Home वैभव

वैभव

नोंद गावोगावच्‍या सांस्‍कृतिक संचिताची – ऐतिहासिक आणि सांस्‍कृतिक वारशाची!

महापालिकेत मराठी : मृणाल यांची मोहीम (Marathi in Municipal Corporation of mumbai : Mrunal...

मी वसुधा सहस्रबुद्धे. माझे माझ्या देशावर, महाराष्ट्रावर आणि मराठी भाषेवर प्रेम आहे. परंतु मधल्या काळात राजकारणात इतक्या विचित्र अनाकलनीय घटना घडल्या, की मला भारतीय नागरिक म्हणून वाईट वाटले. त्यावेळी जनसेवेचे व्रत घेतलेल्या मृणाल गोरे यांची आठवण झाली. सध्याच्या तरुण पिढीला गोरे यांच्या निःस्पृह, निर्भय व आदर्श व्यक्तिमत्त्वाची ओळख करून द्यावी असे वाटले. अशा प्रभावी व्यक्तिमत्त्वाचा परिचय एकपात्री प्रयोगातून सर्वांसमोर मांडावा असा प्रयत्न आहे. मनात असा विश्वास वाटला, की आजही एखादे असे व्यक्तिमत्त्व निर्माण होईल, की जे सर्वांना एकत्र घेऊन फक्त जनतेसाठी काम करेल ! त्यामुळेच मी मृणाल गोरे यांचे संघर्षपूर्ण जीवन काही प्रसंगांतून मांडण्याचा प्रयत्न केला आहे...

मराठी कम्युनिटी

मराठी (व एकूणच स्थानिक) भाषा व संस्कृती ही मुळात टिकणार कशी हा प्रश्न जाणकार (मराठी) जनांना भेडसावत असतो. त्याच बरोबर भाषा व संस्कृती यांच्या संवर्धनाच्या गोष्टीही काही डोक्यांत असतातच. त्याकरता क्रियाशील मंडळी त्यांच्या त्यांच्या परीने वेगवेगळ्या तऱ्हांची कामे करत असतात. मराठीतील पाच संस्थांमार्फत आम्ही असे ठरवत आहोत, की जगातील साऱ्या कर्तबगार मराठी जनांना, त्यांच्या कार्याला एका सांस्कृतिक दुव्याने जोडून घ्यावे – त्यांच्याकडील माहितीचे व ज्ञानाचे आदानप्रदान व्हावे आणि अशा तऱ्हेने मराठी माणसाचे शक्तिसामर्थ्य प्रकटावे...

मराठी जगवायची कशी, विस्तारायची कशी?

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर मराठी भाषेच्या प्रसारासाठी पुढाकार घेऊन जबाबदारीने सातत्यपूर्ण काम करण्याची गरज आहे. ह्या दृष्टीने मुंबई येथील सोमैया विद्यापीठात, भाषा आणि साहित्य तसेच ‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’ यांच्या संयुक्त विदयमाने ‘मराठी जगवायची कशी, विस्तारायची कशी?’ या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात मराठी भाषेतून संभाषण व संवाद करणे आधुनिक तंत्रज्ञानामुळे सोपे झाले आहे. त्यामुळे तसे प्रयत्न करावेत व मराठीचा विस्तार साधावा असा अभिप्राय व्यक्त झाला. या कार्यशाळेला एमकेसीएलचे मुख्य मार्गदर्शक विवेक सावंत यांची विशेष उपस्थिती लाभली...

श्रीदेव केदारलिंग : पाचलचे ग्रामदैवत

केदारलिंग हे पाचलचे ग्रामदैवत. पाचल हे कोकणच्या राजापूर तालुक्यातील गाव. केदारलिंग मंदिर गावाच्या मध्यभागी आहे. पाचल गाव कोंड-दिवाळवाडी रस्त्यावर येते. मंदिर रस्त्यालगत दाट वनराईत वसलेले असे आहे -लाकडी, कौलारू आणि टुमदार. मंदिराच्या डाव्या बाजूला ‘ब्राह्मण देवराई’ आणि मागील बाजूला ‘रामेश्वर देवराई’ आहेत. केदारलिंग हे शंकराचे देवस्थान. पण त्या देवळात गाभारा किंवा पिंडी नाही. देवळाला कळस नाही. देवळात पुरातन पाषाणमूर्ती विराजमान आहे. आसनस्थ पाषाण मध्यभागी; केदारलिंग देवाच्या उजव्या बाजूला धनीणबाय, रामेश्वर, कालकादेवी, पावणादेवी, देवाच्या डाव्या बाजूला नवशादेव, ब्राह्मणदेव, ईठलादेवी, नवलादेवी आणि समोर खाली गणपती...

