आचरा नदीने रत्नागिरी जिल्ह्याचे दोन भाग केले आहेत. पैकी दक्षिणेकडचा भाग म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा. ही संस्कृती गोव्याला जवळची, ती रत्नागिरी-रायगड जिल्ह्यांहून वेगळी आहे. त्या भागात एक...
मुंबई (अँटाप हिल) ते शिर्डी
अंधांची पदयात्राआम्ही शिर्डीला जाण्यासाठी 'ॐ साई'च्या जयघोषात पालखीबरोबर चालू लागलो आणि क्षणार्धात पुढील आठ दिवसांचा प्रवास नजरेसमोर तरळला,...
डेक्कन कॉलेजमध्ये गेली साठ वर्षे एका एनसायक्लोपीडियाचे काम चालू आहे आणि पुढील पन्नास वर्षे तरी चालणार आहे – प्रत्येक भारतीय माणसाला अभिमान वाटेल असे बुद्धीचे काम पुण्याच्या भूमीत चालू आहे...
संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली, पाच वेगवेगळे विभाग एकत्र आले, परंतु लोकांनी परस्परांना समजून घेण्याची प्रक्रियाच राज्यात घडून आली नाही. भावनिक एकात्मता व समतोल विकास यांबाबतीत फार बेजबाबदार वर्तन आपल्याकडून –शासन, राजकारणी व लोकही यांच्याकडून झाले आहे. केवळ सीमाप्रश्नावर दंड थोपटून चालणार नाही. विदर्भ-मराठवाडा-खानदेश-कोकण-पश्चिम महाराष्ट्र या सार्यांनी एकमेकांची मने जाणली पाहिजेत. नुसता भूगोल एकत्र करून काय उपयोग?
आजच्या पिढीला हा इतिहास पुन:पुन्हा सांगावा लागेल. कदाचित मुंबईच्या नकाशावरून गिरणी कामगार साफ पुसला जाईल. कदाचित नवमहानगर उभारताना त्याचा नरबळी अपरिहार्यही असेल पण त्याची जिगर, त्याचा लढाऊ बाणा, त्याचे श्रम आणि त्याने उभी केलेली संस्कृती विसरणं ही इतिहासाशी गद्दारी ठरेल. हे आख्खं आख्खं ‘मोहन जो दारो’ काळाच्या उदरात गडप होताना झालेली जगण्यासाठीची ही अखेरची तडफड...
कोल्हापूराने सर्वांचा छळ सुरू केला. ब्रह्मदेवादी देवांनाही तो ऐकेना असे होता होता.. शंभर वर्षे झाली. ‘महालक्ष्मी’ परत आली. तिचे व कोल्हापुरचे युद्ध झाले. देवीने...
बालगंधर्व हे महाराष्ट्राचे दैवत त्यांची प्रेयसी आणि नंतरची बायको गोहराबाई कर्नाटकी हिला कर्नाटकात प्रतिगंधर्व म्हणत. परंतु महाराष्ट्रात मात्र तिचा द्वेष करत. गोहराबांईची शताब्दी चालू...
कॅप्टन विनायक गोरे पंधरा वर्षांपूर्वी काश्मिरमध्ये लष्करी हल्ल्यात कामी आला. परंतु त्याच्या हौतात्म्यातून शक्ती प्राप्त करून त्याच्या आई अनुराधा गोरे खंबीर उभ्या राहिल्या व ‘वीरमाता’ पदाला सार्थपणे पोचल्या. सैन्यभरतीचा आणि संरक्षणसिध्दतेचा व बालकल्याणाचा वसा घेतलेल्या मातेची अनोखी कहाणी...
मुलाखतकर्ते अजित दळवी यांनी श्रोत्यांतून आलेला एक प्रश्न विचारला व त्यांनीच अट घातली, की त्याचे सहभागींनी उत्तर देऊ नये. तो प्रश्न म्हणजे मराठवाड्याचा बॅकलॉग कसा भरून येत नाही? व मराठवाड्याचे प्रश्न सुटत का नाहीत? विशेषत:, मराठवाड्याकडे ‘मुख्यमंत्रीपद’ अधिक वेळ येऊनसुद्धा...