कशेळीचे आम्ही कुळकर्णी

आमच्या कुळकर्णी घराण्याची श्रीमंती खूप होती. त्याची ख्याती जंजिऱ्यापर्यंत पोचली होती. सिद्दी चाचे लुटमार करण्याकरता कशेळी येथे 1870 साली समुद्रावरून आले होते. त्यांनी वाड्यात येऊन स्त्रियांच्या वस्त्रांसकट दागदागिन्यांची लुटमार केली होती. मात्र, एका धाडसी कुळकर्णी महिलेने हाताला लागेल तेवढे सोने अंगावर घालून जवळच्या विहिरीत उडी मारली. ती चाचे जाईपर्यंत तेथेच दडून बसली होती. त्यामुळे ती वाचली. तिच्या अंगावर सोने इतके होते, की त्यातून मिळालेल्या पैशांवर पुढे कुळकर्ण्यांच्या चार पिढ्या जगल्या. परंतु श्रीमंती गेली होती...

टेफ्रांचा पाऊस ! (Indonesion Tefra found in Junnar – Maharashtra)

कुकडी प्रकल्पात बोरी गावाच्या वरील बाजूस येडगाव व त्या पाठीमागे माणिकडोह अशी दोन धरणे बांधली गेली. त्यामुळे कुकडी नदीचे पात्र कायम वाहते होते, ते कोरडे पडले. परंतु त्या उघड्या पात्राचा फायदा असा झाला, की त्यातून आदिमानवाची सत्यकथा प्रकट झाली ! ही गोष्ट 1987 सालातील. पुण्याजवळच्या परिसरात भौगोलिक सर्वेक्षण सुरू होते. विश्वास काळे यांना बोरी गावाजवळ कुकडी नदीकाठी राखेचे आगळेवेगळे थर आढळले. तसे थर नदीकाठाने तब्बल दहा किलोमीटरच्या परिसरात पसरलेले होते. पण ती राख नव्हती, तर तप्त ज्वालामुखीच्या उद्रेकाबरोबर हवेत उडालेले खनिज, सिलिका अशा द्रव्यांच्या सूक्ष्मकणांचा तो थर होता. राखेसारख्या त्या कणांना भू-शास्त्रीय भाषेत ‘टेफ्रा’ म्हणतात...

अलिबाग माझे गाव

अलिबाग हे पुण्यामुंबईजवळचे समुद्र किनाऱ्यावरील गाव. अलीकडच्या काळात ‘टुरिस्ट प्लेस’ म्हणून गाजलेले. ते दोन दिवसांच्या ट्रिपसाठी उत्तम मानले जाते. मुंबईहून तेथे ‘रोरो बोट सर्व्हिस’ने जाता येत असल्याने अलिबागचे पर्यटन केंद्र म्हणून महत्त्व अधिकच वाढले आहे. पण अलिबागला मोठा इतिहास आहे. शिवाजीराजे व आंग्रे सरदार यांच्या कथाकहाण्या प्रसिद्ध आहेतच, पण ज्यू लोक दोन हजार वर्षांपूर्वीपासून येथे राहत आले आहेत. त्यांची जुनी घराणी आहेत आणि आता संबंध इस्त्रायलशी जोडलेले आहेत. बरेच लोक तिकडे स्थलांतरित झाले आहेत. अलिबागचा पांढरा कांदा हे तेथील वैशिष्ट्यपूर्ण पीक आहे. अलिबागला ब्रिटिशकाळात हवामान केंद्र होते. ते तत्कालीन कुलाबा (आता रायगड) जिल्ह्याचे मुख्य शहर होय. तेथून जिल्ह्याचे सर्व व्यवहार होतात...

खंडाळा घाटातील आडवाटा, गडकिल्ले

मुंबई-पुणे प्रवास करत असताना खंडाळा घाटातील सौंदर्य कोठल्याही ऋतूत नेहमीच भुरळ घालते. विशेष करून रेल्वेने प्रवास करत असताना घाटात सामोऱ्या येणाऱ्या सह्याद्रीच्या भव्यतेच्या जाणिवेने मन हरखून जाते. मी हा प्रवास खूपदा केला आहे. त्या प्रवासात ठाकूरवाडी, मंकी हिल, नागनाथ, जामरुंग अशी रेल्वेची लहानशी उपस्थानके किंवा तांत्रिक थांबे आहेत. दुर्गम घाटात, जंगलात त्या स्थानकांचे प्रयोजन काय हा प्रश्न पडत असे. घाटात बोगद्याच्या डोंगरावर एक गुहा आहे. त्या गुहेत नागनाथाचे छोटेसे देऊळ आहे. घाट परिसरातील दुर्गवैभव म्हणता येईल अशा राजमाची किल्ला, ढाक किल्ला, नागफणी डोंगर या सर्वश्रुत ठिकाणी तर गेलो; तसेच, त्या परिसरातील आडवाटा जिज्ञासेपोटी पालथ्या घातल्या...