बावन्नावे मराठी साहित्य संमेलन (Fifty Second Marathi Literary Meet 1977)

पुणे येथे 1977 साली झालेल्या बावन्नाव्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते पुरुषोत्तम भास्कर भावे. त्यांचा जन्म 12 एप्रिल 1910 रोजी धुळे येथे झाला. भावे हे मराठी नवकथेचे एक जनक मानले जातात. त्यांच्या नावावर सतरा कादंबऱ्या, सव्वीस कथासंग्रह, बारा लेखसंग्रह, आठ नाटके असे साहित्य आहे. त्यांनी इतर साहित्यिक कृतीही लिहिल्या व त्या एकूण साहित्यातून मराठी साहित्य समृद्ध केले आहे. भावे यांना संपन्न घराण्यात जन्मास येऊनही जीवनातील खडतर अनुभव घ्यावे लागले. भावे यांचे संस्कारक्षम बालपण विदर्भात गेले...

उपनयन संस्कार कालबाह्य झाला आहे का?

‘उपनयन’ संस्काराची सुरुवात कुटुंबातील बालकाचा ‘विधिपूर्वक शिक्षण-प्रवेश’ व्हावा या हेतूने झाली असावी. ती प्रथा कायमस्वरूपी व शिष्टसंमत होण्यासाठी ती ‘धर्मसंस्कार’ म्हणून स्वीकारली गेली. पण तो विधी सध्याच्या काळात गरजेचा आहे का? तेव्हाची आणि आजची जीवनपद्धत-शिक्षणपद्धत यांत बदल झाला आहे. त्यामुळे मुंज कालसापेक्ष राहिलेली नाही असे मत अशोक विद्वांस यांनी त्यांच्या स्वतःच्या उदाहरणांद्वारे त्यांच्या उपनयन संस्कार कालबाह्य झाला आहे का? या लेखात स्पष्ट केले आहे. त्याच लेखात स्त्रीवर्ग अशा धार्मिक समजल्या जाणाऱ्या विधींकडे कसे पाहतो तेही स्पष्ट होत जाते...

एका अस्पृश्याच्या मुंजीची मौज

सांगलीजवळील कवलापूर या गावात पन्नास वर्षांपूर्वी स्पृश्य आणि अस्पृश्य यांच्यातील दरी मिटली. त्याला कारण ठरले डॉ. जय भोरे. त्यांनी लिहिलेल्या ‘द अनटचेबल ब्राह्मिन ख्रिश्चन’ या लेखाचा थोडक्यात अनुवाद सुधीर दांडेकर यांनी एका अस्पृश्याच्या मुंजीची मौज या लेखाद्वारे करून दिला आहे...

संस्कार- उपनयन

स्मिता भागवत यांच्या संस्कार- उपनयन या लेखात त्यांनी जुन्या काळापासून आजपर्यंतचा मुंज विधी-संस्कारासंदर्भातील आढावा घेतला आहे. उपनयन विधी, तो कसा केला जातो, शिष्याचे त्यानंतरचे जीवन कसे असते/ असावे याचे विवरण केले आहे...

अलिबाग माझे गाव

अलिबाग हे पुण्यामुंबईजवळचे समुद्र किनाऱ्यावरील गाव. अलीकडच्या काळात ‘टुरिस्ट प्लेस’ म्हणून गाजलेले. ते दोन दिवसांच्या ट्रिपसाठी उत्तम मानले जाते. मुंबईहून तेथे ‘रोरो बोट सर्व्हिस’ने जाता येत असल्याने अलिबागचे पर्यटन केंद्र म्हणून महत्त्व अधिकच वाढले आहे. पण अलिबागला मोठा इतिहास आहे. शिवाजीराजे व आंग्रे सरदार यांच्या कथाकहाण्या प्रसिद्ध आहेतच, पण ज्यू लोक दोन हजार वर्षांपूर्वीपासून येथे राहत आले आहेत. त्यांची जुनी घराणी आहेत आणि आता संबंध इस्त्रायलशी जोडलेले आहेत. बरेच लोक तिकडे स्थलांतरित झाले आहेत. अलिबागचा पांढरा कांदा हे तेथील वैशिष्ट्यपूर्ण पीक आहे. अलिबागला ब्रिटिशकाळात हवामान केंद्र होते. ते तत्कालीन कुलाबा (आता रायगड) जिल्ह्याचे मुख्य शहर होय. तेथून जिल्ह्याचे सर्व व्यवहार होतात...

अलिबाग नावाचा शोध !

अलिबाग ह्या शहराच्या नावाची व्युत्पत्ती बायबलमध्ये सापडते ! पण इतिहासाचा प्रवास अनेकदा असा अनाकलनीय असतो. ‘उत्पत्ती’ नावाचे बायबलचे पहिले पुस्तक आहे. आदाम आणि एवा ह्यांची गोष्ट त्यात आहे. आदाम हा आदिपुरुष आणि एवा ही आदिमाता. त्यांचे दोन मुलगे म्हणजे काईन आणि आबेल. काइनने (थोरला) रागाच्या भरात आबेलचा खून केला ! बंधुप्रेम आदी मूल्ये अस्तित्वात येण्याआधीची ही गोष्ट आहे. तेव्हा राज्य द्वेषाचे होते. नंतर आदामाला अनेक अपत्ये झाली, त्यांतील सेथ हा ज्येष्ठ...