोठ्या वर्गासाठी क्लेशदायक होता. अनेक दिवस चालून आलेल्यांपैकी काही वंचितांना गाभाऱ्यात जाऊन पांडुरंगाचे दर्शन न घेताच परत फिरावे लागे. त्या अन्यायाला वाचा फोडली ती साने गुरुजी यांनी...

भद्र समाज – बंगाल व महाराष्ट्र (Bhadra Community of Bengal and Maharashtra)

बंगालच्या भद्र समाजाबद्दल महाराष्ट्रात उच्चभ्रू वर्गाला सतत आकर्षण वाटत आले आहे, कारण जगात फ्रेंच आणि भारतदेशात बंगाली हे लोक प्रखर भाषाभिमानी मानले जातात. येथे सुवर्णा साधू-बॅनर्जी बंगालच्या ‘भद्रलोक’ची वैशिष्टये सांगता सांगता बंगाली व मराठी लोकसमूहांची तुलना ऐतिहासिक संदर्भात मांडत जातात...

सारंगाच्या छायेत

सारंग हे नावच किती मोहक आहे ! जसे नाव तसा राग आहे. त्याचा आवाकाही फार मोठा आहे. ऊन चढल्यावर मध्यान्ह येते; त्या वेळच्या रागांमध्ये सारंगाचा वावर आहे. जेव्हा केवळ ‘सारंग’ असा उल्लेख होतो; तेव्हा त्याचा इशारा हा वृंदावनी सारंग रागाकडे असतो किंवा सारंग या रागांगाकडे असतो. रागांग म्हणजे अशी स्वराकृती की जी सगळ्या सारंग प्रकारांचे ‘सारंग’पण निश्चित करते. अशा एकापेक्षा जास्त स्वराकृतीही असू शकतात. त्या एखाद्या रागाला सारंगाचा प्रकार म्हणता येण्यासाठी कारणीभूत ठरतात. उदाहरणार्थ, सा रे म प नी, म ऽ रे नि ऽ सा, रेम रेसा निसा इत्यादी. सारंगाच्या विस्तीर्ण परिवारातील मुख्य सारंगांचे तीन प्रकार - वृंदावनी सारंग, शुद्ध सारंग आणि मधमाद सारंग ...

उपनयन संस्कार कालबाह्य झाला आहे का?

‘उपनयन’ संस्काराची सुरुवात कुटुंबातील बालकाचा ‘विधिपूर्वक शिक्षण-प्रवेश’ व्हावा या हेतूने झाली असावी. ती प्रथा कायमस्वरूपी व शिष्टसंमत होण्यासाठी ती ‘धर्मसंस्कार’ म्हणून स्वीकारली गेली. पण तो विधी सध्याच्या काळात गरजेचा आहे का? तेव्हाची आणि आजची जीवनपद्धत-शिक्षणपद्धत यांत बदल झाला आहे. त्यामुळे मुंज कालसापेक्ष राहिलेली नाही असे मत अशोक विद्वांस यांनी त्यांच्या स्वतःच्या उदाहरणांद्वारे त्यांच्या उपनयन संस्कार कालबाह्य झाला आहे का? या लेखात स्पष्ट केले आहे. त्याच लेखात स्त्रीवर्ग अशा धार्मिक समजल्या जाणाऱ्या विधींकडे कसे पाहतो तेही स्पष्ट होत जाते...

एका अस्पृश्याच्या मुंजीची मौज

सांगलीजवळील कवलापूर या गावात पन्नास वर्षांपूर्वी स्पृश्य आणि अस्पृश्य यांच्यातील दरी मिटली. त्याला कारण ठरले डॉ. जय भोरे. त्यांनी लिहिलेल्या ‘द अनटचेबल ब्राह्मिन ख्रिश्चन’ या लेखाचा थोडक्यात अनुवाद सुधीर दांडेकर यांनी एका अस्पृश्याच्या मुंजीची मौज या लेखाद्वारे करून दिला आहे...

सर्व जातीय सामुदायिक व्रतबंध उपक्रम

0
काही ज्ञाती संस्था मुंजीसारखे धार्मिक समजले जाणारे विधी ज्ञातिबांधवांसाठी सामूहिक रीत्या साजरे करत असते. त्यामुळे समाजाची सोय होतेच; त्याबरोबर पैशांचा अवास्तव खर्चही टाळला जातो. ठाण्याच्या ‘चांद्रसेनीय कायस्थ प्रभू सभा’ या संस्थेचे कार्याध्यक्ष दीपक फणसे यांनी तशा उपक्रमाची माहिती आणि तो कसा साजरा केला जातो ते सर्व जातीय सामुदायिक व्रतबंध उपक्रम या लेखात सांगितले आहे. तो लेख नमुनादाखल आहे, कारण अनेक संस्था असे संस्कारविधी सामूहिक रीत्या करत असतात...

संस्कार- उपनयन

स्मिता भागवत यांच्या संस्कार- उपनयन या लेखात त्यांनी जुन्या काळापासून आजपर्यंतचा मुंज विधी-संस्कारासंदर्भातील आढावा घेतला आहे. उपनयन विधी, तो कसा केला जातो, शिष्याचे त्यानंतरचे जीवन कसे असते/ असावे याचे विवरण केले आहे...

संत एकनाथ यांच्या गवळणी

0
संत एकनाथ यांनी ज्ञानेश्वरी ग्रंथाचे आणि ज्ञानदेवांच्या समाधीचे संशोधन प्रथम केले !. नाथांनी त्यांच्या वाङ्मयातून भागवत धर्माच्या परपंरेचे सातत्य आणि विकास साधला. त्यांचे नाथ भागवत, रुक्मिणी स्वयंवर, भावार्थ रामायण हे तात्त्विक चिंतनपर ग्रंथ. नाथांच्या आत्माविष्काराला वाट मिळते ती प्रामुख्याने त्यांच्या स्फूट रचनेतून. तशा स्फूट रचनांत अभंग, भारुडे, गवळणी, विरहिणी, कृष्णकथा, पदरचना अशा साऱ्यांचा समावेश होतो. संत एकनाथ यांच्या गवळणी विशेष प्रसिद्ध आहेत...