Home Authors Posts by विजय तरवडे

विजय तरवडे

2 POSTS 0 COMMENTS
विजय तरवडे यांनी भारतीय जीवन बीमा निगममधून स्वेच्छानिवृत्ती 2011 साली स्वीकारली. ते पूर्णवेळ लेखन करतात. त्यांचे सदर लेखन केसरी, तरुण भारत, देशदूत, नवा काळ, प्रभात इत्यादी वृत्तपत्रांत नियमित चालू असते. त्यांची विविध साहित्यप्रकारांतील बावीस पुस्तके प्रकाशित झाली आहेत. ते सध्या मध्ययुगीन भारताच्या इतिहासावरील पुस्तके भाषांतरित करत आहेत. ते वास्तव्यास पुण्यात असतात. 9890301812

मागील पिढीवरील वाचन संस्कार (Reading – key to the personality development)

4
मराठी भाषाभ्यासासाठी वि.स. खांडेकर, आचार्य अत्रे वगैरे दिग्गजांनी संपादित केलेली पाठ्यपुस्तके जुन्या पिढीत होती; खेरीज पुरवणी वाचनासाठी नेमलेली अवांतर पुस्तके असत. त्यातील गद्य विभाग हे गद्य बिलकुल नव्हते, तर अतिशय रोचक आणि समृद्ध होते. त्यातील साहित्याची विविधता तेव्हा जाणवली नाही, पण आता ती आठवली, की स्तिमित व्हायला होते.

ना.सी. फडके यांचे पुरोगामित्व (Veteran Novelist N S Phadke and his progressive stance)

0
ना.सी. फडके यांचे नाव उच्चारले, की सर्वसामान्य वाचकांना सर्वप्रथम त्यांच्या प्रणयरम्य कादंबऱ्या (दौलत, अल्ला हो अकबर वगैरे अनेक) आणि कथा आठवतात. तद्नंतर त्यांच्या गुजगोष्टी, आचार्य अत्रे यांच्याशी व इतरांशी झालेले वाद आणि त्यांचा ‘प्रतिभासाधन’ हा ग्रंथराज.