पंडित भीमेसन जोशी यांच्या जन्माला नव्याण्णव वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यांचा जन्म 4 फेब्रुवारी 1922 ला कर्नाटकात झाला. पण समस्त महाराष्ट्रीयनांच्या व भारतीयांच्या मनात, हृदयांत भीमसेन आहेत ते पुण्याचे.
राम गणेश गडकरी हे नाटककार म्हणून त्यांच्या अलौकिक प्रज्ञेने, प्रतिभाविलासाने, भाषावैभवाने मराठी साहित्यसंस्कृती जगतात वेगळे उठून दिसतात. मराठी नाट्यपंचायतन असे किर्लोस्कर, देवल, कोल्हटकर, खाडिलकर व गडकरी या पाच जणांना म्हटले जाते...
यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री चार वेळा झाले. ते मुरब्बी राजकारणी व दूरदृष्टीचे समाजकारणी होते. त्यांनी महाराष्ट्रातील ‘माळावरचा माणूस’ उभा केला, सहकाराचे अमृत सर्वसामान्यांपर्यंत पोचवले, शिक्षणाचा संदेश घरोघरी नेला - त्यांनी हवालदिल शेतकऱ्यांसाठी ‘कसेल त्याची जमीन’ हा कायदा राबवून त्याची मातीशी जोडलेली नाळ घट्ट केली.
सच्चिदानंद श्री मनिराम महाराज हे संत, भगवतभक्त, शांतिब्रह्म म्हणून प्रसिद्ध होते. ते अमरावती जिल्ह्यातील बग्गी (जावरा) या गावी होऊन गेले. बग्गी हे गाव चार ते पाच हजारांच्या लोकवस्तीचे...
शकुंतला क्षीरसागर या जुन्या पिढीतील साक्षेपी, निष्ठावंत संशोधक. त्यांचे 23 नोव्हेंबर 2019 रोजी पुणे येथे निधन झाले. मराठी वाङ्मयक्षेत्रातील ज्येष्ठ समीक्षक आणि तत्त्वचिंतक श्रीकृष्ण केशव क्षीरसागर यांच्या त्या पत्नी.
दुसरे सरफोजी राजे यांची तंजावूरमधील कारकीर्द तेथील मराठी प्रभावाच्या दृष्टीने महत्त्वाची ठरते. तंजावूर हे दक्षिण भारतातील प्रसिद्ध नगरराज्य आहे. ते चेन्नईपासून दोनशेअठरा मैल, तर कुंभकोणमपासून चोवीस मैल अंतरावर आहे.
ना.सी. फडके यांचे नाव उच्चारले, की सर्वसामान्य वाचकांना सर्वप्रथम त्यांच्या प्रणयरम्य कादंबऱ्या (दौलत, अल्ला हो अकबर वगैरे अनेक) आणि कथा आठवतात. तद्नंतर त्यांच्या गुजगोष्टी, आचार्य अत्रे यांच्याशी व इतरांशी झालेले वाद आणि त्यांचा ‘प्रतिभासाधन’ हा ग्रंथराज.
विश्राम बेडेकर यांच्या अध्यक्षतेखाली अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दादरच्या (मुंबई) राजा शिवाजी विद्यालयाच्या प्रांगणात भरले होते. त्यात एका संध्याकाळी ‘साष्टांग नमस्कार’ हे नाटक रंगले होते.
दलित साहित्याचे एक शिल्पकार आणि औरंगाबाद येथील मिलिंद कला महाविद्यालयाचे माजी प्राचार्य ल.बा. रायमाने यांचे अल्पशा आजाराने 6 डिसेंबर 2020 ला निधन झाले. त्यांचे वय पंच्याऐंशी वर्षे मृत्युसमयी होते.
वराहमिहीर (सन 487 ते 550) हा विचारवंत, पर्यावरणतज्ज्ञ व निष्णात ज्योतिषी उज्जैनच्या (मध्यप्रदेश) परिसरात होऊन गेला. त्याचा ‘बृहत्संहिता’ हा अतिप्रसिद्ध असलेला ग्रंथ. त्यातील गर्भलक्षणाध्याय, गर्भधारणाध्याय, प्रवर्षणाध्याय आणि दकर्गलाध्याय असे चार अध्याय ‘पाणी’ ह्या विषयासंबंधी विस्तृत माहिती देतात.