_Door_Step_School_1.jpg

रजनी परांजपे यांची शाळा तुमच्या दारी!

रजनी परांजपे यांनी ‘डोअर स्टेप स्कूल’’च्या माध्यमातून शिक्षणापासून वंचित मुलांना शिक्षण आणि संस्कार देऊन चांगला नागरिक घडवण्याचा ध्यास घेतला आहे. रजनी त्यांची ‘डोअर स्टेप...

बळीराजाची मुले, झाली ‘अशोक’वनातील फुले

दुष्काळ आणि शेतकऱ्यांची आत्महत्या या विषयावर चर्चा-परिसंवाद एवढी वर्षें होऊनही त्यातून काही निष्पन्न झाले नाही. अशा वेळी अशोक देशमाने या तंत्रशिक्षित तरुणाने थेट ‘निष्काम कर्मयोग’ स्वीकारला! अशोकने आयटी क्षेत्रातील गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून शेतकऱ्यांच्या भावी पिढीला उज्ज्वल भवितव्य देण्याचा ध्यास घेतला आहे. त्याचे मन पुण्यात हडपसर येथे आयटी कंपनीत नोकरी करत असतानाही गावाकडे धाव घेत असे. तो एकदा दिवाळीच्या सुट्टीत परभणी जिल्ह्यातील त्याच्या मंगरूळ गावी गेला असताना तेथील स्थानिक शेतकऱ्याने दुष्काळाला कंटाळून आत्महत्या केल्याची बातमी त्याच्या कानावर पडली. तो त्या बातमीने अंतर्बाह्य हेलावून गेला. त्याचे गाव-गावकरी-शेजारीपाजारी दुःखात असताना शहरात तो सुखात राहत आहे या विचाराने अस्वस्थ झाला. त्याला त्याचा भूतकाळ आठवला. त्याने तशी परिस्थिती अन्य मुलांवर येऊ नये म्हणून शिक्षणयज्ञ सुरू केला...
_Raju_Bhadke_1.jpg

पंचेंद्रियांनी शिक्षण – राजू भडकेचा प्रयोग

विनोबांच्या ‘मधुकर’ या पुस्तकात शिक्षणावर एक सुंदर वाक्य आहे: ‘अश्व या शब्दाचा अर्थ कोशात घोडा दिला आहे, पण त्याचा खरा अर्थ तबेल्यात बांधला आहे...
carasole

प्रगती प्रतिष्ठान – आदिवासी विकासासाठी प्रयत्‍नशील

‘प्रगती प्रतिष्ठान’ ही संस्था पालघर जिल्ह्यामध्ये जव्हार व मोखाडा तालुक्यांत आदिवासींच्या विकासासाठी काम करते. त्या संस्थेने शिक्षण, अपंगांचे पुनर्वसन, स्वयंरोजगार व ग्रामविकास यांच्या माध्यमातून आदिवासी लोकांचे जीवनमान उंचावण्यात मोलाचे कार्य साधले आहे. संस्थेने गावातील लोकांच्या गरजेनुसार विकास आराखडा बनवून ग्रामविकासाला चालना दिली. त्यामध्ये नळपाणी योजना, जलसंवर्धन, शेती विकास, सौरऊर्जा, शेतीला सौर पंपाने पाणी देण्याचे नियोजन या मुख्य गोष्टींना प्राधान्य आहे...
carasole

रणजिता पवार – तांड्यावरील पहिली शिक्षिका

रणजिता लमाणी आहे. ती तांड्यावर लहानाची मोठी झाली. त्यामुळे तिने स्वत: समाजाच्या जाती-जातींतील विषमता अनुभवली. तिने तांड्यावरील शैक्षणिक अनास्थेला झुगारले. तिने कुटुंब, जातपंचायत यांचा...
carasole

सुयश गुरूकूल – सोलापूरचे आगळे विद्यामंदिर

मुले विद्यालयाच्या प्रांगणात आनंदाने बागडत आहेत, वर्गात बसलेल्या मुलांच्या मुद्रांवर कुतूहल आहे- ती शिकवणाऱ्या शिक्षकाकडे आदराने पाहत आहेत. कोणाच्याही चेहऱ्यावर कंटाळा नाही. सर्वत्र आनंद,...
carasole

जयश्री काळे – जया अंगी मोठेपण!

1
छान बंगला, आर्थिक सुबत्ता, सुदृढ वातावरण असे घर पुण्यात असताना, घरातून उठून झोपडपट्टीत कोण हो जाईल? कोण तेथील लोकांना सुधारणा सुचवण्याचा ध्यास घेईल? त्यांना...
carasole

मैत्री स्वत:शी, मैत्री सर्वांशी!

‘मेळघाट’ हा महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्याच्या उत्तरेकडील संपूर्ण जंगल असलेला परिसर. मेळघाटात तीनशेवीस गावे आहेत. चार हजारपन्नास चौरस किलोमीटरचा तो प्रदेश चिखलदरा आणि धारणी या...
carasole

सोमवंशी क्षत्रिय समाज – संस्कार शिबिरे

‘सोमवंशी क्षत्रिय समाज महामंडळ’ ही नुकतीच पन्नास वर्षें पूर्ण झालेली सामाजिक संस्था. समाजातील सर्व वयोगटांतील लोकांसाठी तेथे वर्षभर उपक्रम राबवले जातात. सेवानिवृत्त शिक्षकांचा सत्कार,...
carasole

पंपकीन हाऊस – निराधारांचे घर

2
‘पंपकीन हाऊस’ या संस्थेच्या आवारात आईवडील नसलेली, पालकांकडे सांभाळ करण्याची क्षमता नसलेली साठ ते पासष्ट अनाथ-निराधार मुले- रमली आहेत. ते ठिकाण अहमदनगरजवळील आरणगाव रस्त्यावरील...