सातवाहन – महाराष्ट्रातील पहिले राजघराणे

1
सातवाहन हे महाराष्ट्रावर राज्य करणारे पहिले राजघराणे. त्यांचा कार्यकाळ इसवी सनपूर्व 235 ते इसवी सन 225 पर्यंतचा आहे. साधारणतः साडेचारशे वर्षे. सिमुक या सातवाहन राजाने त्या राज्याची मुहूर्तमेढ रोवली तर त्याचा पुत्र सिरी सातकर्णी या कर्तृत्ववान राजपुरुषाने घराण्याला सम्राटपद मिळवून दिले. सातवाहन घराण्याच्या सिमुक सातवाहनानंतर राजगादीवर आलेला हा दुसराच राजा होता. असे असताना त्याने त्याच्या कर्तृत्वाने घराण्याला सम्राटपद मिळवून दिले. राजाचे कर्तृत्व नागनिका राणीने कोरवून घेतलेल्या नाणेघाट लेण्यातून कळते. सातकर्णी राजाची राणी ‘नागनिका’ ही त्या काळातील पहिली कर्तबगार ज्ञात स्त्री...

दक्षिण सोलापुरातील शिवक्षेत्रे- सोमेश्वर, संगमेश्वर, रामलिंगेश्वर, शंभू महादेव, नागनाथ

शिवक्षेत्रे दक्षिण भारतात, खास करून महाराष्ट्रात अधिक पाहण्यास मिळतात. धारणा अशी आहे, की जेथे जेथे शिवलिंगांची स्थापना झालेली आहे ती सर्व क्षेत्रे संवेदनशील भूभागावर वसलेली आहेत. म्हणजे ज्वालामुखीची तोंडे किंवा भूकंपप्रवण क्षेत्रे. शिवमंदिरातील शांत गंभीरता भक्तांना शिवाच्या चरणी लीन होण्यास भाग पाडण्याइतकी प्रभावी असते. सोलापूर जिल्ह्याच्या दक्षिण सोलापूर तालुक्यात मागील एक हजार वर्षांचा ऐतिहासिक, सांस्कृतिक, साहित्यिक वारसा जपून शिल्लक राहिलेला दिसतो. त्याचाच एक भाग म्हणजे तेथील आगळीवेगळी शिवतीर्थे...

मुरुडचे दुर्गादेवीचे विलोभनीय मंदिर (Murud: Beautiful Temple of Goddess Durga)

1
दुर्गेच्या संरक्षक रूपाची उपासना सर्वत्र केली जाते. मुरुडच्या दुर्गादेवीच्या देवळाची कथा तशीच आहे. मुरुड गाव गंगाधर भट नामक सिद्धपुरुषाने कोकणातील दापोली तालुक्यात वसवले. तशी बखर आहे. गंगाधर भट समुद्रकाठाकाठाने सोळाव्या शतकात सौराष्ट्रातून आले होते. मुरुडमध्ये वसाहत करताना दोन्ही बाजूंना घरे आणि मधोमध रस्ता अशी रचना झाली. मंदिरे स्थापन झाली. तरी एक भय राहिले. कोकण किनारपट्टीमधील गावांवर सागरी चाच्यांच्या आक्रमणाचे सावट असे. गावे लुटली जात. म्हणून रक्षणकर्त्या दैवताचे सान्निध्य गावकऱ्यांना धैर्य देईल या कल्पनेने दुर्गा देवीचे मंदिर गावात मध्यवर्ती ठिकाणी स्थापन केले...

मुरुडचा भूलभुलैया चौक (Murud’s 400 year old Magic Square)

गावात, शहरात चौक असतात. पण एखाद्या गावात चौकटीत किंवा चौकाच्या व्याख्येत न बसणारा असा; तरीही तो चौकच असतो, हे वाचून अचंबा वाटेल. असा चौक आहे दापोली तालुक्यात मुरुड या गावी. मुरुड हे टिंबाएवढे गाव. नकाशात त्याचे अस्तित्व ते काय दिसून येणार ! परंतु त्या गावाची ख्याती ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि नैसर्गिक वेगळेपणामुळे सर्वदूर पोचली आहे. गावाची रचना विचारपूर्वक करण्यात आली असल्याचे जाणवते. दोन्ही बाजूंना घरे आणि मधोमध रस्ता. सुमारे चारशे वर्षांपूर्वीची ही रचना स्वत:चे रूप अजूनही टिकवून आहे...

एकसरचे वीरगळ (Hero Stones of Eksar)

दहिसर बोरिवलीच्या दरम्यान एकसर नावाचे खेडे होते. आजही त्याला एकसर व्हिलेज अशे म्हणतातपण त्यात खेडे असण्याच्या  कुठल्याही खूणा दिसत नाहीत. अशा या ठिकाणी सहा...

‘कोर्सले’चा झाला ‘सह्याद्री’ आणि ‘डनवेगन’ चा ‘वर्षा’ (Corsley and Dunvegan Bungalows)

मुंबई बेटाच्या गेल्या दोन-तीन शतकांचा इतिहास मुंबईच्या रस्त्यारस्त्यावर लपलेला आहे. शोधणाऱ्याला तो सापडतो.  हे शोधकार्य रोमांचक आणि मनोरंजक तर आहेच पण त्यातून ज्ञान आणि...